नमो किसान सन्मान निधीत वाढ.
नुकताच पीएम किसान सन्मान निधीचा हफ्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आला आहे.
पीएम किसान सन्मान निधी योजना अंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजार रुपये अनुदान मिळते तर नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना अंतर्गत देखील महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवाना पीएम किसान सन्मान निधीच्या धर्तीवर ६ हजार रुपये मिळतात.
आता महाराष्ट्र राज्यात लागू असलेली नमो किसान सन्मान निधीत ३ हजार रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. म्हणजेच पीएम किसान सन्मान निधीचे ६ हजार आणि नमो शेतकरी योजनेचे ९ हजार असे वार्षिक १५ हजार रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे.
दिनांक २४ फेब्रुवारी २०२५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहार येथील भागलपूर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या १९ व्या हफ्ताचे वितरण करण्यात आले होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली या वितरणाचा राज्यस्तरीय कार्यक्रम नागपूर येथील वसंतराव नाईक सभागृहात आयोजित करण्यात आला होता.
अनेकांना मिळत नाही योजनेचा लाभ
पीएम किसान सन्मान निधी योजना अंतर्गत अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही. तुम्ही जर पात्र शेतकरी असाल तर तुम्हाला पीएम किसान सन्मान निधीचा लाभ मिळायला हवा यासाठी तुमच्या तालुक्यातील तहसील कार्यालयास भेट द्या.
बऱ्याच शेतकरी बांधवाना पीएम किसान सन्मान निधीचे काही हफ्ते मिळालेले असतांना आता मात्र त्यांना हे पैसे मिळत नाहीत.
पीएम किसान सन्मान निधीचे पैसे का मिळत नाही हे तुम्ही अगदी ऑनलाईन देखील तपासू शकता.
यासाठी तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी या वेबसाईटवर जावून चेक करायचे आहे.
PM Kisan Samman nidhi योजना पुन्हा सुरु 2 हजार रुपयांसाठी करा अर्ज
पीएम किसान निधीप्रमाणे मिळतील नमो शेतकरी योजनेचे पैसे
पीएम किसान सन्मान निधीचे पैसे जर तुम्हाला मिळत असतील तर पर्यायाने तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे पैसे देखील मिळणार आहेत. नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी वेगळा अर्ज करावा लागत नाहीत.
जे लाभार्थी पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी पात्र आहेत त्यांना नमो शेतकरी योजनेचा देखील लाभ मिळतो.
आता तर नमो शेतकरी महासन्मान निधीच्या रकमेत ३ हजार रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे.
त्यामुळे तुम्हाला पीएम किसान सन्मान निधीचा हफ्ता मिळणे गरजचे आहे.