आज आपण spiny gourd benefits म्हणजेच कंटोला भाजीचे फायदे संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. कशी एका सर्वसामान्य शेतकऱ्यांनी हि spine gourd म्हणजेच कंटोला शेती केली आहे. यांना कल्पना कशी सुचली इत्यादी माहिती आपण या लेखामध्ये जाऊन घेणार आहोत. अशी एक म्हण आहे कि जे प्रवाहाच्या विरुद्ध पोहतो तोच जीवनामध्ये यशस्वी होतो. ( खालील व्हिडीओ बघा )
पारंपारिक पिकांना फाटा देत केली कंटोला शेती spiny gourd benefits
इतरांपेक्षा काहीतरी नवीन करून दाखविणारच खरा हिमंतवान असतो. अशीच काहीशी हिम्मत केली आहे ती भोकरदन तालुक्यातील वालसा या गावातील तुकाराम संपत पोटे या शेतकऱ्यांनी. शेतामध्ये पारंपारिक पिके घेवून कंटाळलेल्या तुकाराम पोटे यांना शेतामध्ये काहीतरी नवीन करण्याची कल्पना सुचली. कमी खर्चामध्ये येणारे एखादे पिक घेता येईल का हा विचार करत असतांना त्यांना कंटोला शेतीची कल्पना सुचली आणि मग हि शेती यशस्वी करण्याच्या मार्गाला ते लागले.
कंटोला भाजीचे फायदे जाणून घ्या spiny gourd benefits
शेतकरी बधुंनो कंटोला शेती करायची म्हटल्यावर त्या संबधी माहिती असणे खूप महत्वाचे होते. तुकाराम पोटे यांनी कंटोला शेती संदर्भात माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. कंटोला या वनस्पतीला इंग्रजी मध्ये spiny gourd असे म्हणतात. काहीजण याला कंटूले Kantule देखील म्हणतात. कंटोलाचे मानवी आरोग्याला खूप फायदे आहेत ते आपण या संदर्भातील फायद्या विषयी पुढे बघणार आहोत. spiny gourd benefits.
मी कंटोला शेती संदर्भात युट्युबवर बरीच माहिती घेतली. कंटोला हि एक प्रकारची रान भाजी असून या याला मार्केटमध्ये १५० किलो प्रमाणे बाजारभाव मिळतो. कंटोला या वनस्पतीचे सेवन केल्याने आरोग्यावर चांगला परिणाम होतो. – तुकाराम पोटे शेतकरी.
पारंपारिक पिकांच्या तुलनेत कंटोला शेती spiny gourdfarming फायद्याची
वालसा वडाळा येथील शेतकरी श्री तुकाराम पोटे यानी त्यांच्या शेतामध्ये ५ गुंठे एवढ्या क्षेत्रावर कंटोला म्हणजेच spiny gourd लावलेले आहे. या spiny gourd farming ला म्हणजेच कंटोला शेतीला खूपच कमी खर्च असतो शिवाय यावर औषध फवारणी देखील खूप कमी करावी लागत असल्याने खर्च प्रचंड प्रमाणत वाचतो. कंटोला spiny gourd एकदा लावल्यावर दहा वर्षे टिकून राहण्याची याची क्षमता असते.
या कंटोला शेतीवर खूप कमी प्रमाणात खर्च करावा लागतो. सध्या मी ५ गुंठे एवढ्या क्षेत्रावर हा कंटोला लावलेला असून पारंपारिक पिकांच्या तुलनेत या पिकामध्ये नफा जास्त आहे. त्यामुळे पुढील वर्षी मी पाच गुंठ्याऐवजी दहा गुंठे एवढे कंटोला लावणार आहे.- तुकाराम पोटे शेतकरी
कंटोला भाजीचे फायदे benefits of kantola vegetable.
- कंटोला भाजी सेवन केल्याने डोकेदुखी, कानदुखी, केसगळती, खोकला, पोटदुखी इत्यादी आजारामध्ये फायदा होऊ शकतो.
- मुळव्याध या आजारावर देखील कंटोला सेवन केल्याने फायदा होऊ शकतो.
- ही डायबीटीज म्हणजेच मधुमेह या बिमारीवर देखील कंटोला प्रभावशाली आहे.
- पावसाळ्यामध्ये होणारे खाज किंवा खरुज या रोगावर कंटोला हे रामबाण उपाय आहे.
- लकवा, सूज, डोळ्यांचे आजर इत्यादी रोगांवर देखील याचा फायदा होऊ शकतो.
- जर तुम्हाला ताप आला असेल तर कंटोला भाजी तुम्ही खाऊ शकता यामुळे नक्कीच फायदा होतो.
- कँसर व ब्लड प्रेशर या बिमारीमध्ये जर तुम्ही कंटोला भाजीचे सेवन केले तर नक्कीच याचे फायदे तुम्हाला होऊ शकते.
कंटोला वनस्पतीमध्ये असणारे गुणधर्म spiny gourd ingredients
- प्रोटीन
- फायबर
- कार्बोहाइड्रेट्स
- बी 1विटॅमिन
- ए विटॅमिन
- विटॅमिन सी
- विटामिन डी2
- कॅल्शियम
- मॅग्नीशियम
- पोटॅशियम
- सोडियम
- कॉपर
- जिंक
- अजूनही इतर अनेक गुणधर्म
अशा प्रकारे कंटोला म्हणजेच spiny gourd चे फायदे आहेत. कंटोला हि भाजी सर्वसाधारण नसून अनेक गुणधर्म या भाजीमध्ये सामावलेले आहेत त्यामुळे नक्की तुम्ही देखील या भाजीचा तुमच्या आहारामध्ये समावेश करा.
भाजीसाठी कंटोला हवा आहे का तर या शेतकऱ्यांशी संपर्क साधा.
कंटोलाचे फायदे बघितल्यावर spiny gourd benefits नक्कीच हि भाजी तुम्हाला खावीशी वाटत असेल तर बाजारातून विकत घ्या. शेतातील गावरान कंटोला हवा असेल आणि तुम्ही भोकरदन परिसरातील शेतकरी असाल तर खालील शेतकरी बांधवांशी संपर्क साधा.
तुकाराम संपत पोटे रा. वालसा (वडाळा) मो. नंबर ९५११८१७०२२