आजच्या या लेखामध्ये आपण goat farming training संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. शेळी पालन व्यवसाय हा इतर शेती पूरक व्यवसायापैकी सर्वात लोकप्रिय शेती पूरक व्यवसाय आहे. ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी शेळी पालन व्यवसाय करत असतात. शास्त्रोक्त पद्धतीने शेळी पालन व्यवसाय करण्यासाठी शेळी पालन प्रशिक्षण घेणे खूपच आवश्यक आहे आणि याच संदर्भातील म्हणजेच online goat farming training संदर्भात आपण या लेखामध्ये माहिती जाणून घेणार आहोत. ( शेळी पालन प्रशिक्षण ऑनलाईन अर्ज सादर करण्याची लिंक या लेखाच्या शेवटी दिलेली आहे. शेळी पालन प्रशिक्षणाचा ऑनलाईन अर्ज कसा सादर करावा या संदर्भातील खालील व्हिडीओ पहा. )
Goat farming training चे फायदे
कोणताही व्यवसाय करत असतांना त्या व्यवसायातील बारकावे माहित असेल तर तो व्यवसाय चांगल्या पद्धतीने करता येतो. शेळी पालन व्यवसायाचे (goat farming) प्रशिक्षण घेतल्यास खालील फायदे तुम्हाला मिळू शकतील.
- शेळी पालन प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थीस प्रमाणपत्र मिळते.
- प्रशिक्षणार्थीला शेळी पालन व्यवसाय करण्यासाठी जर बँकेचे कर्ज हवे असेल तर त्यासाठी हे goat farming training प्रमाणपत्र उपयोगी येते.
- प्रशिक्षणामध्ये शेळी पालन योजनेसाठी शासनाच्या कोणकोणत्या योजना असतात त्या संबधी माहिती मिळते.
- शेळ्यांच्या जाती, शेळ्यांचे आरोग्य, खाद्य, आजार आणि इतर विषयावर माहिती मिळते.
- शेळी पालन व्यवसाय वाढीसाठी सखोल माहिती मिळते.
शेती संबधित योजनांची माहिती मिळवा तुमच्या मोबाईलवर. आमच्या Whatsapp Group मध्ये सहभागी व्हा.
शेळी पालन प्रशिक्षण Goat farming training कोठे मिळेल.
Goat farming training म्हणजेच शेळी पालन प्रशिक्षण प्रमाणपत्र मिळविण्यासाठी युवा परिवर्तन अकॅडमी या संस्थेतर्फे शेतकरी बांधवांसाठी ६ दिवसाचे ऑनलाईन ट्रेनिंग आयोजित करण्यात आलेले आहे. ऑनलाइन शेळी पालन प्रशिक्षण Goat farming training संदर्भातील एक बातमी दैनिक या वृत्तपत्रामध्ये प्रकाशित करण्यात आलेली आहे ती बातमी खालील प्रमाणे आहे.
ऑनलाईन शेळी पालन प्रशिक्षण बातमी Goat farming training
शेतकऱ्यांनी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेळीपालन व्यवसाय सुरु करावा आणि शेळीपालन व्यवसायातून त्यांची आर्थिक उन्नती व्हावी या उद्देशाने युवा परिवर्तन संस्थेच्या वतीने दिनांक २३ ते २८ सप्टेंबर २०२१ पर्यंत ६ दिवसाचे ऑनलाईन शेळीपालन प्रशिक्षण आयोजित करण्यात येत आहे. या प्रशिक्षणामध्ये शेतकऱ्यांना तज्ञ प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन करण्यात येणार असून प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर ऑनलाईन पद्धतीनेच परीक्षा घेवून परीक्षार्थींना प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांना शेळी पालन व्यवसायातील संधी, शेळ्यांचे आरोग्य आणि व्यवस्थापन, शेळीपालन संदर्भातील शासकीय योजना आणि इतर अत्यंत महत्वाची माहिती या प्रशिक्षणामध्ये देण्यात येणार आहे.
संस्थेच्या प्रतिनिधींशी संपर्क साधा.
युवा परिवर्तन संस्था ही ९४ वर्षे जुनी असून या भारतातील १७ राज्यामध्ये कार्यरत आहे.
हे प्रशिक्षण ऑनलाईन असल्यामुळे महाराष्ट्रराज्यातील किंवा ज्यांना मराठी भाषेचे ज्ञान आहे असे कोणतेही शेतकरी या प्रशिक्षणामध्ये सहभागी होऊ शकतात. प्रशिक्षणाच्या अधिक माहितीसाठी संपदा नळणीकर (Livelihood development centre manager ) यांच्याशी ९०७५५६२४६६ व ९०६७०८४०५९ या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा. खालील बटनावर क्लिक करून ऑनलाईन अर्ज सादर करा.
शेळी पालन प्रशिक्षण संदर्भात माहिती
युवा परिवर्तन संस्था ९४ वर्षे जुनी असून भारतातील १७ राज्यामध्ये कार्यरत आहे. या प्रशिक्षणामध्ये सहभागी होऊन यशस्वीपणे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण ऑनलाइन असल्यामुळे कोणताही शेतकरी कोणत्याही भागातून या प्रशिक्षणामध्ये भाग घेऊ शकतात. प्रशिक्षणामध्ये जो सेशन होणार आहेत त्यावर दुसऱ्या दिवशी युट्युब लाइव शेतकऱ्यांच्या मनामध्ये असलेल्या शंकांचे निरसन केले जाणार आहे.
शेळी पालन प्रशिक्षण goat farming training प्रमाणपत्राबाबत माहिती.
युवा परिवर्तन संस्थेच्या वतीने आयोजित केलेले प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर प्रशिक्षणार्थीना जे प्रमाणपत्र मिळणार आहे त्यावर N.S.D.C म्हणजेच National Skill Development Corporation व Skill India यांचे लोगो असणार आहेत. युवा परिवर्तन ही संस्था N.S.D.C. शी संलग्न असल्यामुळे हे प्रशिक्षण आणखीनच गुणवत्तापूर्ण होईल यामध्ये तिळमात्र शंका नाही. हे शेळी पालन प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर ऑनलाईन परीक्षा देखील होणार आहे. परीक्षा उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थीच्या प्रमाणपत्रावर क़्यु आर. कोड सुद्धा असणार आहे.
शेळी पालन योजना Sheli palan yojana
शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेतकरी बांधव शेळी पालन व्यवसाय सुरु करू शकतात. शेळी पालन व्यवसाय करण्यासाठी शासनाच्या विविध योजना सुरु असतात त्या योजनाचा लाभ घेवून देखील शेळी पालन योजना सुरु असतात. जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागातर्फे दरवर्षी शेळी पालन वाटप योजना सुरु असतात. या योजनांचा शेतकरी बांधवानी लाभ घेतल्यास शेळी पालन व्यवसाय सुरु करण्यास त्यांना अधिक मदत मिळू शकते. महाराष्ट्र शासनच्या अधिकृत वेबसाईटवर देखील विविध योजनांची माहिती दिलेली असते या वेबसाईटला भेट देऊन तुम्ही शासकीय योजनांची माहिती मिळवू शकता.