सोयाबीन खरेदीस मुदतवाढ ४८९२ एवढा हमी भाव

सोयाबीन खरेदीस मुदतवाढ ४८९२ एवढा हमी भाव

सोयाबीन खरेदीस मुदतवाढ करण्यात आली असून आता सोयाबीन खरेदी सुरळीत सुरु होणार आहे.

शेतकऱ्यांच्या सोयाबीनला ४८९२ एवढा हमी भाव शासनाने जाहीर केल्याने अनेक शेतकरी त्यांची सोयाबीन नाफेड केंद्रावर विक्रीसाठी घेवून येत आहे. मध्यंतरी बारदाना अभावी सोयाबीन खरेदीमध्ये खंड पडला होता.

यामुळे सोयाबीन खरेदीसाठी अडचणी निर्माण झाल्याने सोयाबीन खरेदीसाठी १२ जानेवारी २०२५ या तारखेएवजी आता ३१ जानेवारी २०२५ हि शेवटची तारीख देण्यात आली आहे.

३१ जानेवारी २०२५ पर्यंत शेतकरी बांधवांची सोयाबीन खरेदी केली जाणार आहे. काल म्हणजेच दिनांक १३ जानेवारी २०२५ रोजी संध्याकाळी केंद्रीय कृषी मंत्रालयाने पणन महासंघाला या बाबत कळविलेले आहे.

खुल्या बाजारात सोयाबीनला कमी भाव मिळत असल्याने अनेक शेतकरी आता आपली सोयाबीन विक्रीसाठी नाफेड केंद्रावर जात आहे.

Pradhan mantri awas yojana 2022 घरकुल योजना याद्या आल्या

बारदाना उपलब्ध सोयाबीन खरेदीस येईल वेग

ज्या ठिकाणी सोयाबीन मोजणी केली जाते त्या ठिकाणी बारदाना उपलब्ध नसल्याने अनेक शेतकऱ्यांना सोयाबीन विक्रीस घेऊन येण्याचे संदेश येवूनही सोयाबीन खरेदी केली गेली नसल्याचे अनेक उदाहरणे आहेत.

परंतु आता बारदाना उपलब्ध झाल्याने सोयाबीन खरेदीस वेग येणार आहे.

नाफेड केंद्रावर सोयाबीन खरेदी करण्यासाठी सोयाबीनचा ओलावा १२ टक्के असावा हि अट होती. सुरुवातीला शेतातील सोयाबीन मळल्याबरोबर ओलावा जास्त असल्याने अनेक शेतकऱ्यांची त्यांची सोयाबीन खुल्या बाजारात कमी भावाने विकली.

बांधकाम कामगार संसार बाटली जी आर डाउनलोड करा sansar batli GR 2024

उन्हामुळे सोयाबीनचा घटत आहे ओलावा

मध्यंतरी विधानसभा निवडणुकीच्या काही दिवस आधी केंद्रीय कृषी मंत्रालयाने एक पत्र काढले होते त्यामध्ये सोयाबीनचा ओलावा १५ टक्के धरून खरेदी करावी असे सूचित केले होते.

परंतु नाफेड केंद्रावर या पत्राचा कोणताही प्रभाव दिसला नाही. त्यामुळे नोंदणी करूनही काही शेतकरी बांधवानी सोयाबिन नाफेडला आणली नाही.

परंतु आता मात्र उन्हामुळे सोयाबीनचा ओलावा घटत असल्याने आणि खुल्या बाजारात सोयाबीनला कमी भाव मिळत असल्याने अनेक शेतकरी नाफेड केंद्रावर सोयाबीन खरेदीसाठी घेवून येत आहे.

सोयाबीन खरेदी सुरळीत करण्याची मुख्यमंत्र्याची सूचना

या वर्षी नाफेडला सोयाबीन विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जास्त होती. नेहमीची येतो मग पावसाळा दरवर्षी नाफेड खरेदी केंद्रावर काहीना काही अडचणी येतात.

यावर कायमचा तोडगा काढण्यात यावा या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या आहेत. पुढील वर्षी नोहेंबर महिन्यापासून सोयाबीनची नाफेड केंद्रावर हमी भावाने खरेदी सुरु होणार आहे. त्यावेळी आता ज्या चुका झाल्या आहेत त्या होऊ नये यासाठी ऑक्टोबरमध्येच तयारी करावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

खुल्या बाजारात सोयाबीनपिकला कमी भाव मिळत असल्याने शेतकरी बांधवानी शासनाने दिलेल्या हमी भाव योजनेचा लाभ घेतला पाहिजे.

सोयाबीन खरेदीस मुदतवाढ संदर्भातील अधिकृत माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

अधिकृत माहिती पहा

अशी करा ऑनलाईन नोंदणी

बऱ्याच शेतकऱ्यांना नाफेड खरेदी केंद्र, सोयाबीन ऑनलाईन नोंदणी या बाबी किचकट वाटतात त्यामुळे डोक्याला त्रास नको म्हणून सरळ खुल्या बाजारात कमी भावाने सोयाबीन विक्रीस नेली जाते. यामध्ये शेतकऱ्यांना कमी भाव मिळाल्याने खूप मोठे नुकसान होते.

सोयाबीनची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. हि संपूर्ण प्रोसेस तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर खालील बटनावर क्लिक करा. या ठिकणी सोयाबीनची नोंदणी कशी केली जाते या संदर्भातील सविस्तर माहिती तुम्हाला मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *