शेतकऱ्यांना 2 लाख विनातारण कर्ज मिळणार असल्याचा निर्णय रिजर्व बँकेने घेतला आहे. यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
अनेक शेतकरी बांधवाना शेती निविष्ठा खरेदी करण्यासाठी आर्थिक अडचण निर्माण होते. बँकेच्या आर्थिक धोरणानुसार विनातारण कर्ज फक्त १ लाख ६० एवढेच असल्याने अल्प भूधारक शेतकऱ्यांना खाजगी सावकाराकडून कर्ज घेतल्याशिवाय पर्याय उरत नव्हता.
आता मात्र विनातारण कर्ज हे २ लाख रुपयांपर्यंत मिळणार असल्याने अनेक अल्पभू धारक शेतकऱ्यांना याचा फायदा मिळणार आहे.
सविस्तर माहितीसाठी खालील व्हिडीओ पहा.
2 लाख विनातारण कर्ज आर्थिक पतधोरण समितीच्या बैठकीनंतर निर्णय
शुक्रवार दिनांक ६ डिसेंबर २०२४ रोजी रिजर्व बँकेच्या आर्थिक पतधोरण समितीची बैठक झाल्यानंतर रिजर्व बँकेचे गव्हर्नर दास यांनी विना तारण कर्ज मर्यादा २ लाख रुपये वाढविण्यात आले असल्याची घोषणा केली आहे.
दर दोन महिन्यांनी रिजर्व बँकेच्या पतधोरण समितीची बैठक होते. यापूर्वी विनातारण कर्जाची मर्यादा १.६० लक्ष एवढी होती यामध्ये २०१९ पासून कोणताही बदल करण्यात आला नव्हता.
आता मात्र विनातारण कर्ज २ लाख रुपयांपर्यंत मिळणार आहे. या निर्णयामुळे लहान अल्पभूधारक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
या संदर्भातील सविस्तर माहितीसाठी खालील बटनावर क्लिक करा.
बँकेकडून मिळते शेतीसाठी कर्ज
शासनाच्या धोरणानुसार बँकेकडून शेतकऱ्यांना पिक कर्ज देण्यात येते. हे पिक कर्ज मिळविण्यासाठी शेतकरी बांधवाना मात्र खूप खटाटोप करावा लागतो.
अनेकदा बँक कर्ज प्रकरणासाठी लागणारी कागदपत्रे माहिती नसल्याने अनेकदा तारांबळ उडते यामुळे अनेक शेतकरी बँक कर्जाच्या भानगडीत न पडता सरळ खाजगी सावकाराकडून कर्ज घेतात.
अनेकदा खाजगी सावकाराकडून घेतलेल्या कर्जाचे व्याज जास्त झाल्याने अनेक शेतकरी नैराश्यग्रस्त होतात आणि चुकीचे पाउल उचलतात.
त्यामुळे आता शासनाने देखील बँकांना शेतकऱ्यांना कमी कागदपत्रामध्ये कर्ज उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या आहेत.
खालील योजनेचा पण लाभ घ्या.