ब्युटी पार्लर अनुदान योजना 2025 – मिळणार 50 हजार अनुदान

ब्युटी पार्लर अनुदान योजना 2025 – मिळणार 50 हजार अनुदान

ब्युटी पार्लर अनुदान योजना 2025 ग्रामीण भागातील महिलांसाठी खूपच लाभदायक आहे. ५० हजार अनुद्ना मिळणार असल्याने ग्रामीण भागातील महिलांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. शहरांसह ग्रामीण भागामध्ये देखील आता ब्युटी पार्लर व्यवसाय चांगली प्रगती करतांना दिसत आहे.

यामुळे गावामध्ये देखील ब्युटी पार्लरचा व्यवसाय सुरु करण्यासाठी अनेक महिला इच्छुक असतात. परंतु भांडवल नसल्याने अनेक महिला इच्छा असूनही आपला व्यवसाय पूर्ण करू शकत नाहीत.

महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीच्या महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात हा या योजेमागील उद्देश आहे. ब्युटी पार्लर हा एक कमी गुंतवणुकीचा आणि चांगला नफा देणारा व्यवसाय आहे, जो ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांसाठी उपयुक्त आहे.

या योजनेअंतर्गत 50,000 रुपये आर्थिक सहाय्यापैकी 85% अनुदान (म्हणजेच 42,500 रुपये) शासनाकडून मिळते, तर उर्वरित 15% (7,500 रुपये) अर्जदाराने स्वतःच्या खिशातून भरावे लागतात. यामुळे महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करता येतो.

ब्युटी पार्लर अनुदान योजना 2025 योजनेचा उद्देश

ब्युटी पार्लर अनुदान योजना 2025 हि योजना अनुसूचित जमातीच्या महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सुरु करण्यात आलेली आहे.

ब्युटी पार्लर beauty parlour yojana 2025 हा कमी गुंतवणुकीचा आणि चांगला नफा देणारा व्यवसाय आहे, जो ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांसाठी उपयुक्त आहे. या योजनेचा मुख्य उद्देश महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक आणि तांत्रिक सहाय्य प्रदान करणे आहे.

गावातच महिलांना स्वतःचा ब्युटी पार्लरचा व्यवसाय सुरु करता यावा यासाठी हि योजना बेरोजगार महिलांना उपयोगी ठरणार आहे.

या योजनेतून मिळणारे फायदे

पात्र अर्जदाराला खालीलप्रमाणे फायदे या योजनेतून मिळणार आहेत.

  • ५०,००० रुपयांपर्यंत थेट आर्थिक सहाय्य.
  • त्यातील ८५% रक्कम शासनाकडून अनुदान स्वरूपात.
  • महिला केंद्रित स्वयंरोजगाराची संधी.
  • स्वतःच्या गावात किंवा शहरातच पार्लरचा व्यवसाय सुरू करता येतो.
  • मिळालेल्या अनुदानातून ब्युटी पार्लर साहित्य खरेदी करता येते.

अर्जदाराची पात्रता

अर्जदाराला योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील पात्रता आवश्यक आहे.

अर्जदार महिला अनुसूचित जमातीची असावी.

महाराष्ट्रातील रहिवासी असावा.

वय १८ ते ५० वर्षांच्या दरम्यान असावे.

यापूर्वी या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

वर्षिक उत्पन्नाची मर्यादा – तहसीलदारांकडून प्रमाणित दाखला आवश्यक.

ब्युटी पार्लर अनुदान योजना 2025 अर्जासाठी सामान्य कागदपत्रे

या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही

आधार कार्ड.

पॅन कार्ड.

दारिद्र्यरेषेखालील (BPL) कार्ड क्रमांक.

वार्षिक उत्पन्नाचा दाखला (तहसीलदार यांच्याकडून).

शिक्षण प्रमाणपत्र / व्यवसाय अनुभव(असेल तर).

बँक पासबुक झेरॉक्स (IFSC कोडसहित).

स्थावर मालमत्तेची माहिती – गाव, तालुका, जिल्हा.

शेतजमीन असल्यास सर्वे नंबर, गट नंबर, पाण्याचा स्रोत.

घराचा मिळकत क्रमांक / प्लॉट नंबर.

याआधी घेतलेल्या योजनेचा तपशील (असल्यास).

अनुसूचित जमातीसाठी अतिरिक्त कागदपत्रे

  1. अनुसूचित जमातीचा दाखला (साक्षांकित प्रत).
  2. उपविभागीय अधिकारी यांच्या स्वाक्षरीसह.
  3. रहिवासी दाखला (PDF मध्ये).
  4. ७/१२ उतारा किंवा वनहक्क पट्टा प्रमाणपत्र (PDF).
  5. आधार कार्ड साक्षांकित प्रत (PDF).
  6. दोन पासपोर्ट साईज फोटो (PDF).
  7. इतर पूरक कागदपत्रे (PDF स्वरूपात)

वरील प्रमाणे कागदपत्रे हि या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असतात.

अर्ज कसा करावा?

ब्युटी पार्लर योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करावा या संदर्भातील व्हिडीओ आणि मार्गदर्शक सूचना पहा.

आदिवासी विकास विभागाच्या अधिकृत पोर्टलवर जा, म्हणजेच nbtribal.in या वेबसाईटला भेट द्या.

तीन आडव्या रेषांवर क्लिक करून अर्जदाराचे लॉगीन या पर्यायावर क्लिक करा.

युजर आयडी,पासवर्ड आणि कॅपचा कोड टाकून साईन इनdashboa करा.

ऑनलाइन फॉर्म भरा आणि सर्व आवश्यक माहिती भरा.

वरील सर्व कागदपत्रांची PDF फाईल अपलोड करा.

अर्ज सबमिट केल्यानंतर प्रिंट/स्क्रीनशॉट घ्या.

Dashboard वरील तीन आडव्या रेषांवर क्लिक करा.

अर्ज व्यवस्थापन पर्यायाच्या खाली दिसत असलेल्या अर्ज करा या बटनावर क्लिक करा.

योजनेचे नाव निवडा या पर्यायासाठी अनुसूचित जमातींच्या महिलांना ब्युटी पार्लरचे दुकान लावण्या करिता ८५ टक्के अनुदानावर ५० हजार रुपये अनुदान देणे हा पर्याय निवडा.

योजनेच्या सविस्तर माहितीसाठी खालील व्हिडीओ पहा.

व्हिडीओ लिंक

अधिकृत वेबसाईट लिंक

योजना कुणासाठी फायदेशीर?

हि योजना ठराविक जात प्रवर्गातील महिलांसाठी आहे. या योजनेसाठी खालील महिला किंवा अर्जदार पात्र ठरणार आहेत.

  • ग्रामीण व आदिवासी भागातील बेरोजगार महिला.
  • शिक्षण अपूर्ण असलेल्या महिलांसाठी कमाईचे साधन.
  • आधीच ब्युटी पार्लरचे शिक्षण घेतलेल्या महिलांसाठी.
  • छोट्या शहरांमध्ये महिला उद्योजकतेसाठी तयार असलेल्या महिला.

योजना संबंधित महत्त्वाची माहिती

  • अर्ज करण्याची अंतिम तारीख: ३१ जुलै २०२५
  • अनुदानाची रक्कम: ५०,००० रुपयांपर्यंत
  • शासनाची अनुदान टक्केवारी: ८५%
  • अर्ज पद्धत: फक्त ऑनलाइन (PDF स्वरूपात कागदपत्रे अपलोड अनिवार्य)

तुम्ही देखील या ब्युटी पार्लर अनुदान योजना 2025 साठी पत्र असाल तर लगेच अर्ज सादर करून द्या.

ब्युटी पार्लर अनुदान योजना २०२५ म्हणजे काय?

ही योजना महाराष्ट्रातील आदिवासी विकास विभागामार्फत राबवली जात असून, अनुसूचित जमातीतील महिलांना ब्युटी पार्लर व्यवसाय सुरू करण्यासाठी ₹५०,००० पर्यंतचे आर्थिक सहाय्य दिले जाते.

या योजनेसाठी कोण पात्र आहे?

फक्त अनुसूचित जमातीतील महिला अर्ज करू शकतात. त्यांचे वय १८ ते ५० दरम्यान असावे आणि त्यांनी याआधी ही योजना घेतलेली नसावी.

योजनेअंतर्गत किती अनुदान मिळते?

₹५०,००० पर्यंत आर्थिक सहाय्य दिले जाते. त्यातील ८५% रक्कम अनुदान स्वरूपात शासन देते.

अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे?

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०२५ आहे.

या योजनेसाठी अर्ज कसा करावा?

अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावा लागतो. सर्व आवश्यक कागदपत्रे PDF फॉर्ममध्ये अपलोड करणे बंधनकारक आहे.

आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत?

आधार कार्ड,
पॅन कार्ड,
अनुसूचित जमातीचा दाखला,
वार्षिक उत्पन्नाचा दाखला (तहसीलदारांकडून),
रहिवासी दाखला,
सातबारा उतारा किंवा वन हक्क पट्टा,
दोन पासपोर्ट साईज फोटो,
बँक तपशील
(सर्व PDF स्वरूपात).

माझ्याकडे ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण नाही – तरी अर्ज करू शकते का?

होय, पण जर तुमच्याकडे संबंधित क्षेत्राचा अनुभव किंवा प्रशिक्षण प्रमाणपत्र असेल तर अर्जास प्राधान्य मिळू शकते.

योजनेची अधिकृत वेबसाइट कोणती आहे?

योजनेसाठी अर्ज आदिवासी विकास विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर करावा लागतो. अधिक माहितीसाठी गुगलवर शोधा: beauty parlour yojana 2025 digital dg

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *