जाणून घेवूयात नवीन जीवन अक्षय विमा पॉलिसी संदर्भातील महत्वाची माहिती.
भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीने नवीन विमा पॉलिसी आणली आहे यामध्ये एकदा रक्कम भरल्यानंतर लगेच पुढच्या महिन्यानंतर महिन्याला ५४०० रुपये पेन्शन मिळण्यास सुरुवात होते.
या विमा पॉलिसीसाठी वयाची अट २५ ते ८५ वर्ष आहे.
प्रत्येकालाच आर्थिक स्थैर्य हवे असते मग ते म्हतारपणी असो कि तरुणपणी. त्यामुळे एलआयसीने जीवन अक्षय हि नवीन पॉलिसी आणली आहे ज्यामध्ये २५ पासून ते ८५ वय असलेले कोणतेही नागरिक सहभागी होऊ शकतात.
Bandhkam kamgar safety kit कामगारांना मिळताहेत पेट्या करा अर्ज 2025
कसे मिळेल ५४०० प्रती महिना
जीवन अक्षय विमा पॉलिसीमध्ये एकाचवेळी १० लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास वयाच्या १०० वर्षापर्यंत प्रती महिना ५४०० रुपये पेन्शन मिळणार आहे.
१ लाख रुपये गुंतवणूक करून देखील नागरिकांना नियमित उत्पन्न मिळू शकते अर्थात महिन्याला किती पेन्शन मिळणार आहे हे तुमच्या गुंतवणुकीवर अवलंबून असणार आहे.
जीवन अक्षय विमा पॉलिसीमध्ये जास्तीत जास्त गुंतवणुकीची मर्यादा नाही. त्यामुळे तुम्हाला दर महिन्याला निश्चित उत्पन्न हवे असेल तर तुम्ही हि पॉलिसी घेवू शकता.
वयाच्या ८५ वर्षापर्यंत हि पॉलिसी घेता येते. एकदा का या पॉलिसी अंतर्गत तुम्ही पैसे जमा केले कि महिल्याना निश्चित रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होते.
फार्मर आयडी असे करा डाउनलोड 2025 पहा ऑनलाईन नोंदणीची सविस्तर माहिती
कशी आहे जीवन अक्षय विमा पॉलिसी
हि पॉलिसी एक व्यक्ती किंवा सयुंक्तपणे देखील घेता येते. पेन्शन मिळविण्यासाठी खालील ४ पद्धतीचा अवलंब करता येतो.
मासिक.
त्रैमासिक.
सहामाही.
वार्षिक.
वरील चार प्रकारातून एक प्रकार पेन्शन मिळविण्यासाठी निवडता येतो. एकाचवेळी १० लाख रुपये जमा केल्यास दर महिना ५४०० किंवा दरवर्षी ६४४०० एकरकमी रक्कम मिळू शकते. या संदर्भातील सविस्तर ऑनलाईन माहितीसाठी भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.