सोयाबीनला मिळणार चांगला भाव शासनाचा निर्णय

सोयाबीनला मिळणार चांगला भाव शासनाचा निर्णय

या वर्षी सोयाबीनला मिळणार चांगला भाव पहा सविस्तर माहिती.

शेतकरी बांधवांच्या सोयाबीन पिकला यावर्षी चांगला भाव मिळणार आहे कारण केंद्र सरकारने तेल आयात शुल्क २० टक्के वाढविला आहे.

बऱ्याच शेतकरी बांधवानी मुख्य पिक म्हणून सोयाबीन पिकांची पेरणी यावर्षी केलेली आहे. परंतु सोयाबीनला योग्य भाव मिळेल का अशी चिंता शेतकरी बांधवाना लागलेली असतांना आता मात्र एक चांगली बातमी आलेली आहे.

कच्चे खाद्यतेल यावर पूर्वी 5.5% आयात शुल्क आकारण्यात आलेले होते. आता मात्र हे शुल्क 27.5% असेल.

अशाच पद्धतीने रिफाइंड तेलावरील आयात शुल्क सुद्धा वाढविण्यात आलेले आहे. या पूर्वी रिफाईंड तेलावर 13.75 आयात शुल्क होते ते आता 35.75 टक्के इतके वाढविण्यात आलेले आहे.

खालील योजनेचा पण लाभ घ्या.

बांधकाम कामगार शिष्यवृत्तीसाठी कागदपत्रे लागतात pdf मध्ये डाउनलोड करून घ्या

लागवडीत वाढ सोयाबीनला मिळणार चांगला भाव

यावर्षी म्हणजेच 2024 च्या खरीप सीजनमध्ये 52 हजार हेक्टरवर शेतकरी बांधवानी त्यांच्या शेतामध्ये सोयाबीन पिकांची लागवड केलेली आहे.

अनेक शेतकरी बांधवांचे मुख्य पिक हे सोयाबीन पिक आहे त्यामुळे या वर्षी जर सोयाबीन पिकाला चांगला भाव मिळाला तर शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा होऊ शकतो.

नुकतेच शासनाने तेलावरील आयात शुल्क वाढविल्याने सोयाबीनला यावर्षी चांगला भाव मिळणार असल्याचे संकेत मिळालेले आहेत.

शासनाकडून सोयाबीनला 4892 रुपये हमी भाव जाहीर

केंद्र सरकारने महाराष्ट्रामधील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे सोयाबीन किमान हमीभावाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.

यामुळे आता नाफेड मार्फत शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी केली जाणार आहे. 

आगामी 90 दिवसांमध्ये केंद्र सरकार नाफेड आणि NCCF मार्फत 4892 रुपये प्रती क्विंटल भावाने महाराष्ट्रातला सोयाबीन खरेदी करणार आहे.

यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळण्याची आशा निर्माण झालेली आहे.

सोयाबीनच्या उत्पादनात वाढ होण्याची शक्यता

यावर्षी महाराष्ट्रामध्ये सगळीकडे पाऊस उत्तम असल्याने सोयाबीन पिकांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणत वाढ होण्याची शक्यता आहे.

मध्यंतरी झालेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्याच्या शेतातील पिकांचे अतोनांत नुकसान सुद्धा झालेले आहे.

तुम्ही देखील तुमच्या शेतामध्ये सोयाबीन पेरलेली असेल तर तुमच्यासाठी हि आनंदाची बातमी ठरणार आहे.

पावसामुळे सोयाबीनचे नुकसान झाले असेल तर करा तक्रार

तुमच्या शेतातील सोयाबीन पिकांचे पावसामुळे नुकसान झाले असेल तर तुम्ही तुमच्या मोबाईलवरून पिक विमा कंपनीस पिक नुकसानीची सूचना देवू शकता.

या संदर्भातील सविस्तर माहितीचा खालील व्हिडीओ पहा

पिक विमा कंपनीस पिक नुकसानीची माहिती दिली तरच तुम्हाला अनुदान मिळणार आहे. जर नुकसानीची माहिती दिली नाही तर तुम्हाला या अनुदान योजनेचा लाभ मिळणार नाही.

अधिकृत माहितीची लिंक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *