मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचा लाभ घेण्यासाठी सातबारा उताऱ्यावर विहीर किंवा बोअरची नोंद असणे आवश्यक आहे.
विहीर किंवा बोअर सामाईक असेल तर त्यासाठी एक संमतीपत्र लागते हे संमतीपत्र कसे असते याचा नमुना खालील दिलेला आहे जेणे करून तुम्हाला जर मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी अडचण येवू नये.
बऱ्याच वेळेस सोशल मिडीयावर हे संमती पत्र नमुना तुम्हाला मिळतो परंतु यामध्ये काही चुका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे जी जाणकार व्यक्ती असेल किंवा जे दररोज संमतीपत्र असेल किंवा या संदर्भात काम करत असेल तर अशा व्यक्तींना या संदर्भात पूरेपर माहिती असल्याने त्यामध्ये चुका होण्याची शक्यता फार कमी असते किंबहुना नसल्यातच जमा होते.
संमतीपत्राचा ओरिजिनल नमुना
या लेखाच्या सर्वात शेवटी तुमची जर सामाईक विहीर असेल तर त्यासाठी संमतीपत्र कसे असते या संदर्भातील नमुना दिलेला आहे तो तुम्ही बघू शकता.
या संमतीपत्रावर जो शेतकरी मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेसाठी अर्ज करत आहे त्यांनी त्यांच्या विहिरीमध्ये सामाईक क्षेत्रामध्ये हकदार असलेल्या शेतकऱ्यांकडून कोणत्याप्रकारची माहिती लिहून घ्यायची आहे या संदर्भात सविस्तर माहिती दिलेली आहे.