सरपंच व उपसरपंच यांच्या मानधनात वाढ निधी उपलब्ध पहा नवीन जी आर

सरपंच व उपसरपंच यांच्या मानधनात वाढ निधी उपलब्ध पहा नवीन जी आर

गावातील सरपंच व उपसरपंच यांना प्रतीमहिना मानधन देण्यात येते परंतु हे मानधन खूपच कमी असल्याने दिनांक २४ सप्टेंबर २०२४ च्या जी आर नुसार या मानधनामध्ये वाढ करण्याची घोषणा शिंदे सरकारने केली होती.

घोषणा जरी करण्यात आली होती परंतु प्रत्यक्ष वाढीव मानधन मात्र काही मिळाले नव्हते. आता नुकताच दिनांक १३ फेब्रुवारी २०२५ रोजी शासनाने या वाढीव मानधनासंदर्भात नवीन शासन निर्णय निर्गमित केला असून यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे.

सरपंच व उपसरपंच यांना किती मानधन मिळते जाणून घेवूयात या संदर्भातील सविस्तर माहिती.

किती मिळणार नवीन मानधन

सरपंच व उपसरपंच यांना प्रती महिना शासनाकडून मानधन मिळते हे मानधन ग्रामपंचायतची लोकसंख्या किती आहे यावर अवलंबून असते.

गावाची लोकसंख्या २ हजार पर्यंत असेल तर सरपंच यांना ६ हजार तर उपसरपंच यांना २ हजार रुपये प्रती महिना मानधन मिळते.

ग्रामपंचायतची लोकसंख्या २ हजार ते ८ हजार दरम्यान असेल तर त्या गावच्या सरपंचाना ८ हजार रुपये तर उपसरपंचाना ३ हजार रुपये प्रती महिना मानधन मिळणार आहे.

एखाद्या गावाची लोकसंख्या ८ हजारापेक्षा जास्त असेल तर सरपंचाना १० हजार रुपये तर उप सरपंचाना ४ हजार रुपये प्रती महिना मानधन मिळणार आहे.

कसे आहे मानधनाचे स्वरूप

सरपंच व उपसरपंच यांना मिळणाऱ्या मानधनाच्या ७५ टक्के रक्कम शासन देणार असून उर्वरित २५ टक्के रक्कम हि ग्रामपंचायत स्वनिधीतून काढता येणार आहे.

ग्रामपंचायतचे कामे करण्यासाठी सरपंच तथा उपसरपंच यांना वेळ द्यावा लागतो याच बाबीचे महत्व लक्षात घेवून शासनाच्या वतीने हे मानधन देण्यात येते.

सरपंच व उपसरपंच हे गावचे मुख्य घटक असून गावच्या विकासामध्ये यांची खूप महत्वाची भूमिका असते. शासकीय निधीसाठी वेळोवेळी पंचायत समिती असेल किंवा जिल्हा परिषद असेलल्या ठिकाणी जावून गावाच्या विकासाठी निधीची मागणी करणे.

योजनेचा पाठपुरावाफ करून योजना अंमलात आणणे इत्यादी कामे सरपंचाना करावी लागतात.

शासनाकडून दिल्या जातात विविध योजना

गावाचा विकास व्हावा यासाठी शासनाकडून ग्रामपंचातला विविध योजना दिल्या जातात या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे काम ग्रामपंचायतचे असते अशावेळी सरपंचाची भूमिका खूपच महत्वाची ठरते.

ग्रामपंचायतद्वारे विविध योजना राबविल्या जातात त्यापैकी काही योजना खालीलप्रमाणे आहेत.

गायगोठा अनुदान योजना.

सिंचन विहीर अनुदान योजना.

घरकुल योजना.

रोजगार हमी योजना.

शौचालय बांधकाम योजना.

पाणी पुरवठा योजना.

रोजगार हमी योजना अंतर्गत शेततळे योजना.

अशा अनेक योजना ग्राम पंचायत स्तरावरून राबविल्या जातात या योजनांचा लाभ ग्रामस्थांनी घ्यायला हवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *