मुख्यमंत्री वयोश्री योजना ऑनलाईन अर्ज सुरु झाले असून तुम्ही अगदी तुमच्या मोबाईलवरून देखील करू शकता.
ज्यांचे वय ६५ वर्षापेक्षा जास्त आहे अशा जेष्ठ नागरिकांच्या बँक खात्यामध्ये ३ हजार रुपये शासन जमा करणार आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आज म्हणजेच दिनांक ३१ ऑक्टोबर २०२४ हि आहे.
तुम्ही ज्या जिल्ह्यातील असाल त्या जिल्ह्याच्या समाज कल्याण विभामध्ये हा अर्ज सादर करायचा आहे.
जाणून घेवूयात या संदार्भातील सविस्तर माहिती.
लाडकी बहिण योजनेसाठी कागदपत्रे अशा पद्धतीने करा अपलोड नाहीतर अर्ज होऊ शकतो बाद शासनाच्या नवीन सूचना
वयोश्री योजना ऑनलाईन अर्ज सुरु
लाडकी बहिण योजना अंतर्गत महिलांना १५०० रुपये प्रती महिना तर मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण कार्यक्रम योजने अंतर्गत तरुणांना १० हजार रुपये प्रती महिना मिळणार आहेत.
आता नंबर आहे तो जेष्ठ नागरिकांचा. जेष्ठ नागरिकांना आता मुख्यमंत्री वयोश्री योजना अंतर्गत 3 हजार रुपयाचा लाभ मिळणार असून आता यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन अर्जाची लिंक, जी आरची लिंक आणि pdf स्वरूपातील अर्जाची लिंक असी सविस्तर माहिती देणार आहे जेणे करून तुम्ही या योजनेचा लाभ घेवू शकाल.
मुख्यमंत्री वयोश्री योजना अंतर्गत शासनाकडून मिळेल 3000 रुपये Mukhyamantri vayoshri yojana 2024
ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी जाणून घ्या काय आहे लाभार्थी पात्रता
३१ डिसेंबर २०२३ रोजी ज्यांचे वय ६५ आहे किंवा त्यापेक्षा जास्त आहे असे नागरिक या योजनेसाठी पात्र असणार आहेत.
अर्जदार व्यक्तीकडे त्यांचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे आधार कार्ड नसेल तर कमीत कमी आधार कार्डसाठी अर्ज केलेला असावा आणि त्या संदर्भातील पावती असली तरी अर्ज करता येईल.
अर्जदार व्यक्तीकडे आधार कार्ड नसले तरी अर्ज करता येईल मात्र त्याएवजी असे डॉक्युमेंट्स पाहिजे ज्याद्वारे त्यांची ओळख पटविता येईल.
अर्जदाराचे उत्पन्न २ लाख रुपयांच्या आत असावे या बाबतचे अर्जदाराचे घोषणापत्र आवश्यक राहील.
लाभार्थीच्या खात्यामध्ये थेट ३ हजार रुपये जमा केले जाणार आहेत त्या ३ हजार रुपयांमध्ये 1. चष्मा 2. श्रवणयंत्र 3. ट्रायपॉड, स्टिक व्हील चेअर 4. फोल्डिंग वॉकर 5. कमोड खुर्ची 6. नि- ब्रेस 7. लंबर बेल्ट 8. सर्वाइकल कॉलर इत्यादी पैकी एक साहित्य खरेदी केल्याचे बिल उपलब्ध करून दिलेल्या पोर्टलवर अपलोड करणे गरजेचे आहे.
जर हे साहित्य नाही घेतले तर हि रक्कम अर्जदाराकडून वसूल करण्यात येईल.
वयोश्री योजना ऑनलाईन अर्ज लागणारी कागदपत्रे
अर्जदाराचे आधार कार्ड किंवा मतदान कार्ड.
राष्ट्रीयकृत बँकेत खाते असलेल्या बँक पासबुकची झेरॉक्स.
पासपोर्ट आकाराचे दोन फोटो.
उत्पन्नाचा दाखला.
उत्पन्नाचे स्वयंघोषणापत्र.
साहित्याबाबतचे स्वयंघोषणापत्र.
हि सर्व कागदपत्रे प्रिंट करून त्यावर स्वयं साक्षांकित केलेले असावे.
असा करा मुख्यमंत्री वयोश्री अर्ज
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शासनाकडून एक लिंक देण्यात आली आहे. या लिंकवर क्लिक करा.
लिंकवर क्लिक करताच एक गुगलफॉर्म ओपन होईल त्यामध्ये सविस्तर माहिती तुम्हाला सादर करायची आहे.
हा अर्ज कसा सादर करावा कोणकोणती कागदपत्रे या सोबत जोडावी लागणार आहे तसेच pdf फॉर्म कोठून डाउनलोड करावा आणि कोठे पाठवावा या संदर्भातील A to Z माहितीचा एक व्हिडीओ खासकरून तुमच्यासाठी बनविण्यात आला आहे.
खालील व्हिडीओ पहा आणि त्या प्रमाणे अर्ज सादर करून या योजनेचा लाभ घ्या.
मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुख्यमंत्री वयोश्री योजनेची घोषणा मंत्री मंडळ बैठकीमध्ये करण्यात आली होती या संदर्भातील खालील लिंक पहा. वयोश्री योजना ऑनलाईन अर्ज
शासनाने ऑनलाई अर्ज सादर करण्याचे आवाहन केले व लिंक प्रकाशित केली त्या वेबसाईटची लिंक
मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा जी आर पहा.
ऑफलाईन अर्ज डाउनलोड करा.
अर्ज सादर करतांना तुम्हाला अर्ज सादर केल्या संदर्भातील पोच पावती घ्यावी लागणार आहे. पोच पावतीचा अर्ज खाली दिला आहे तो डाउनलोड करून घ्या.
अशा प्रकारे तुम्ही वयोश्री योजनेचा अर्ज सादर करू शकता.