फोन पे रक्कम कपात झाली असेल तर काय कराल पहा सविस्तर माहिती.
जाणून घेवूयात फोन पे तिकीट निर्मितीद्वारे कपात झालेल्या पेमेंटची तक्रार फोन पे कस्टमर केअरकडे कशी करावी. How to raise phonepe ticket and complaint for deduction of payment.
डिजिटल पेमेंटमुळे व्यवहार सोपे झाले आहे. अगदी चहा पिण्यापासून ते मोठे व्यवहार phone pay द्वारे केले जातात.
युपीआय द्वारे पेमेंट करण्याचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत जसे कि फोन पे गुगल पे अमेझोन पे इत्यादी. परंतु फोन पे हा पर्याय पेमेंट करण्यासाठी अनेक लोक वापरतात किंबहुना हाच पर्याय ग्रामीण भागातील लोकांना सोयीस्कर वाटतो.
लाईटबिल भरणे असो किंवा पैसे ट्रान्स्फर करणे असो इत्यादी कामे फोन पेच्या सहाय्यने अगदी वेळेत आणि झटपट होतात.
फोन पे रक्कम कपात अशी करा तक्रार how to raise phonepe ticket
परंतु कधी कधी फोन पे द्वारे पेमेंट केले गेले आणि ते मध्येच अडकले तर अडचण सुद्धा निर्माण होते. फोने पे द्वारे पेमेंट केले आणि ते मध्येच अडकले असे तुमच्या बाबतीत घडले असेल तर अजिबात काळजी करू नका तुमचे पेमेंट परत तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होऊ शकते.
यासाठी तुम्हाला फोन पे तिकीटद्वारे तक्रार करावी लागते. तुम्हाला जर माहित नसेल कि फोन पे तिकीट निर्माण कसे करावे how to raise phonepe ticket तर हा लेख पूर्णपणे वाचा जेणे करून तुम्हाला तुमचे पैसे लवकर परत मिळतील.
फोन पे द्वारे बँकेतून कपात झालेले पैसे परत मिळविण्याची पद्धत कशी आहे त्या संदर्भात संपूर्ण माहिती जाणून घेवूयात.
फोनपे मध्ये पैसे पेंडीग राहण्याचे कारण
फोन पे द्वारे पेमेंट करतांना सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुमच्या मोबाईलला पूर्ण रेंज आहे का ते तपासा. कुमकुवत रेंजमुळे इंटरनेट सेवा सुरळीत मिळत नाही आणि याचा परिणाम म्हणजे पेमेंट करतांना तुमचे पेमेंट प्रोसेसिंगमध्ये जावू शकते.
म्हणजेच खंडित इंटरनेट सुविधेमुळे देखील फोन पे पेमेंट प्रोसेसिंगमध्ये जावू शकते. phonepe payment processing problem.
Time out errors कोणताही व्यवहार करतांना त्यासाठी एक मर्यादा ठरवून दिली असते. त्या मार्यादापेक्षा जास्त वेळ लगला Time out errors त्यावेळी सुद्धा phonepe payment processing problem उद्भवू शकतो.
फोन पेद्वारे कपात झालेले पेमेंट परत मिळविण्यासाठी काय कराल
सगळ्यात आधी तुम्हाला ज्या पेमेंटची समस्या निर्माण झाली आहे त्याबद्दल सविस्तर माहितीचे एक फोन पे तिकीट निर्माण phonepe ticket raise करावे लागेल.
फोन पे तिकीट निर्मिती पद्धत खालील प्रमाणे आहे. How to create phonepe tickets.
तुमच्या मोबाईल फोन मधील फोन पे ॲप इंस्टाल करा.
फोन पे हिस्ट्रीवर जा.
जो व्यवहार पेंडिंग दाखवत आहे phone pay money pending process त्या व्यवहारावर क्लिक करा.
आता या ठिकाणी phonepe payment pending संदर्भात सविस्तर माहिती दिसेल याच माहितीच्या सर्वात शेवटी म्हणजेच खाली contact phonepe support असे बटन दिसेल त्यावर टच करा.
या ठिकाणी फोन पेचा चाट बोट तुमच्याशी संपर्क साधेल तुम्हाला दिसत असलेली माहिती योग्य त्या प्रकारे निवडून तुम्ही या ठिकाणी तिकीट निर्माण करू शकता.
व्हिडीओ पाहून तशी कृती करा
हि माहिती तुम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने समजावी यासाठी खालील व्हिडीओ पहा. या व्हिडीओ मध्ये पेमेंट पेंडिंग संदर्भात फोन पे तिकीट निर्मिती कशी केली जाते या संदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
वरील व्हिडीओ तुम्ही जर काळजीपूर्वक बघितला असेल तर अगदी काही मिनिटांमध्ये तुम्ही फोन पे कस्टमर केअर phonepe customer care संपर्क साधून तुमच्या बँक खात्यामधून कपात झालेल्या पेमेंट संदर्भात सविस्तर तक्रार करू शकता. फोन पे रक्कम कपात