बांधकाम कामगार शिष्यवृत्तीसाठी कागदपत्रे डाउनलोड कशी करावीत जाणून घघेवूयात या संदर्भातील सविस्तर माहिती.
तुम्ही जर नोंदणीत बांधकाम बांधकाम कामगार असाल तर मुलांना कामगार विभागाकडून शिष्यवृत्ती मिळते.
शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी ऑनलाईन अर्ज करतांना कोणकोणती कागदपत्रे लागतात या संदर्भात आपण या ठिकाणी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजना संदर्भात आपण या अगोदरच माहिती घेतलेली आहे. परंतु बांधकाम कामगार शिष्यवृत्ती वेगवेळी असते आणि आपसूकच यासाठी कागदपत्रे देखील वेगवेगळी लागतात.
तुमचा मुलगा किंवा मुलगी इयत्ता १ ते १० वी दरम्यान शिक्षण घेत असेल तर बांधकाम कामगार विभागाकडून शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात जाणून घेवूयात या संदर्भात सविस्तर माहिती.
खालील योजनेचा पण लाभ घ्या.
बांधकाम कामगार संसार बाटली जी आर डाउनलोड करा sansar batli GR 2024
1 ली ते 10 मध्ये शिकत असलेल्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी लागणारी कागदपत्रे
बांधकाम कामगार योजना अंतर्गत शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी म्हणजेच शिष्यवृत्तीचा अर्ज सादर करण्यासाठी खालील कागदपत्रे लागतात.
- मागील वर्षाचे शाळेमध्ये ७५ टक्के उपस्थिती असल्याचे प्रमाणपत्र.
- पाल्याचे बोनाफाईड प्रमाणपत्र.
- मुलाचे आधार कार्ड.
- शिधा पत्रिका.
- स्वयंघोषणा पत्र (ऑनलाईन आवश्यक नाही परंतु व्हेरिफिकेशन करतांना लागते)
वरील कागदपत्रे असतील तर तुम्ही बांधकाम कामगार योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.
खालील योजना पण पहा
बांधकाम कामगारांना 1 लाख रुपये मिळेल पण कसे पहा सविस्तर माहिती
बांधकाम कामगार शिष्यवृत्तीसाठी कागदपत्रे 75 टक्के उपस्थिती, बोनाफाईड प्रमाणपत्र व स्वयंघोषणा प्रमाणपत्राचा ओरीजनल नमुना डाउनलोड करा
वरती जी कागदपत्र सांगितलेली आहेत त्यापैकी दोन कागदपत्रे तुम्ही सादर करू शकता.
परंतु तुम्हाला जर ७५ टक्के उपस्थिती प्रमाणपत्र, बोनाफाईड प्रमाणपत्र व स्वयं घोषणापत्र कोठे मिळेल असा प्रश्न पडला असेल तर या दोन्ही कागदपत्रांचा ओरीजनल नमुना तुम्हला खाली देत आहोत.
खालील बटनावर क्लिक करून हा नमुना तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करू शकता.
खालील बटनावर क्लिक करून बोनाफाईड सर्टिफिकेट डाउनलोड करून घ्या.
खालील बटनावर क्लिक करून स्वयंघोषणापत्र डाउनलोड करा.
हि सर्व कागदपत्रे तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्या प्रिंट काढून घ्या आणि त्यावर आवशयक सह्या आणि शिक्के मारून घ्या.
शिष्यवृत्ती योजनेसाठी स्वतः अर्ज कसा करावा
बांधकाम कामगार योजना अंतर्गत शिष्यवृत्ती योजनेसाठी ऑनलाईन अर्ज मोबाईलवरून कसा करावा या संदर्भातील सविस्तर माहितीसाठी खालील व्हिडीओ पहा.
व्हिडीओ पहा
खालील व्हिडीओ बघितल्यावर तुम्ही स्वतः शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करू शकाल.
वरील सर्व कागदपत्रे डाउनलोड करून घ्या शिष्यवृत्ती ऑनलाईन अर्ज करतांना हि कागदपत्रे तुम्हाला अपलोड करायची आहेत.
वेगवेगळ्या प्रकारची शिष्यवृत्ती असल्याने त्यासाठी कागदपत्रे देखील वेगवेगळी असतात त्यामुळे तुम्ही कोणत्या इयत्तेसाठी अर्ज करत आहात त्यावर कागदपत्रे कमी जास्त होत असतात.
उदाहरणार्थ तुमचा पाल्य जर १ ली ते ७ वी पर्यंत शिक्षण घेत असेल तर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करतांना उपस्थिती प्रमाणपत्र अपलोड करावे लागते.
परंतु हाच शिष्यवृत्तीचा ऑनलाईन अर्ज १० वी किंवा १२ वीच्या मुलाचा असेल तर त्यासाठी ७५ टक्के उपस्थिती प्रमाणपत्राची आवश्यकता नसते.
अशा पद्धतीने बांधकाम कामगार शिष्यवृत्तीसाठी कागदपत्रे तुम्ही डाउनलोड करू शकता.