वृद्ध विधवा निराधारांची पगार आली तुम्हाला मिळाले का 1500 रुपये

वृद्ध विधवा निराधारांची पगार आली तुम्हाला मिळाले का 1500 रुपये

वृद्ध विधवा निराधारांची पगार होणार बँकेत जमा पहा सविस्तर माहिती.

ज्या व्यक्तींना शासनाच्या निराधार अनुदान योजना अंतर्गत महिन्याला १५०० रुपये मिळतात त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे कारण आता त्यांचा पगार लवकरच त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे.

हा पगार गुढीपाडवा सणाच्या आत बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे.

ज्या व्यक्ती निराधार आहेत त्यांना संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, विधवा पेन्शन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ योजना इत्यादी योजनांचा लाभ मिळतो.

यासाठी महिन्याला १५०० रुपये बँक खात्यामध्ये जमा केले जातात. मागील तीन महिन्यांपासून निराधारांचे मानधन थकलेले होते. हे पैसे नियमित न मिळाल्याने अनेक निराधारांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो, परंतु आता लवकरच हि रक्कम निराधारांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार असल्याने निराधारांचा सण गोड होणार आहे.

बातमी पहा

समितीकडे सादर करावा लगतो अर्ज

संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेण्यसाठी लाभार्थीचे वय ६५ वर्षापेक्षा जास्त असणे गरजेचे आहे. संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, विधवा पेन्शन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ योजना या योजनांचा लाभ घेण्यासाठी एक समिती तालुकास्तरावर गठीत केलेली असते. या समितीकडे परिपूर्ण महिती भरलेला अर्ज आणि प्रस्ताव तुम्हाला सादर करावा लागतो.

तुम्ही जर या योजनेसाठी पात्र असाल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळतो. मात्र तुम्ही जर अपात्र असाल तर परत सर्व कागदपत्रांची पूर्तता करून तुम्ही परत लाभ घेवू शकता.

योजनेसाठी लागणारी जी कागदपत्रे आहेत ती अशी आहेत

अर्जदाराचे रंगीत पासपोर्ट आकाराचे छायाचित्र.

ओळखीचा पुरावा म्हणून १ पासपोर्ट २ पॅन कार्ड ३ आधार कार्ड ४ मतदान कार्ड यापैकी एक पुरावा सादर करावा लागतो.

तहसीलदार किंवा तलाठी यांची स्वाक्षरी असलेले रहिवासी प्रमाणपत्र.

इत्यादी कागदपत्रे या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असतात. परिपूर्ण असलेली फाईल तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या समितीकडे सादर करावी लागते.

संजय गांधी निराधार योजनेचा अर्ज नमुना pdf स्वरुपात हवा असेल तर खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही हि pdf डाउनलोड करू शकता.

संजय गांधी निराधार योजना

ग्रामीण भागातील बऱ्याच नागरिकांना या संजय गांधी निराधार योजनेचा लाभ कसा घ्यावा या संदर्भात माहिती नसण्याची शक्यता आहे. त्यामुळे पात्र असून देखील अशा नागरिकांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळत नाही. अशा पद्धतीने वृद्ध विधवा निराधारांची पगार लवकरच बँक खात्यामध्ये जमा होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *