ज्या शेतकरी बांधवांकडे गाय, म्हैस, किंवा शेळ्या आहेत त्या शेतकऱ्यांनी गाय गोठा बांधकाम अनुदान योजेंचा लाभ घेण्याचे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
त्यामुळे तुमच्याकडे जर दुधाळ जनावरे असतील तर तुम्हाला गोठा बांधका करण्यासाठी 2021 च्या जी आर नुसार 77 हजार 188 रुपये एवढे अनुदान मिळणार आहे.
गाय गोठा बांधकाम अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारा प्रस्ताव, इस्टीमेट व या योजनेचा जी आर या संदर्भातील सविस्तर माहिती या लेखामध्ये दिलेली आहे त्यामुळे हा लेख संपूर्ण वाचा.
हि सर्व कागदपत्रे डाउनलोड करण्याची सुविधा करण्यात आली आहे.
गाय गोठा बांधकाम योजनेचा लाभ कसा घ्यावा
शरद पवार ग्राम समृद्धी योजना अंतर्गत रोजगार हमी योजनेतून हि योजना राबविली जाते. आजपर्यंत अनेकांना गाय गोठा बांधकाम अनुदान मिळालेले आहे.
बऱ्याच शेतकरी बांधवांकडे दुधाळ जनावरे असून त्यांना देखील या योजनेचा लाभ घेण्याची इच्छा असते परंतु योजनेचा लाभ कसा घ्यावा या संदर्भात सखोल माहिती नसल्याने हे शेतकरी बांधवान या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गाय गोठा बांधकाम अनुदान मिळविण्यासाठी एक प्रस्ताव तुम्हाला तुमच्या ग्राम पंचायत कार्यालयात सादर करावा लागतो.
हा प्रास्तव ग्रामरोजगार सेवक किंवा ग्रामपंचायत मार्फत पुढे पंचायत समितीकडे पाठविला जातो पंचायत समिती जिल्हा परिषदेकडे पाठविते आणि तिथेच या प्रस्तावास मंजुरी दिली जाते.
योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे
योजनेचा लाभ घेण्यासाठी जी कागदपत्रे लागतात ती खालीलप्रमाणे आहे.
- पशुपालकाचे आधार कार्ड.
- उत्पन्नाचा दाखला.
- रहिवासी प्रमाणपत्र.
- बँक खात्याची माहिती (बँक पासबुक).
- ग्रामपंचायतचे शिफारसपत्र.
वरील कागदपत्रे या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी आवश्यक असतात याशिवाय या योजनेसाठी एक प्रस्ताव देखील सादर करावा लागतो. या प्रस्तावासोबत proposal अंदाजपत्रक Estimate देखील जोडावे लागते.
गाय गोठा बांधकाम अनुदान प्रस्ताव, अंदाजपत्रक आणि जी आर pdf मध्ये डाउनलोड करण्यासठी खालील बटनावर क्लिक करा.
पशुपालकांसाठी योजना लाभदायक
अनेक शेतकरी शेतीला जोड व्यवसाय म्हणून दुग्धव्यवसाय करत असतात. अशावेळी दुधाळ जनावरांना बांधण्यासाठी गोठा आवश्यक असतो.
पशुपालकांकडे दुधाळ जनावरांसाठी गोठा नसेल तर जनावरांना विविध व्याधी लागून दुग्धव्यवसायावर परिणाम होतो. दुधाळ जनावरे महागडी असल्याने एखाद्या आजारामुळे जनावर दगावले तर यातून शेतकरी बांधवांचे आर्थिक नुकसान देखील मोठ्या प्रमाणत होते.
याचमुळे दुग्धव्यवसाय करत असतांना गोठ्याला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे.
या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जालना यांनी केले आहे. या संदर्भातील बातमी खाली दिली आहे.