फार्मर आयडी असे करा डाउनलोड पहा ऑनलाईन नोंदणीची सविस्तर माहिती

फार्मर आयडी असे करा डाउनलोड पहा ऑनलाईन नोंदणीची सविस्तर माहिती

फार्मर आयडी अर्थात शेतकरी ओळखपत्र नोंदणी कशी करावी तसेच हे कार्ड डाउनलोड कसे करावे या संदर्भात माहिती जाणून घेवूयात.

ज्या पद्धतीने नागरिकांना आधार कार्ड मिळाले आहे अगदी त्याच पद्धतीने आता शेतकऱ्यांना सुद्धा शेतीसाठी असलेले स्वतंत्र डिजिटल आयडी कार्ड मिळणार आहे.

ॲग्रीस्टॅक या केंद्रशासनाच्या उपक्रमाअंतर्गत हे ओळखपत्र म्हणजेच फार्मर आयडी शेतकरी बांधवाना दिले जाणार आहे.

शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती एकत्रित करणे हा या योजनेचा उद्देश आहे. सर्व माहिती एकत्र असल्यामुळे भविष्यामध्ये विविध कागदपत्र देण्याची गरज भासणार नाही.

फार्मर आयडी अर्थात शेतकरी ओळख पत्रासाठी ऑनलाईन नोंदणी कशी करावी या संदर्भातील सविस्तर माहितीचा व्हिडीओ या लेखाच्या सर्वात शेवटी दिलेला आहे.

बांधकाम कामगार शिष्यवृत्ती अनुदान योजना labor construction worker scholarship grant

कोणाला मिळणार फार्मर आयडी

ज्या शेतकऱ्यांकडे जमिनीचा मालकी हक्क आहे अशा शेतकऱ्यांना हे फार्मर आयडी कार्ड मिळणार आहे.

सदरील शेतकरी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा.

शेतकरी बांधवांचे नाव सातबारा उताऱ्यावर असणे आवश्यक आहे.

वरील शेतकऱ्यांना ॲग्रीस्टॅक उपक्रम अंतर्गत फार्मर आयडी कार्डसाठी ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे.

ऑनलाईन बांधकाम कामगार नूतनीकरण kamgar renewal

फार्मर आयडीमुळे होणारे फायदे

शेतकरी ओळखपत्र मिळाल्यामुळे शेतकऱ्यांची डिजिटल ओळख निर्माण होणार आहे.

शेती संदर्भातील संपूर्ण माहिती या फार्मर आयडीमध्ये संकलित केली जाईल.

संपूर्ण माहिती संकलित असल्यामुळे कोणत्याही शेती विषयक योजनेचा अर्ज करणे सोपे जाईल.

संपूर्ण महिती एकत्रित असल्यामुळे कागदपत्रांची जास्त पूर्तता करण्याची गरज भासणार नाही.

इत्यादी फायदे शेतकरी ओळखपत्र मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही अजूनही तुमचे शेतकरी ओळख पत्रासाठी नोंदणी केली नसेल तर लगेच करून घ्या.

अशी करा फार्मर आयडी ऑनलाईन नोंदणी

फार्मर आयडी कार्ड ऑनलाईन रजिस्ट्रेशन संदर्भातील प्रत्यक्ष माहितीचा खालील व्हिडीओ पहा.

कॉम्प्युटर मधील ब्राउजर ओपन करा.

ब्राउजरच्या सर्च बारमध्ये https://mhfr.agristack.gov.in/farmer-registry-mh/#/ आणि सर्च करा किंवा येथे क्लिक करा.

पोर्टल ओपन होईल.

एक बाब या ठिकाणी लक्षात घ्या कि तुमची जर शेतकरी असाल तर तुमची फार्मर आयडीसाठी स्वतः नोंदणी करू शकता.

तसा पर्याय देखील या ठिकाणी देण्यात आलेला आहे परंतु सध्या हा पर्याय सुरु नसल्याने सध्यातरी csc द्वारे तुम्ही लॉगीन करून नोंदणी करू शकता अर्थात ज्यांच्याकडे सीएससी आयडी आहे तेच नोंदणी करू शकतात.

वरील व्हिडीओ बघितल्यानंतर शेतकरी ओळख पत्र ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करावी तसेच कार्ड डाउनलोड कसे करावे या संदर्भात तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल.

शेतकरी स्वतः करू शकतील का नोंदणी

फार्मर आयडी अर्थात शेतकरी ओळख पत्र ऑनलाईन नोंदणी शेतकरी सुद्धा करू शकतील तसा पर्याय पोर्टलवर देण्यात आलेला आहे.

परंतु सध्या तरी सीएससी केंद्रावर जावून शेतकरी बांधवाना नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी केल्यानंतर अर्जाची सध्यस्थिती शेतकरी स्वतः तपासू शकतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *