जाणून घेवूयात कंत्राटी कामगार अनुदान योजना संदर्भातील सविस्तर माहिती.
विविध ठिकाणी वेगवेगळ्या खाजगी एजन्सीज मार्फत सफाई काम संदर्भात ठेके घेतले जातात आणि अनेक कामगार या ठिकाणी काम करत असतात.
काम करत असतांना दुर्दैवाने कामावर जीवित हानी झाल्यास काही प्रकरणांमध्ये कामगारांना खाजगी एजन्सीकडून कोणतीही नुकसानभरपाई न दिल्याचे अनेक उदाहरणे समोर आली आहेत.
आता मात्र यापुढे खाजगी एजन्सीमध्ये कामगार जर काम करत असेल आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असेल तर अशावेळी ३० लाखांपेक्षा जास्त नुकसानभरपाई मिळू शकणार आहे.
या संदर्भात शासन लवकरच निर्देशित करणार आहे.
कंत्राटी कामगार अनुदान योजना सध्या किती मिळते अनुदान
कंत्राटी बांधकाम कामगार अनुदान योजना अंतर्गत जर सफाई कामगारांचा काम करतांना मृत्यू झाला तर ३० लाख रुपये नुकसानभरपाई मिळते.
महाराष्ट्र राज्य सरकारने मदतीचे निकष बदलले आहेत. मदत आता खालीलप्रमाणे मिळणार आहे.
- कामगाराला थोडेफार अपंगत्व आल्यास १० लाख रुपये मदत मिळेल.
- कायम अपंगत्व आल्यास २० लाख रुपये.
- मृत्यू आल्यास ३० लाख रुपये अनुदान मिळते.
वरील प्रमाणे मदत जाहीर करण्यात आली तरी हि मदत मिळविण्यासाठी कामगारांच्या परिवाराला ३ ते ६ महिने वाट पहावी लागत होती.
आता मात्र यापुढे केवळ १५ दिवसांच्या आत हि मदत संबधित कामगारांच्या नातेवाईकांच्या बँक खात्यामध्ये जमा करणे अनिवार्य असणार आहे. अशा प्रकारचे आदेश महानगरपालिकांना देण्यात आलेले आहेत.
बांधकाम कामगार भांडे योजनेसाठी करा अर्ज मिळेल 30 भांडे अर्ज pdf मध्ये डाउनलोड करा 2025
काय आहे प्रकरण?
मुंबई शहरामध्ये मलनि:स्सारण वाहिन्या आणि मुंबई शहरातील गटारांची सफाई करतांना ज्या सफाई कामगारांचा मृत्यू झाला आहे अशा कामगारांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
खाजगी कंपनीमध्ये सफाई कामगार म्हणून काम करत असतांना एका सफाई कामगारांचा मृत्यू झाला होता. या कामगाराला संबधित कंपनीकडून नुकसानभरपाई मिळालेली आहे.
हि मदत मिळविण्यासाठी मुंबई येथील गटार सफाई कामगारांना ६ महिन्यांपर्यंत वाट पहावी लागत होती आता मात्र हि मदत केवळ १५ दिवसात संबधित गटारी सफाई कामगारांच्या नातेवाईकांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे.
या संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
कामगार योजना संदर्भात अधिक माहिती जाणून घ्या.
हि तर झाली गटार सफाई कामगार योजना मुंबई येथील योजना संदर्भातील माहिती. तुम्ही किंवा तुमच्या संपर्कातील मित्र नातलग किंवा ओळखीतील कोणी बांधकाम कामगार करत असेल तर अशा कामगारांसाठी देखील विविध योजना शासन राबवीत असते.
कामगार योजनांचा लाभ कसा घ्यावा या संदर्भातील सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
कामगारांना शासनाकडून विविध योजनांचा लाभ देण्यात येतो परंतु बांधकाम कामगारांना या संदर्भात सविस्तर माहिती नसल्याने ते अशा योजनांचा लाभ घेण्यास असमर्थ असतात.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या इतर योजनांचा लाभ जरूर घ्या.