मागेल त्याला सौर कृषी पंप योजना असा करा ऑनलाईन अर्ज मोबाईलद्वारे magel tyala saur krushi pump yojana

मागेल त्याला सौर कृषी पंप योजना असा करा ऑनलाईन अर्ज मोबाईलद्वारे magel tyala saur krushi pump yojana

सगळीकडे सध्या मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचे magel tyala saur krushi pump yojana अर्ज जोरात सुरु आहे.

परंतु तुम्हाला जर सीएससी सेंटरवर जायला जमत नसेल तर तुम्ही हा मागेल त्याला कृषी पंप योजनेचा अर्ज अगदी मोबाईलद्वारे देखील सादर करू शकता.

मोबाईलचा उपयोग करून तुम्ही जर शेतात असाल तर अगदी शेतातून तुम्ही या मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचा लाभ घेवू शकता.

या लेखाच्या सर्वात शेवटी एक व्हिडीओ दिलेला आहे या व्हिडीओमध्ये मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचा अर्ज कसा करावा या संदर्भात सविस्तर माहिती अगदी उदाहरणासहित देण्यात आलेली आहे.

सौर कृषी पंपासाठी किती भरावे लागेल लाभार्थी हिस्सा

अर्जदार शेतकरी जर एससी किंवा एस टी प्रवर्गातील असेल तर अशा शेतकरी बांधवाना सौर पंपाच्या एकूण किमतीच्या ५ टक्के रक्कम लाभार्थी हिस्सा म्हणून भरावी लागणार आहे.

अर्जदार जर खुल्या प्रवर्गातील असेल तर मात्र पंपाच्या एकम किमतीच्या १० टक्के रक्कम शासनास भरावी लागणार आहे.

कोणत्या पंपासाठी किती रक्कम भरावी लागेल तसेच कोणता पंप किती रकमेचा आहे या संदर्भातील सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

सोलर पंप किंमत जाणून घ्या किती आहे किती भरावी लागणार solar pump price

मोबाईलद्वारे करता येईल मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज

तुम्ही अगदी तुमच्या मोबाईलवरून सौर कृषी पंप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकता.

ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी खालील कागदपत्रे तुमच्याकडे तयार ठेवा.

आधार कार्ड.

बँक पासबुक.

फोटो.

सातबारा उतारा ज्यावर विहीर किंवा बोअर अर्जदाराच्या नावे नोंद असावी.

संमती पत्र. विहिरी किंवा बोअर सामाईक असेल तर अशावेळी इतर शेतकऱ्यांची संमती असल्याचे संमतीपत्र

सौर कृषी पंप योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला डिजिटल सातबारा डाउनलोड करावा लागतो.

अर्ज कसा करावा या संदर्भातील सविस्तर माहितीसाठी खालील व्हिडीओ पहा.

सोलर पंप किती प्रेशरने पाणी मारतो या संदर्भातील व्हिडीओ पहा

अनेकांना मध्यंतरी असा गैरसमज झाला होता कि सोलर पंप अगदी कमी क्षमतेने पाणी उपसा करतो. या गोष्टीची शहानिशा करण्यासाठी डिजिटल डीजी टीम ज्या शेतकरी बांधवानी त्यांच्या शेतामध्ये सोलर पंप उभारला आहे त्यांच्या शेतात गेली आणि शेतकरी बांधवांकडून या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेतली.

या संदर्भातील माहितीचा खालील व्हिडीओ पहा.

तुम्हाला देखील मागेल त्या सौर कृषी पंप योजना अंतर्गत सोलर पंप हवा असेल तर लगेच तुमच्या मोबाईलवरून ऑनलाईन अर्ज सादर करून द्या.

ऑनलाईन अर्ज लिंक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *