जाणून घेवूयात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना mukhyamantri yuva kary prashikhsan yojna 2024,
लाडकी बहिण योजने नंतर आता शासनाने 12 वी उत्तीर्ण युवकांना 6 हजार रुपये प्रती महिना, आयटीआय किंवा doploma झालेल्या विद्यार्थांना 8 हजार रुपये प्रती महिना मिळेल.
ज्यांची पदवी झाली आहे अशा तरुणांना महिन्याला 10 हजार रुपये शासन त्यांच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट पेमेंट पद्धतीने जमा करणार आहे.
मुख्यमंत्री वयोश्री योजना अंतर्गत शासनाकडून मिळेल 3000 रुपये Mukhyamantri vayoshri yojana
या संदर्भातील शासन निर्णय हा नुकताच निर्गमित करण्यात आला आहे.
कसे मिळतील हे पैसे, कशी आहे योजना कोण आहेत पात्र जाणून घेवूयात या संदर्भातील सविस्तर माहिती.
कशी आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना
ग्रामीण भागातील अनेक तरुणांना नोकरी नसल्याने ते बेरोजगार झालेले आहेत. अशा तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी शासनाच्या वतीने मुख्यमंत्री युवा करी प्रशिक्षण योजना सुरु करण्यात आलेली आहे.
या योजनेमध्ये विविध कंपन्या आणि बेरोजगार युवक यांचा ताळमेळ घालून शासन बेरोजगार तरुणांना प्रशिक्षित करणार असून प्रशिक्षणा दरम्यान त्यांना दरमहा 6 हजार रुपयांपासून ते 10 रुपयांपर्यंत अनुदान देणार आहेत.
यामुळे बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळण्यास मदत होणार आहे.
योजनेसाठी कोण करू शकतो अर्ज
राज्यातील बेरोजगार तरुणांना नोकरी मिळावी यासाठी त्यांची नोकरी मिळविण्याची क्षमता वाढवावी या उद्देशाने हि योजना 2024-25 या वर्षासाठी राबविण्यात येत आहे.
1500 रुपये महिना मिळणार मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा जी आर GR आला
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी बारावी,आयटीआय, पदविका व पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेले बेरोजगार अर्ज करू शकतील.
योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करणे गरजेचे असणार आहे.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी पात्रता
अर्जदाराचे वय कमीत कमी 18 व जास्तीत जास्त 15 वर्षे असावे.
अर्जदाराची किमान किमान शैक्षणिक पात्रता जी आहे ती इय्यता 12 वी उत्तीर्ण, आयटीआय, पदविका, पदवी किंवा पदव्युत्तर असावी.
उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
उमेदवाराकडे आधार कार्ड असणे गरजेचे आहे.
बँक खात्याला आधार कार्ड लिंक असावा.
उमेदवाराने कौशल्य रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा.
कसे मिळतील पैसे कोठे करावा लागणार ऑनलाईन अर्ज
प्रशिक्षणार्थीच्या बँक खात्यात थेट ऑनलाईन पद्धतीने दर महिन्याला हे पैसे जमा करण्यात येईल.
विद्या वेतनामध्ये संबंधित उद्योजकामार्फत जाहीर केलेली सुट्टी, रजा याचा अंतर्भाव राहील.
या योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी महिन्यातून दहा दिवस अथवा त्यापेक्षा जास्त दिवस गैरहजर असला तर संबंधित प्रशिक्षणार्थीला त्या महिन्याचे विद्यावेतन मिळणार नाही.
योजनेच्या दरम्यान प्रशिक्षणार्थी कायम किंवा नियमित स्वरूपाचा रोजगार अथवा स्वयंरोजगार प्राप्त झाल्यास अथवा प्रशिक्षण सोडून गेल्यास अथवा अनधिकृत गैरहजर राहिल्यास या योजनेअंतर्गत प्रशिक्षण व त्या अनुषंगाने विद्यावेतन घेण्यासाठी पात्र राहणार नाही.
या योजनेसाठी लवकरच कौशल्य व रोजगार उद्योजकता विभागाकडून ऑनलाइन अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे.