UDID Disability Certificate असेल तरच करता येईल रिक्षा अनुदान योजनेसाठी अर्ज

UDID Disability Certificate असेल तरच करता येईल रिक्षा अनुदान योजनेसाठी अर्ज

रिक्षा अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी UDID Disability Certificate असणे आवश्यक आहे. हे प्रमाणपत्र तुमच्याकडे जर नसेल तर ते कसे ऑनलाईन डाउनलोड करावे या संदर्भात आपण माहिती जाणून घेणार आहोत.

कशा प्रकारचे UDID कार्ड असते हे कार्ड ऑनलाईन पद्धतीने डाउनलोड कसे करता येते या संदर्भातील सविस्तर माहितीचा व्हिडीओ या लेखाच्या सर्वात शेवटी देण्यात आला आहे.

सध्या इ रिक्षा योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सुरु आहे. या योजना अंतर्गत पात्र लाभार्थींना ३ लाख ७५ हजार रुपये अनुदान मिळते.

ज्या लाभार्थीकडे UDID Card आहे तेच लाभार्थी या योजनेसाठी अर्ज सादर करू शकतात.

इ रिक्षा योजनेचा ऑनलाईन अर्ज कसा करावा या संदर्भातील सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

रिक्षा अनुदान अर्ज सुरु ३ लाख ७५ हजार रुपये मिळणार अनुदान e rickshaw anudan yojana 2025

UDID Disability Certificate असेल तरच मिळतो इ रिक्षा योजनेचा लाभ

दिव्यांग व्यक्तींना व्यवसाय उभारून स्वावलंबी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ मुंबई यांच्या वतीने हरित उर्जेवर चालणारी पर्यावरण स्नेही फिरत्या वाहनावरील दुकान अर्थात रिक्षा खरेदी करण्यासाठी जास्तीत जास्त ३ लाख ७५ हजार रुपये अनुदान दिले जाते.

यासाठी ऑनलाईन अर्ज सुरु झाले सुरु झालेले आहेत. ज्या व्यक्तीच्या दिव्यांगात्वाचे प्रमाण ४० टक्केपेक्षा जास्त आहे अशाच व्यक्ती या योजनेसाठी अर्ज सादर करू शकतात.

योजनेसाठी लागणारी जी कागदपत्रे आहेत त्यामध्ये दिव्यांग प्रमाणपत्र होय. दिव्यांग प्रमाणपत्र तुम्ही अगदी कमी मिनिटांत ऑनलाईन पद्धतीने डाउनलोड करू शकता.

तुमच्याकडे जर UDID Disability Certificate नसेल तर तुम्ही फिरत्या वाहनावरील दुकान या योजने अंतर्गत मिळणाऱ्या इ रिक्षासाठी ऑनलाईन अर्ज करू शकत नाही.

विविध योजनांसाठी उपयोगी असते UDID Disability Certificate व कार्ड

केवळ रिक्षाच नव्हे तर शासनाकडून दिव्यांग व्यक्तींसाठी विविध योजना सुरु असतात. तुमच्याकडे जर UDID Disability Certificate असेल तर शासनाच्या विविध योजनांचा लाभ तुम्हाला मिळू शकतो.

हे Certificate व कार्ड अगदी काही मिनिटात ऑनलाईन पद्धतीने डाउनलोड करता येते. दिव्यांगाचे UDID कार्ड व प्रमाणपत्र pdf मध्ये डाउनलोड करता येते.

UDID कार्ड व प्रमाणपत्र डाउनलोड झाल्यानंतर ते सेव्ह करून घ्या आणि त्यांची प्रिंट काढून घ्या.

असे करा UDID कार्ड व सर्टिफिकेट डाउनलोड

UDID कार्ड डाउनलोड कसे केले जाते या संदर्भातील सविस्तर माहितीसाठी खालील व्हिडीओ पहा.

Unique Disability ID या वेबसाईटवर या.

PwD login या पर्यायावर क्लिक करा.

Enrolment Number किंवा UDID नंबर येथे टाका. अर्ज केल्यानंतर मिळणाऱ्या पावतीवर या ठिकाणी Enrolment Number नंबर असतो. दिव्यांगांचे जे प्रमाणपत्र असते त्यावर UDID नंबर दिलेला असतो.

कॅपचा कोड टाकून लॉगीन करा.

लॉगीन केल्यावर dashbaord तुम्हाला दिसेल त्या ठिकाणी तुमची संपूर्ण माहिती दिलेली असेल.

स्क्रीनच्या डाव्या बाजूला अनेक पर्याय तुम्हाला दिसतील यापैकी Download your E UDID disability certificate या पर्यायावर क्लिक करा.

दिव्यांग प्रमाणपत्र PDF मध्ये करता येईल डाउनलोड

जसे हि तुम्ही या पर्यायावर क्लिक कराल त्यावेळी दिव्यांगाचे प्रमाणपत्र तुमच्या कॉम्प्युटरमध्ये किंवा मोबाईलमध्ये pdf मध्ये डाउनलोड होईल.

परत वेबसाईटवर या Download your E UDID disability certificate या पर्यायाच्या खाली तुम्हाला Download your E UDID card असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करताच हे कार्ड तुमच्या कॉम्प्युटर किंवा मोबाईलमध्ये डाउनलोड होईल.

तर अशा पद्धतीने दिव्यांग सर्टिफिकेट व UDID कार्ड ऑनलाईन डाउनलोड करू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *