Pico fall silai machine लाडकी बहिण योजनेच्या नादात शिलाई मशीन योजनेचा अर्ज विसरू नका

Pico fall silai machine लाडकी बहिण योजनेच्या नादात शिलाई मशीन योजनेचा अर्ज विसरू नका

Pico fall silai machine arj last date 15 july 2024

अनेक बेरोजगार जिल्हा परिषद योजना अंतर्गत Pico fall silai machine  या योजनेचा लाभ मिळणार आहे. जिल्हा परिषद संभाजीनगर यांच्या वतीने शिलाई मशीन योजनेचा अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख १५ जुलै २०२४ ह इ देण्यात आली आहे.

सध्या अनेकजन लाडकी बहिण योजनेचा अर्ज करण्यात व्यस्त असून अशामध्ये तुम्ही जर छत्रपती संभाजीनगर मधील असाल तर तुम्हाला शिलाई मशीनचा देखील लाभ मिळू शकतो.

जिल्हा परिषद योजना 2024 सुरु 100 टक्के अनुदानावर मिळणार लॅपटॉप पिको फॉल शिलाई मशीन मिरची कांडप यंत्र घरकुल योजना

हि योजना प्रत्येक जिल्ह्यामध्ये लागू आहे. ज्या त्या जिल्ह्याची अर्ज स्वीकारण्याची तारीख हि मागेपुढे होऊ शकते.

Pico fall silai machine शासकीय अनुदानावर खरेदी करून सुरु करा तुमचा व्यवसाय

तुमच्या तालुक्यातील पंचायत समिती येथे Pico fall silai machine साठी अर्ज करता येणार आहे. ग्रामीण भागातील बेरोजगार महिलांना या योजनेचा लाभ घेवून त्यांचा अर्ज सादर करून स्वतः व्यवसाय उभारता येणार आहे.

ग्रामीण भागामध्ये अनेक महिला बेरोजगार आहेत. या महिलांना जर आर्थिक पाठबळ मिळाले तर त्या स्वतःचा उद्योग व्यवसाय सरू करू शकतात.

अशावेळी तुम्ही जर शिलाई मशीन व्यवसाय सुरु करू इच्छित असाल आणि तुम्हला आर्थिक भाग भांडवल नसेल तर तुम्ही शासकीय अनुदानावर शिलाई मशीन खरेदी करू शकतात आणि आपला व्यवसाय सरू करू शकता.

Pico fall silai machine मशीनसाठी कोठे कराल अर्ज

हि योजना सध्या संभाजी नगर जीह्यामध्ये सुरु आहे. हीच योजना सर्व जिल्ह्यांमध्ये सुरु असते त्या योजनेसाठी अर्ज करण्याचा कालावधी मागे पुढे होऊ शकतो त्यामुळे तुमच्या जिल्ह्यात देखील हि योजना सुरु होणार आहे.

झेरॉक्स मशीन योजना 2024 xerox machine yojana योजनेसाठी लागणारा अर्ज pdf मध्ये उपलब्ध.

सध्या हि योजना छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यामध्ये सुरु असून यासाठी ऑफलाईन अर्ज करावा लागणार आहे.

तुमच्याकडे जर शिलाई मशीनसाठी लागणारा ऑफलाईन अर्ज नसेल तर खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही हा अर्ज डाउनलोड करू शकता.

शिलाई मशीन pdf अर्ज डाउनलोड लिंक

पंचायत समिती कार्यालयामध्ये शिलाईमशीन योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारा अर्ज तुम्हाला सादर करावा लगणार आहे.

हा अर्ज pdf मध्ये उपलब्ध करून देण्यात आल आहे. खालील बटनावर क्लिक करून हा अर्ज तुम्ही तुमच्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरमध्ये डाउनलोड करू सकता.

वरील अर्ज डाउनलोड झाल्यावर संबधित विभागास सादर करून द्या आणि अर्ज सादर केल्याची पावती तुमच्याकडे असू द्या.

कोण आहेत या योजनेसाठी पात्र

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, नवबौद्ध घटकातील अर्जदार या योजनेसाठी अर्ज करू शकतात.

सन 2024-25 या आर्थिक वर्षात जि.प. 20 टक्के उपकारांतर्गत मागासवर्गीय महिलांना Pico fall silai machine अनुदानावर दिल्या जाणार आहेत.

ओपन कॅटेगरीतील महिला या योजनेसाठी पात्र नसणार आहेत.

कोणती लागणार कागदपत्रे

योजनेचा लाभ घेण्यासाठी जी कागदपत्रे लागणार आहेत ती खालीलप्रमाणे आहे.

शिवणकाम करत असल्याचा ग्रामसेवक यांचा दाखला.

जातीचा दाखला.

तहसीलदार यांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र. (१ लाख रुपयांपर्यंतचे)

दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र.

ग्रामसेवक यांनी दिलेला रहिवाशी दाखला.

आधार कार्ड बँक पासबुक व इतर कागदपत्रे

या योजनेचा लाभ घेतला नसल्याचे ग्रामसेवक यांनी दिलेले प्रमाणपत्र.

लाभार्थीच्या कुटुंबातील सदस्याने या योजनेचा लाभ घेतला नसल्याचे प्रमाणपत्र.

लाभार्थीला या योजनेचा लाभ देण्यात यावा या संदर्भातील ग्रामसेवकांचे प्रमाणपत्र.

आधारकार्डची झेरॉक्स प्रत.

बँक खाते पासबुकची झेरॉक्स प्रत.

गट विकास अधिकारी यांचे शिफारसपत्र.

इत्यादी कागदपत्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक आहे. सदरील योजनेसाठी १५ जुलै २०२४ पर्यंत अर्ज करता येणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *