पाहूयात अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना Punyashlok ahilyadevi holkar mahila startup scheme संदर्भातील सविस्तर माहिती.
शहरासह ग्रामीण भागातील महिलांची आर्थिक उन्नती व्हाव्ही या उद्देशाने शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना राबविण्यास मंजुरी दिलेली आहे.
या संदर्भातील शासन निर्णय दिनांक ९ जुलै २०२४ रोजी निर्गमित करण्यात आला आहे. महिलांना स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरु करण्यासाठी शासनाकडून कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
यासाठी अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना अंतर्गत महिलांना कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे.
जाणून घेवूयात या संदर्भातील सविस्तर माहिती.
खालील माहिती पण कामाची आहे.
annasaheb patil loan बिनव्याजी 1 लाखाचे कर्ज मिळणार
अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना अंतर्गत किती मिळणार लोन
या योजने अंतर्गत महिलांना शासनाकडून १ लाख रुपयांपासून ते २५ लाख रुपयांपर्यत आर्थिक सहाय्य मिळणार आहे.
कोणत्याही उद्योग किंवा व्यवसायाचा विस्तार करायचा असेल तर त्यासाठी आर्थिक पाठबळ असणे खूपच गरजेचे आहे.
त्यामुळे या योजनेतून महिलांना आर्थिक सहाय्य उपलब्ध झाल्याने त्यांना त्यांचा उद्योग व्यवसाय सुरु करणे सोपे होणार आहे. राज्यातील महिला स्टार्टअप्सला स्वावलंबी बनविणे हा या योजनेचा उद्देश आहे.
काय आहे योजनेची पात्रता
या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांचा उद्योग व्यवसाय नोंदणीकृत असणे गरजेचे आहे.
जे एखादा स्टार्टअप असेल तर त्या स्टार्टअप्समध्ये महिलांचा ५१ टक्के वाटा असणे गरजेचे आहे.
महिलांची स्टार्टअपची नोंद १ वर्षापूर्वीची असावी.
स्टार्टअप्सची वार्षिक उलाढाल हि १० लाख ते १ कोटीपर्यंत असावी.
या अगोदर शासनाच्या कोणत्याही अनुदान स्वरूपातील योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
कोठे कराल अर्ज
तुमचा महिला स्टार्टअप असेल आणि तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर http://www.msins.in/ या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.
कंपनीचा प्रस्ताव किंवा कंपनीची नोंदणी MCA, DPIIT अंतर्गत झालेली असावी.
जे अर्ज प्राप्त होणार आहेत त्यापैकी जे स्टार्टअप रोजगार निर्मिती करणार आहेत त्यांना विशेष प्राधान्य देण्यात येणार आहेत.
या संदर्भातील शासन निर्णय बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
अशा पद्धतीने तुम्ही महिला स्टार्टअप योजना अंतर्गत लाभ घेवू शकता आणि तुमच्या उद्योगाला चालना देवू शकता.
तुमचा देखील स्टार्टअप असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेवू शकता.
सविस्तर माहितीसाठी खालील व्हिडीओ देखील पाहू शकता.