पिक विमा ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख वाढली आहे. अनेक शेतकरी बांधवानी त्यांच्या शेतातील पिकांचा खरीप पिक विमा अर्ज अजूनही सादर केलेली नाही.
खरीप पिक विमा ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२२ देण्यात आलेली होती. म्हणजेच शेतकरी बांधवाना त्यांच्या शेतातील पिकांचा पिक विमा ३१ जुलै २०२२ च्या आत सादर करणे आवश्यक होते.
परंतु ३१ जुलै २०२२ रोजी रविवार येत असून सार्वजनिक सुट्टी येत आहे. यामुळे आता खरीप पिक विमा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी एक दिवस वाढून देण्यात आलेला आहे.
ऑनलाईन पिक विमा अर्ज तारीख वाढली
अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२२ एवजी १ ऑगस्ट २०२२ करण्यात आलेली आहे.
पीएमएफबीवाय या वेबसाईटवर खालीलप्रमाणे सूचना दिलेली आहे.
Attention: Cut Off Date of 31/07/2022 for Enrollment of Kharif 2022 has been extended to 01/08/2022 midnight on account of Public Holiday.
या सूचनेचा अर्थ असा आहे कि सार्वजनिक सुट्टीच्या करणास्तव खरिफ पिक विमा अर्ज २०२२ सादर करण्याची शेवटची तारीख १ ऑगस्ट २०२२ च्या मध्यरात्री पर्यंत वाढविण्यात आलेली आहे.
या संदर्भातील व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
लगेच सादर करा तुमचा पिक विमा अर्ज
खरीप पिक विमा अर्ज तारीख वाढून दिली असल्याची सूचना शासनाच्या पीएमएफबीवाय या संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे. खात्री करण्यासाठी येथे क्लिक करा.
त्यामुळे ज्या शेतकरी बांधवानी खरीप पिक विमा अर्ज सादर केला नसेल त्यांनी लगेच जवळच्या सीएससी सेंटरवर जावून सादर करून द्यावा.
अर्जा संबधी अधिकची माहिती पहा.
सीएससी सेंटर जावून शेतकरी खरीप पिक विमा अर्ज सादर करू शकतात किंवा शेतकरी स्वतः अर्ज सादर करू शकतात.
पिक विमा अर्ज कसा सादर करावा लागतो हे जाणून घेण्यासाठी खालील व्हिडीओ पहा.
पिक विमा हि आग्रहाची विषय वस्तू असल्याने नक्कीच शेतकरी बांधवानी आपापल्या शेतातील पिकांचा पिक विमा उतरवून घ्यावा. जेणे करून नैसर्गिक संकटामुळे पिकांचे नुकसान झाले तर शेतकऱ्यास पिक नुकसान भरपाई मिळते.
पिक विमा काढल्यानंतर पिकांचे नुकसान झाले तर नुकसान झाल्यापसून ७२ तासाच्या आत पिक विमा कंपनीस सूचना द्यावी लागती. हि सूचना दिल्यानंतर पिक विमा प्रतिनिधी नुकसानीची पाहणी करण्यासाठी येतात नुकसानीची खात्री झाल्यानंतर मग शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नुकसानभरपाईची रक्कम जमा केली जावू शकते.