पावर वीडर मशीन power weeder machine मजुराला पर्याय रोटाव्हेटर लोखंडी वखर तिफन 10 क्विंटलची ट्रॉली जोडा सर्व कामे एकाच यंत्राने

पावर वीडर मशीन power weeder machine मजुराला पर्याय रोटाव्हेटर लोखंडी वखर तिफन 10 क्विंटलची ट्रॉली जोडा सर्व कामे एकाच यंत्राने

जाणून घेवूयात पावर वीडर मशीन power weeder machine संदर्भात सविस्तर माहिती.

शेतीमध्ये ट्रॅक्टरने जर रोटाव्हेटर केले तर एकरी कमीत कमी 800 ते 1000 रुपये खर्च येतो, मात्र हेच काम तुम्ही पावर विडर मशीनच्या साहाय्याने केले तर ते केवळ 200 ते 300 रुपयात होऊ शकते.

मशीन बद्दल सविस्तर माहितीसाठी 9527008193 / 8888708809 किंवा 9970116070 या नंबरवर फोन करा.

या पावर विडर मशीनला 4 फुटाचे रोटाव्हेटर जोडता येते. प्रतीतास पाऊन लिटर पेट्रोल या प्रमाणे 2 तासामध्ये  एक एकर शेत रोटाव्हेटर करता येवू शकते अर्थात जमीन काळी आहे कि खडकाळ आहे यावर देखील हे प्रमाण कमी जास्त होऊ शकते.

बियाणे टोकन यंत्र मिळवा घरपोच शासकीय अनुदान पण मिळेल असा करा अनुदानासाठी अर्ज biyane token yantra 2024

पावर वीडर मशीन मशीनमुळे करता येणार सर्व कामे

केवळ रोटाव्हेटरच नव्हे तर या पावर वीडर मशीनला लोखंडी वखर, तिफन, समोरच्या बाजूला दोन बियाणे टोकन यंत्र, सरी काढण्याचे यंत्र, कोळपे, 7 HP शक्तीच्या या यंत्राला वाहतूक करण्यासाठी 10 क्विंटलची ट्रॉली देखील जोडता येते.

एवढेच नव्हे तर या मशीनला STP शाफ्ट असल्याने या मिशिनला औषधी फवारणी मशीन, जनरेटर, पाण्याचा पंप देखील लावता येतो.

हे मशीन कसे काम करते या संदर्भातील सविस्तर माहितीचा खालील व्हिडीओ पहा.

आता तुम्हाला जर प्रश्न पडला असेल कि मशीन तर लगेच घेवू पण जोडणी कोण करेल. खरे तर या मशीनची जोडणी करणे खूप सोपे आहे तुम्ही अगदी आरामात हि जोडणी करू शकता.

मशीन जोडणीसाठी साहाय्यक तुमच्या घरी येवू शकतो

पावर वीडर मशीन जोडणी करण्यासंदर्भात एक विशेष व्हिडीओ कृषी माहिती तंत्रज्ञान केंद्राच्या वतीने आपणासाठी बनविण्यात आला आहे. तो व्हिडीओ बघून तुम्ही जाणून घेवू शकता कि या मशीनची जोडणी कशी करावी.

तरी देखील तुम्हाला काही अडचण येत असेल तर तुम्हाला मदत करण्यासाठी कृषी माहिती तंत्रज्ञान केंद्राचा सहाय्यक तुमच्या घरी येवून जोडणी करून देईल त्यांची जी काही फीस असेल ती तुम्हाला द्यावा लागेल.

आमच्या फेसबुक पेजला भेट द्या.

मजुरीची समस्या लक्षात घेता शेतीसाठी हे पावर वीडर मशीन वरदान ठरणार आहे. जाणून घेवूयात या संदर्भातील सविस्तर माहिती.

मजुरीच्या समस्येवर प्रभावी उपाय

शेतीमध्ये सध्या सगळ्यात मोठी समस्या जर कोणती असेल तर ती मजुरीची आहे. शेतीमध्ये मजूर नसल्याने अनेकदा शेतकऱ्यांना बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागते.

शेतात निंदणी करणे कोळपणी करणे इत्यादी कामे करण्यासाठी मजूर लागतात. शिवाय काही ठिकाणी छोटा शेतरस्ता असल्याने अशा ठिकाणी बैल किंवा ट्रॅक्टर जात नाही त्यामुळे पिकांची कोळपणी किंवा वखरणी करणे अवघड होते.

अशावेळी तुम्ही जर पावर वीडर मशीनच्या सहाय्याने शेती केली तर तुम्हाला शेती अगदी सोपी जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *