दुय्यम निबंधक कार्यालयात करावा लागणारा भाडे करारनामा कसा करावा लागतो या संदर्भात संपूर्ण माहिती जाणून घेवूयात. आपल्या प्रत्येकाला कधी ना कधी दुय्यम निबंधक कार्यालयात जाण्याची वेळ येतेच. दुय्यम निबंधक कार्यालय म्हणजेच रजिस्ट्री ऑफिस म्हटले कि आपल्या डोळ्यासमोर उभे राहते ते कागद मोठ्मोठ्याला संचिका. ( पुढील लेख पण वाचा असा करा डिजिटल सातबारा डाउनलोड ) ( खालील व्हिडीओ पहा )
दुय्यम निबंधक कार्यालयातील भाडे करारनामा संदर्भातील सर्व माहिती असणे गरजेचे.
अनेक नागरिकांना वाटते हि खूप किचकट आणि जटील प्रक्रिया वाटते त्यामुळे कोणकोणती कागदपत्रे लागतात. हि प्रोसेस नेमकी कशी असते हे जाणून घेण्याच्या भानगडीत नागरिक पडत नाहीत. दोन पैसे जास्त गेले तरी चालेल पण कटकट नको म्हणून एजंटकडून काम करून घेतात. मित्रांनो दुय्यम निबंधक कार्यालयातील कामे एजंटकडून जरी तुम्ही करून घेत असाल तरी देखील तुम्हाला भाडे करारनामा कसा करावा लागतो या संदर्भातील सर्व माहिती असायला हवी. ( पुढील लेख पण वाचा व्यवसाय कर्ज मिळविण्यासाठी असा करा ऑनलाईन अर्ज )
जमिनीवरील वारसांचे हक्कसोड कसे करावे जाणून घ्या.
मित्रांनो या आधी देखील मी दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये जावून जमिनीवरील वारसांचे हक्कसोड कसे करावे या संदर्भात व्हिडीओ बनविलेला आहे. वारसांचे हक्कसोड करतांना कोणकोणती कागदपत्रे लागतात. त्या संबधी अगदी सविस्तर माहिती मी त्या व्हिडीओमध्ये सांगितलेली आहे. खालील व्हिडीओ पहा किंवा येथे क्लिक करा.
जाणून घ्या भाडे पट्टा करार कशासाठी करावा लागतो.
तुम्ही जर एखादा व्यवसाय सुरु करत असाल किंवा एखादे शॉप टाकत असाल तर त्यासाठी आपल्याला एखादा गाळा किंवा खोली भाड्याने घ्यावी लागते. अशावेळी मालक आणि व्यावसायिक यामध्ये भाडेपट्टा करार करण्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयात जावे लागते आणि त्या ठिकाणी हा करार केला जातो. बऱ्याच बाबतीत हा करार केला जात नाही कारण ग्रामीण भागामध्ये तशी मालक आणि व्यावसायिकांना याची आवश्यकता वाटत नाही. परंतु ग्रामीण भागामध्ये देखील काही व्यवसाय असे आहेत कि ज्यांच्यासाठी शासकीय परवानगी अपरिहार्य लागतेच. या ठिकाणी आपण मेडिकलचे उदाहरण बघुयात. तुम्हाला मेडिकलचा व्यवसाय कोणत्याही ठिकाणी सुरु करायचा असेल तर त्यासाठी भाडेपट्टा करार करणे खूपच आवशक असते. तर हा भाडे पट्टा करार कसा करावा लागतो त्या संदर्भात आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत. ( हा लेख पण वाचा शासकीय अनुदानावर उद्योग कर्ज योजना )
भाडेपट्टा करारासाठी लागणारी कागदपत्रे
भाडेपट्टा करारासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात ते जाणून घ्या. हा भाडेपट्टा करार ग्रामीण भागात मेडिकल व्यवसाय सुरु करण्यासाठी केलेला आहे त्यामुळे ग्रामीण भागातील कागदपत्रांची प्रोसेस या ठिकाणी सांगितलेली आहे.
- ज्या ठिकाणी तुम्ही व्यवसाय सुरु करणार आहात त्या ठिकाणचा मालकाच्या नावाचा ग्राम पंचायतचा जागेचा दाखला.( नमुना नंबर ८ )
- मालकाचे आधार कार्डाची छायांकित प्रत तसेच मालकाच्या पत्नीच्या आधार कार्डची छायांकित प्रत. ( नमुना नंबरवर पत्नीचे नाव अपरिहार्य असतेच)
- जागेचा कर भरणा केल्याची पावती
- ज्या गावात व्यवसाय स्रुरू करायचा आहे त्या ग्रामपंचायतचे नाहरकत प्रमाणपत्र
- घरमालक, व्यावसायिक व दोन साक्षीदार यांचे छायांकित प्रत
- व्यावसायिक, घरमालक व साक्षीदारांचे कोरोना नसल्याचे प्रमाणपत्र ( जर कोरोना काळ चालू असेल तर )
- जागेचा नकाशा ( चतु:सीमा )
भाडे करारनामा करण्यासाठी लागणारी कार्यालयीन कागदपत्रे
- Documents handling charges ( 220 )
- 2000.00 Challan
- भाडेपट्टा करार
हि सर्व कागदपत्रे सादर केल्यानंतर मालक, व्यावसायिक व साक्षीदारांचे दुय्यम निबंधक कार्यलयात ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी बायोमेट्रिक पद्धतीने अंगठ्याचे ठसे व कॉम्प्युटर कॅमेऱ्यातून छायाचित्र घेतले जाते. सर्व कार्यालयीन कागदपत्रे पूर्ण झाल्यानंतर ऑनलाईन माहिती भरलेल्या दस्त गोषवाऱ्याची प्रत व इतर कागदपत्रंही प्रत अर्जदारास दिली जाते.
विविध शासकीय योजनांची माहिती मिळविण्यासाठी आमच्याशी जोडा.
विविध शासकीय योजनेच्या माहितीसाठी आमच्या डिजिटल डीजी युट्युब चॅनल ला भेट द्या. आमच्या WhatsApp Group मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा. मित्रांनो तुम्हाला विविध शेतकरी अनुदान योजना संदर्भातील माहिती हवी असेल तर आमच्य फेसबुक ग्रुपमध्ये सहभागी व्हा त्यासाठी येथे क्लिक करा.