बियाणे टोकन यंत्र मिळवा घरपोच.
या टोकन यंत्राच्या सहाय्यने पेरणी करणे अगदी सोपे जाते. शिवाय ज्या ठिकाणी ट्रॅक्टर जात नाही बैल किंवा औत जात नाही अशा ठिकाणी अगदी एक माणूस आपल्या खांद्यावर हे बियाणे टोकन यंत्र घेवून चार पाच मजुरांचे काम अगदी काही तासांमध्ये करू शकतो.
बियाणे टोकन यंत्र शेतीसाठी व शेतकऱ्यांसाठी फायद्याचे
त्यामुळे बियाणे टोकन यंत्राने पेरणी करणे अगदी सोपे होते.
मार्केटमध्ये या बियाणे टोकन यंत्राची किंमत ६५०० हजार रुपयांपर्यंत आहे परंतु महा dbt या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज केल्यास तुम्हाला शासनाकडून ५० टक्के सबसिडी मिळते.
Samson या बियाणे टोकन यंत्राचा टेस्ट रिपोर्ट मिळत असल्याने तुम्ही अगदी शासकीय अनुदानावर देखील हे बियाणे टोकन यंत्र खरेदी करू शकता.
बाजारामध्ये अनेक टोकन यंत्र मग हेच का घ्यायचे
बाजारामध्ये अनेक ठिकणी तुम्हाला हे बियाणे टोकन यंत्र मिळू शकते परंतु त्या यंत्राचे पार्ट जर खराब झाले तर परत मिळणे कदाचित शक्य होत नसल्याच्या अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत.
अशावेळी तुम्ही जर कृषी माहिती तंत्रज्ञान केंद्र भोकरदन यांच्याकडून हे बियाणे टोकन यंत्र खरेदी केले तर जे पार्ट खराब होईल ते देखील तुम्हाला मिळेल.
बियाणे टोकन यंत्राचा एखादा पार्ट खराब झाला तर संपूर्ण टोकन यंत्र खराब होते, कामात येत नाही. त्यामुळे तुम्हाला जर बियाणे टोकन यंत्र व सविस्तर माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क साधा.
9527008193 किंवा 8888708809 या फोन नंबर्सवर कॉल करा.
असा करा बियाणे टोकन यंत्रासाठी ऑनलाईन अर्ज
बियाणे टोकन यंत्रासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो या संदर्भात सविस्तर माहितीचा व्हिडीओ पहा
गुगलमध्ये mahadbt farmer login असा शब्द टाकून सर्च करा.
Applicant login here अशी लिंक येईल त्या लिंकवर क्लिक करा.
तुमचा युजर आयडी पासवर्ड टाकून लॉगीन करा किंवा तुमच्या आधार नंबरचा उपयोग करून देखील तुम्ही लॉगीन करू शकता.
आधार नंबरला जो मोबाईल लिंक करण्यात आला आहे त्यावर एक otp येईल तो दिलेल्या चौकटीमध्ये टाका आणि otp तपासा या बटनावर क्लिक करा.
अर्ज करा अशी लिंक शोधून त्यावर क्लिक करा.
कृषी यांत्रिकीकरण या पर्यायासमोर दिसत असलेल्या बाबी निवडा या पर्यायावर क्लिक करा.
या ठिकणी आता एक अर्ज ओपन होईल त्यामध्ये व्यवस्थित माहिती भरा जसे कि मुख्य घटक या चौकटीमध्ये क्लिक करून कृषी यंत्र औजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य हा पर्याय निवडा.
तपशील या चौकटीवर क्लिक करून मनुष्यचलीत औजारे हा पर्याय निवडा.
यंत्रसामग्री औजारे या पर्यायावर क्लिक करून टोकन यंत्र हा पर्याय निवडा.
योजनेच्या अटी आणि शर्थी मान्य करण्यासाठी दिलेल्या चौकटीमध्ये टिक करा.
जतन करा या बटनावर क्लिक करा.
योजनेला प्राधान्य क्रमांक द्या
तुम्हाला अजून काही अर्ज करायचे असेल तर yes या बटनावर करा नसेल तर No या बटनावर क्लिक करा. आपण फक्त टोकन यंत्रासाठी अर्ज करत आहोत त्यामुळे No या बटनावर क्लिक करणार आहोत.
अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करा. सूचना वाचून घ्या आणि ओके या बटनावर क्लिक करा.
पहा या बटनावर क्लिक करा.
या ठिकणी तुम्ही जर एकापेक्षा अनेक योजनांसाठी अर्ज केला असेल तर त्या योजनांना प्राधान्य क्रमांक द्यावा लागेल, तो देवून टाका.
योजनेच्या अटी आणि शर्थी मान्य करा आणि अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करा.
आता या ठिकणी तुम्हाला २३.६० एवढे शुल्क भरावे लागणार आहे त्यासाठी make payment या बटनावर क्लिक करा.
पेमेंट करण्याचा पर्याय निवडा
proceed for payment या पर्यायावर क्लिक करा.
पेमेंट करण्याचे अनेक पर्याय या ठिकाणी तुम्हाला दिसेल तुम्हाला जो सोपा वाटेल तो पर्याय निवडणून पेमेंट करा. शक्यतो क्यूआर कोड हा पर्याय पेमेंट करण्यासठी वापरा कारण तो अधिक सोपा आहे.
स्क्रीनवर दिसत असलेला क़्युआर कोड फोन पे, गुगल पे किंवा तुम्ही पेमेंट करण्यासाठी जे app वापरता ते ओपन करून स्कॅन करा आणि पेमेंट करा.
आता या ठिकाणी पेमेंट पूर्ण झाले आहे.
पेमेंटची पावती प्रिंट करून घ्या. कॉम्प्युटरला प्रिंटर जोडलेला नसेल तर pdf मध्ये हि पावती सेव्ह करून घ्या.
अशा पद्धतीने तुम्ही बियाणे टोकन यंत्रासाठी अर्ज यशस्वीपणे सादर केला आहे.
अर्जाची सद्यस्थिती पहा
महा डीबीटीवर अर्ज सादर केल्यानंतर शासनाच्या वतीने दर हफ्त्याला लॉटरी पद्धतीने अर्ज निवडले जातात यामध्ये जर तुमच्या अर्जाची निवड झाली तर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एक संदेश येईल त्यानुसार पुढील कागदपत्रे अपलोड करून द्या.
तुम्हाला जर तुमच्या अर्जाची सद्यस्थिती बघायची असेल म्हणजेच अर्जाचे स्टेट्स बघायचे असेल तर मी अर्ज केलेल्या बाबी या पर्यायावर क्लिक करा.
छाननी अंतर्गत अर्ज या पर्यायावर क्लिक करा. या ठिकाणी तुम्हाला तुमच्या अर्जाचे तपशील दिसेल. अर्जाची पोहोच पावती देखील तुम्ही डाउनलोड करू शकता.
अशा पद्धतीने तुम्ही बियाणे टोकन यंत्रासाठी अर्ज सादर करू शकता.

दादाराव गावंडे हे digitaldg.in चे संस्थापक असून 2018 पासून महाराष्ट्रातील सरकारी योजना, शेतकरी योजना, महिला योजना आणि बांधकाम कामगार विषयांवर माहितीपर लेखन करत आहेत. ते शासन निर्णय (GR) आणि अधिकृत माहितींवर आधारित अचूक व सोप्या भाषेत माहिती देण्यावर भर देतात. ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत सरकारी योजनांची योग्य माहिती पोहोचवणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे.