महाडीबीटीवर शेतकऱ्यांना सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप solar knapsack spry pump 100 टक्के अनुदानावर मिळणार आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो. अर्ज कसा करावा या संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेवूयात.
शेतकरी बांधवाना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी शासनाने महाडीबीटी वेब पोर्टल निर्माण केले आहे. या ठिकाणी शेतकरी अनेक योजनांसाठी अर्ज करू शकतात.
या पोर्टलवर उपलब्ध असलेल्या काही योजना १०० टक्के अनुदानावर मिळतात. यातील एक योजना म्हणजे सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप होय.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो या संदर्भातील सविस्तर माहितीचा व्हिडीओ या लेखाच्या सर्वात शेवटी देण्यात आला आहे.
Mahadbt farmer registration महाडीबीटी वेबसाईटवर अनेक योजना लाभ घेण्यासाठी अशी करा नोंदणी
१०० टक्के अनुदानावर मिळणार सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप
शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील पिकांवर औषध फवारणी करण्यासाठी फवारणी पंप आवश्यक असतो. अनेक शेतकरी बांधवांकडे हा औषध फवारणी पंप खरेदी करण्यासाठी पुरेसे पैसे नसल्याने ते तो खरेदी करू शकत नाहीत.
अशावेळी शेतकरी बांधवाना शासनाकडून हा फवारणी पंप मोफत दिला जातो म्हणजेच १०० टक्के अनुदानावर दिला जातो.
याच वेबसाईटवर शेतकरी battery operated spry pump योजनेसाठी देखील अर्ज करू शकतात परंतु या तुलनेत सौर उर्जेवर चालणारा फवारणी पंप शेतकरी बांधवांसाठी खूप उपयोगी ठरणार आहे कारण यासाठी वीज लागत नाही.
योजनेचा लाभ घेण्यासाठी अगोदर करा नोंदणी
महाडीबीटी वेबसाईटवर विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी सर्वात अगोदर शेतकरी बांधवाना त्यांची नोंदणी करावी लागते.
नोंदणी केल्यानंतर युजर आयडी आणि पासवर्ड मिळतो त्याद्वारे लॉगीन केल्यानंतर कोणत्याही योजनेसाठी अर्ज सादर करता येतो.
बऱ्याच शेतकरी बांधवाना महाडीबीटी नवीन नोंदणी mahadbt new farmer registration संदर्भात माहिती नसल्याने ते हि नोंदणी करू शकत नाही.
नोंदणी कशी करावी या संदर्भातील सविस्तर माहितीसाठी खालील व्हिडीओ पहा.
असा करा सोलर फवारणी पंपासाठी ऑनलाईन अर्ज
Mahadbt वेब पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर solar knapsack spry pump योजनेसाठी कर करणे खूपच सोपे आहे.
शेतकरी त्यांच्या युजर आयडी पासवर्डच्या सहाय्याने किंवा आधार नंबरच्या सहाय्यने देखील देखील लॉगीन करू शकतात.
लॉगीन केल्यावर कशा पद्धतीने अर्ज सादर करावा लागतो या संदर्भातील सविस्तर माहितीचा खालील व्हिडीओ पहा.
सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप अर्ज करण्याची प्रोसेस
मुख्य घटक या पर्यायासाठी कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य हा पर्याय निवडा.
तपशील या पर्यायासाठी मनुष्यचलित औजारे हा पर्याय निवडा.
यंत्र सामग्री या पर्यायासाठी पिक संरक्षण औजारे हा पर्याय निवडा.
मशीनचा प्रकार या पर्यायासाठी सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप हा पर्याय निवडा.
अटी आणि शर्थी या पर्यायासमोर दिसत असलेल्या चौकटीमध्ये टिक करा.
जतन करा या पर्यायावर क्लिक करा.
एका घटकामध्ये एकदाच अर्ज करता येतो
एकाच घटकासाठी म्हणजेच कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य या घटकासाठी या अगोदर कोणताही अर्ज केला असेल तर त्याच घटकासाठी पुन्हा अर्ज करता येत नाही.
उदाहरणार्थ कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य घटकाअंतर्गत टोकन यंत्रासाठी अर्ज केलेला असेल तर तुम्हाला सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप योजनेसाठी अर्ज करता येणार नाही.
अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर पहिला अर्ज रद्द केला तर मग मात्र दुसरा अर्ज सादर करता येतो.
अर्ज कसा करावा, पेमेंट कसे करावे या संदर्भातील सविस्तर माहिती वरील व्हिडीओमध्ये दिली आहे जेणे करून आमच्या शेतकरी बांधवाना या योजनेसाठी अर्ज करण्यास कोणतीही अडचण येणार नाही.