जाणून घेवूयात विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी या वेबसाईटवर नोंदणी कशी करावी mahadbt farmer registration.
शेतकऱ्यांना महाडीबीटी या वेबसाईटद्वारे विविध योजनांचा लाभ दिला जातो. तुम्ही जर शेतकरी असाल तर तुम्हाला अनेक योजनांचा लाभ मिळतो.
या लेखाच्या सर्वात शेवटी एक व्हिडीओ देण्यात आलेला आहे यामध्ये अर्ज कसा सादर करावा या संदर्भात सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. तो व्हिडीओ बघून शेतकरी स्वतःची नोंदणी करू शकतात.
महाडीबीटी वेबसाईटवर आहेत अनेक योजना शेतकरी स्वतः करू शकतात अर्ज.
महाडीबीटी योजनेतून शेतकरी बांधवाना अनेक योजनांचा लाभ दिला जातो. यामधील काही योजना खालीलप्रमाणे.
ट्रॅक्टर योजना.
मळणी यंत्र.
ठिबक व तुषार संच.
पेरणी यंत्र.
विद्युत मोटार.
विहीर बांधकाम अनुदान.
बियाणे व खते.
टोकन यंत्र.
रोटाव्हेटर.
अजून अशा बऱ्याच योजना आहेत ज्या शेतकरी बांधवाना शासकीय अनुदानावर दिल्या जातात. या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करावा लागतो.
खालील योजनेचा पण लाभ घ्या.
बियाणे टोकन यंत्र अर्ज सुरु ५० टक्के मिळेल शासनाकडून सबसिडी
mahadbt farmer registration कोण करू शकतो नोंदणी
महाडीबीटी शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी कोणतेही विशेष असे लायसेन्स लागत नाही. शेतकरी बांधव स्वतः या योजनेसाठी अर्ज करू शकतात शिवाय इतरांचे अर्ज देखील सादर करू शकतात.
फक्त अर्ज सादर करण्यासाठी सगळ्यात महत्वाचे म्हणजे शेतकऱ्यांना त्यांची नोंदणी करावी लागते mahadbt farmer registration. महाडीबीटी नोंदणी अगदी मोफत असते यासाठी कोणतेही शुल्क लागत नाही.
नोंदणी करतांना कोणकोणती माहिती सादर करावी लागते या संदर्भातील संपूर्ण माहिती खालील व्हिडीओमध्ये दिली आहे तो व्हिडीओ काळजी पूर्वक पहा.
महाडीबीटी वेबसाईटवर नोंदणी करण्यासाठी लागणारी कागदपत्रे mahadbt farmer registration documents.
विविध योजनांचा लाभ मिळविण्यासाठी महाडीबीटी वेबसाईटवर नोंदणी करावी लागते. नोंदणी करण्यासाठी जी कागदपत्रे लागतात ती खालीलप्रमाणे आहे.
- आधार कार्ड.
- जमिनीचा सातबारा.
- जमिनीचा ८ अ.
- सक्रीय मोबाईल नंबर.
वरील सर्व कागदपत्रे तयार असल्यावर mahadbt वेबसाईटवर नोंदणी करण्यास सुरुवात करा. वरती व्हिडीओ दिलेला आहे त्या व्हिडीओमध्ये सांगितलेली पद्धत अवलंबवा.
तुषार सिंचन योजनेसाठी आला २०० कोटी निधी पहा जी आर.
योजनेसाठी अर्ज कसा करावा
महाडीबीटी वेब पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर तुम्हाला युजर आयडी आणि पासवर्ड मिळतो. या युजर आयडी आणि पासवर्डच्या सहाय्याने किंवा आधार otp च्या सहाय्याने देखील तुम्ही लॉगीन करू शकता. अर्थात वरील व्हिडीओमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज देखील करून दाखविण्यात आला आहे.
लॉगीन केल्यावर खालील पद्धतीचा अवलंब करा.
- अर्ज करा या लिंकवर क्लिक करा.
- बाब निवडा.
- अर्ज ओपन होईल अर्जामध्ये योग्य ती माहिती सादर करा.
- आता अर्ज जतन करा.
- अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करा.
- योजनेसाठी प्राधान्य क्रमांक निवडा.
- अर्ज सादर करा.
- २६.२३ रुपये पेमेंट करा.
- पावती डाऊनलोड करा.
अशा पद्धतीने महाडीबीटी या वेबसाईटवरील विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी करता येते mahadbt farmer registration.
सविस्तर माहितीचा व्हिडीओ या लेखाच्या सुरुवातीला दिला आहे.