बांधकाम कामगार बायोमेट्रिक नोंदणी bandhkam kamgar biometric registration पद्धत आता यापुढे अनिवार्य करण्यात आली असल्याची माहिती बांधकाम कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी विधान परिषदेत दिली आहे.
सध्या महाराष्ट्रभर बांधकाम कामगार गैरप्रकारची चर्चा सुरु आहे. बोगस बांधकाम कामगार तसेच या योजनेतील एजंट यांच्यावर कारवाई करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यांमध्ये दक्षता पथके तयार केली आहेत.
हि दक्षता पथके प्रत्येक जिल्ह्यामध्ये जावून तेथील बांधकाम कामगार योजेनेतील गैरप्रकारातील व्यक्तींना आळा घालण्याचे काम करत आहे.
बांधकाम कामगार योजनेमध्ये पार दर्शकता आणण्यासाठी अजून एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आणी तो म्हणजे बांधकाम कामगार बायोमेट्रिक नोंदणी होय.
कशी केली जार बांधका कामगार बायोमेट्रिक नोंदणी?
बांधकाम कामगार नोंदणी करण्यासाठी बायोमेट्रिक मशीनवर संबधित बांधकाम कामगारांचा अंगठा ठेवून सत्यापन केले जाणार आहे. यामुळे बांधकाम कामगार योजनेतील बोगस कामगार नोंदणीसआळा बसू शकेल.
बऱ्याच otp द्वारे नोंदणी केल्याने कोणत्याही व्यक्तीची कोठूनही नोंदणी करणे शक्य होत होते. आता मात्र बायोमेट्रिक पद्धतीने नोंदणी करावी लागणार असल्याने प्रत्यक्ष बांधका कामगारांना उपस्थित राहावे लागणार आहे.
बांधकाम कामगार बायोमेट्रिक नोंदणीमुळे जे खरोखर कामगार आहेत त्यांना कामगार योजनांच्या योजनांचा लाभ देण्यास मदत होईल.
काय म्हणाले बांधकाम कामगार मंत्री
राज्यामध्ये अनेकांनी बांधकाम कामगार योजनेचा लाभ घेण्यासाठी बोगस नोंदणी केल्याच्या अनेक तक्रारी आहेत. यामुळे आता यापुढे बांधकाम कामगारांना नोंदणी करण्यासाठी बायोमेट्रिक पद्धत अनिवार्य करण्यात आली आहे.
राज्यात बांधकाम कामगार योजनेतील बोगस ठेकेदारांविरुद्द मोठ्या प्रमाणत ठोस कारवाई सुरु करण्यात आली असून आतापर्यंत १५ ते २० ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती बांधकाम कामगार मंत्री यांनी दिली आहे.
विधान परिषदेत विरोधी पक्षाने २६० अन्वये प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला उत्तर देतांना कामगार मंत्री फुंडकर म्हणाले कि, राज्यात असंघटीत कामगारांची संख्या खूप मोठ्या प्रमाणत आहे.
बोगस नोंदणी करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात आली असून या चौकशीमध्ये जे अधिकारी दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
प्लॅटफॉर्म वर्कर्स यांच्यासाठी देखील लवकरच स्वतंत्र कायदा करून त्यांना देखील सामाजिक सुरक्षा देण्याची तरतूद या कायद्यात केली जाणार आहे.
या संदर्भातील अधिकृत माहिती पाण्यासाठी येथे क्लिक करा.
गिरणी कामगारांना मिळणार घरे
मुंबईमध्ये अंदाजे १ लाखांपेक्षा जास्त गिरणीकामगार आहेत. या गिरणी कामगारांना लवकरच घरकुल देण्याबाबतची योजना अंतिम टप्प्यात आली आहे.
या योजनेमुळे गिरणी कामगारांना त्यांचे स्वताचे घर मिळणार आहे. गिरणी कामगारांना राहण्यासाठी घराची समस्या सगळ्यात मोठी आहे. यामुळे गिरणी कामगारांचा घरकुलांचा प्रश्न काही अंशी मिटणार आहे.
गिरणी कामगार योजनेतून आता पात्र लाभार्थीना घर मिळणार असल्याने नक्कीच हि गिरणी कामगारांसाठी आनंदाची बातमी ठरणार आहे.
योजनेचा सारांश – बांधकाम कामगार नोंदणी प्रक्रियेत गैरप्रकार आढळून आल्याने आता यापुढे बांधकाम कामगार नोंदणी करण्यासाठी बायोमेट्रिक पद्धत अनिवार्य करण्यात आली आहे.