दुग्धव्यवसाय करून मिटवा बेरोजगारी. जणू घेवूयात या संदर्भातील सविस्तर माहिती.
तुम्ही जर बेरोजगार तरुण असाल तुमच्या हाताला काम नसेल तर तुम्ही दुग्धव्यवसाय करून बेरोजगारीवर मात करू शकता.
ग्रामीण भागातील युवा तरुणांनी शेती व्यवसाय करण्याबरोबरच दुग्ध व्यवसायाकडे देखील वळले पाहिजे. फक्त शेती केली आणि ती जर तोट्यात आली तर अशावेळी तुम्हाला तुमचा शेतीपूरक व्यवसाय आर्थिक संकटातून तारू शकेल.
त्यामुळे दुग्ध व्यवसाय हा शेतीपूरक खूप छान असा व्यवसाय आहे. दुग्धव्यवसाय केल्यास गायींपासून शेण मिळते. शेतीला सेंद्रिय खत मिळते. शिवाय दुधावर विविध प्रक्रिया करून दुधाचे मूल्यवर्धन करून तुम्ही अजून जास्त नफा मिळू सकता.
दुग्धव्यवसाय करून मिटवा बेरोजगारी शासकीय अनुदानाचा लाभ घ्या.
हा व्यवसाय करण्यासाठी गायी किंवा म्हशी खरेदी कराव्या लागतात यासाठी शासनाकडून अनुदान देखील मिळते. सुरुवातील २ नंतर ३ अशा पद्धतीने गायी वाढवत तुम्ही शेतीला जोड व्यवसाय म्हणून दुग्धव्यवसाय करू शकता आणि तुमच्या बेरोजगारीवर मत करू शकता.
दुग्धव्यवसाय सुरु करण्यासाठी गाय आणि म्हैस खरेदी करण्यासाठी शासन आता अधिक अनुदान देणार आहे या संदर्भातील सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
गाय म्हैस अनुदान वाढले गाय 70 म्हशीसाठी 80 हजार अनुदान
गाय गोठ्यासाठी मिळते अनुदान
तुम्हाला जर दुग्ध व्यवसाय सुरु करायचा असेल आणि त्यासाठी गोठा बांधकाम करण्यासाठी अनुदान हवे असेल तर त्यासाठी देखील अनुदान मिळते.
गाय गोठा अनुदान संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.
वरील बटनावर क्लिक करून गाय गोठा अनुदान संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घ्या आणि त्या प्रमाणे अनुदान मिळवा जेणे करून तुम्हाला तुमचा दुग्ध व्यवसाय सुरु करणे सोपे जाईल.
शेतीतील उत्पन्न वाढविण्यासाठी सेंद्रिय खताची आवश्यकता.
सध्या सेतीमध्ये वारेमाप रासायनिक खतांचा भडीमार सुरु आहे. तुम्ही जर दुग्धव्यवसाय केला आणि त्यातून मिळणाऱ्या सेंद्रिय खतावर प्रक्रिया करून गांडूळ खते निर्मिती केली तर तुमच्या शेतीतील उत्पन्नात वाढ होईल.
रासायनिक खतांमध्ये मानवासह प्राण्यांचे आयुष्य धोक्यात आले आहे. अशावेळी शेतीमध्ये रासायनिक खतांची खूपच गरज निर्माण झाली आहे.
हरित क्रांतीमुळे शेतीमध्ये रासायनिक खतांचा उपयोग वाढला अर्थात त्यावेळी अन्नधान्य निर्मिती मोठ्या प्रमाणात करणे गरजेचे होते त्यामुळे रासायनिक खतांची गरज होती परंतु आता मात्र शेतीमधील रासायनिक खतांचा वापर अति झाल्याने जमीन नाकारता होऊन नापीक होत आहे.
दुग्धव्यवसाय केल्याने मोठ्या प्रमाणात शेणाची उपलब्धता होईल आणि यामधून अनेक प्रकारच्या सेंद्रिय खतांची निर्मिती करता येईल. अशा प्रकारे दुग्धव्यवसाय करून मिटवा बेरोजगारी.
आमच्या फेसबुक पेजला भेट द्या.