फवारणी पंप ऑनलाईन अर्ज सुरु पंपासाठी मिळेल शासकीय अनुदान

फवारणी पंप ऑनलाईन अर्ज सुरु पंपासाठी मिळेल शासकीय अनुदान

फवारणी पंप ऑनलाईन अर्ज सुरु झाले असून शेतकरी बांधवानी अर्ज करण्याचे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

महाडीबीटी या वेबसाईटवर battery operated spray pump योजनेसाठी पुन्हा नव्याने अर्ज सुरु झाले आहेत. मागील काही महिन्यापूर्वी 100 टक्के अनुदानावर बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप योजनेसाठी अनेकांनी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे प्रयत्न केले होते.

परंतु महाडीबीटी काही तांत्रिक अडचणीमुळे अनेक शेतकऱ्यांना हे अर्ज करता आले नव्हते. आता मात्र नव्याने पुन्हा एकदा महाडीबीटी या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहेत.

महाडीबीटी शेतकरी पोर्टलवर शेतकऱ्यांसाठी विविध योजना सुरु असतात यामधील एक योजना म्हणजे battery operated spray pump scheme होय.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा जाणून घेवूयात या संदर्भातील सविस्तर माहिती.

फवारणी पंप ऑनलाईन अर्ज लागणारी कागदपत्रे

महाडीबीटी या वेबसाईटवरील कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी नवीन नोंदणी करणे आवश्यक असते. नवीन नोंदणीसाठी खालील कागदपत्रे आवश्यक असतात.

अर्जदाराचे आधार कार्ड.

बँक पासबुक.

सातबारा.

एकूण जमिनीचा दाखला.

शेतकरी स्वतः देखील हि नोंदणी करू शकतात यासाठी कोणतेही विशिष्ठ लायसेन्स लागत नाही.

महाडीबीटी वेबसाईटवर नवीन नोंदणी कशी करावी या संदर्भातील सविस्तर माहितीसाठी खालील व्हिडीओ पहा.

Mahadbt farmer registration महाडीबीटी वेबसाईटवर अनेक योजना लाभ घेण्यासाठी अशी करा नोंदणी

स्प्रे पंपासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा

महाडीबीटी वेबसाईटवर नोंदणी केल्यानंतर तुमच्या युजर आयडी आणि पासवर्डने लॉगीन करून अर्ज सादर करा.

ऑनलाईन पद्धतीने स्प्रे पंपासाठी अर्ज कसा सादर करतात या संदर्भातील सविस्तर माहितीसाठी खालील व्हिडीओ पहा. या व्हिडीओमधेय संपूर्ण माहिती दिलेली आहे.

तुम्ही जर नवीन असाल म्हजेच महाडीबीटी वेबसाईटवर पहिल्यांदा अर्ज करत असाल तर तुम्हाला २३.६० एवढे शुल्क भरावे लागेल.

शुल्क भरल्यानंतर मी अर्ज केलेल्या बाबी या सदरामध्ये छाननी अंतर्गत अर्ज यामध्ये तुम्हाला स्प्रे पंप अर्जाची पावती डाउनलोड करता येईल.

बातमी पहा

फवारणी पंप कधी मिळेल

अर्जदाराने ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर हा अर्ज तालुक्यातील कृषी अधिकारी यांच्याकडे जातो. ते त्यांच्या युजर आयडी आणि पासवर्डने लॉगीन करून अर्जदाराच्या अर्जाची शहानिशा करतात. अर्ज बरोबर असेल तर तुम्हाला तुमच्या मोबाईलववर एक संदेश मिळतो.

महाडीबीटी शेतकरी पोर्टलवरील बहुतांश योजना या लॉटरी पद्धतीने असतात. यामध्ये शेतकऱ्यांचे नाव आले कि त्यांना योजनेचा लाभ दिला जातो.

अशा प्रकारे आपण या लेखामध्ये फवारणी पंप योजनेचा लाभ कशा पद्धतीने घेतला जातो, अर्ज करण्याची पद्धत कशी आहे या संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेतली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *