सोयाबीनला चांगला भाव मिळविण्यासाठी नाफेड ऑनलाईन सोयाबीन नोंदणी प्रोसेस कशी आहे ते समजावून घेणे आवश्यक आहे. सध्या सोयाबीनला नाफेड केंद्रावर 4892 रुपये प्रती क्विंटल असा भाव मिळत असल्याने अनेक शेतकरी आपली सोयाबीन नाफेड केंद्रावर नेण्यास इच्छुक आहे.
नफेडची ऑनलाईन सोयाबीन नोंदणी केल्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाइलवर एक संदेश येतो. संदेश आल्यावार तुम्ही तुमची सोयाबीन नाफेड केंद्रावर विक्रीस नेवू शकता.
नाफेड ऑनलाईन सोयाबीन नोंदणी प्रक्रिया nafed soyabean registration खूप जटिल असते असा काही शेतकरी बांधवांचा समज झाल्यामुळे अनेक शेतकरी या केंद्रावर त्यांची सोयाबीन विक्रीस आणत नाहीत.
सोयाबीन बियाणे अनुदान योजनेसाठी ऑनलाईन अर्ज असा करा.
या लेखाच्या सर्वात शेवटी एक व्हीडीओ दिलेला आहे त्यामध्ये नाफेड ऑनलाइन सोयाबीन प्रोसेस संदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली आहे. तो व्हीडीओ बघितल्यावर तुम्ही स्वत: तुमच्या सोयाबीनची नोंदणी करू शकता.
नाफेड ऑनलाईन सोयाबीन नोंदणी केल्यास मिळेल जास्त भाव
खरीप हंगाम 2024 मध्ये अनेक शेतकरी बांधवांनी सोयाबीनची पेरणी केली होती. त्यामुळे सोयाबीनचे उत्पादन देखील मोठ्या प्रमाणात झाले.
सोयाबीनला सध्या खाजगी व्यापर्यांकडून 4100 ते 4400 प्रती क्विंटल असा भाव मिळत आहे. हा भाव कमी असल्याने अजून काही दिवसात सोयाबीनचा भाव वाढेल अशा आशेवर शेतकरी बांधव होते.
परंतु सध्या खाजगी व्यापर्यांकडून सोयाबीन भाववाढीची शक्यता धुसुर झाली असल्याने अनेक शेतकरी बांधवांनी आपला मोर्चा नाफेडकडे वळविला आहे.
तुम्हाला देखील तुमची सोयाबीन नाफेड खरेदी केंद्रावर विक्री करण्यासाठी आणायची असेल तर त्या संदर्भातील सविस्तर महितीचा खालील व्हीडीओ नक्की पहा.
बांधकाम कामगार भांडे योजनेसाठी करा अर्ज मिळेल 30 भांडे अर्ज pdf मध्ये डाउनलोड करा
कधी मिळतात पैसे
सोयाबीन विकल्यावर शेतकर्यांना नाफेड नोंदणी केंद्रावर सोयाबीन खरेदी केल्याची पावती दिली जाते. या पावतीवर सर्व तपशील असतात. शेतकर्यांची सोयाबीन किती पोते भरली आणि त्या पोत्यांचे वजन किती झाले यानुसार सोयाबीनची एकूण किंमत किती झाली या संदर्भात या पावतीवर संपूर्ण माहिती दिलेली असते.
नाफेड केंद्रावर सोयाबीन विक्री केली की नोंदणीकृत शेतकर्यांच्या बँक खात्यामध्ये सोयाबीनचे पैसे वर्ग केले जातात. सोयाबीन विक्री केळ्यापासुन अंदाजे 10 ते 20 दिवसांच्या आत हे पैसे बँक खात्यामध्ये वर्ग केले जातात.
पैसे जमा होण्याचा कळवधी कमी जास्त होऊ शकतो अर्थात हे लॉटनुसार असते. उदाहरनार्थ पहिल्या लॉटमध्ये कमी शेतकरी असेल तर त्यांना लवकर पैसे मिळण्याची शक्यता असते त्या तुलनेत दुसर्या लॉटमध्ये जास्त शेतकरी असेल तर त्यासाठी थोडा वेळ लागू शकतो.
सोयाबीन ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी लागणारी कागदपत्रे
खालील दिलेला व्हीडीओ बघितल्यावर शेतकरी स्वत: देखील सोयाबीनची ऑनलाईन नोंदणी करू शकतात किंवा कोणत्याही ऑनलाईन सेंटरवर जावून नोंदणी करता येते.
ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी काही कागदपत्रे आपलोड करावी लागतात ती खालील प्रमाणे आहे.
शेतकर्यांच्या जमिनीचा सातबारा व 8 अ.
आधार कार्ड.
बँक पासबुक.
चालू स्थितीतील मोबाइल नंबर.
वरील सर्व कागदपत्रे स्कॅन करून आपलोड करावी लागतात त्याच प्रमाणे सक्रिय असलेला मोबाइल नंबर नोंदवावा लागतो कारण त्यावर otp पाठविला जातो.
अशी करा सोयाबीनची ऑनलाईन नोंदणी
आता प्रत्यक्ष जाणून घेवूयात की नाफेड ऑनलाईन सोयाबीन नोंदणी कशी केली जाते e samruddhi registration.
- ई समृद्धी या वेबसाईटला भेट द्या.
- नोंदणी करा या बाटणावर क्लिक करा.
- मोबाईल नंबर टाकून कॅपचा कोड टाइप करा.
- मोबाईलवर आलेला otp टाकून लॉगिन करा.
एकदा का तुम्ही लॉगिन झालात की मग पुढे एक एक प्रोसेस फॉलो करत तुम्हाला नोंदणी करावी लागते यामध्ये शेतकर्याची माहिती, बँक तपशील व शेतीचे तपशील टाकावे लागतात.
या संदर्भातील सविस्तर महितीचा खालील व्हीडीओ पहा.