सौर पंपासाठी 15 कोटी 27 लाखाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यावर्षी 50,000 पंप बसवण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे.
पंतप्रधान शेतकरी ऊर्जा सुरक्षा आणि आणि प्रोत्साहन महाअभियानासाठी कुसुम सौर कृषी पंप योजना – टप्पा दोन अंतर्गत महाराष्ट्र सरकारने 15 कोटी 27 लाख 54 हजार रुपयाचा निधी महाऊर्जाला देण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र राज्यात ज्या ठिकाणी वीज उपलब्ध नाही अशा ठिकाणी कृषी पंपांना सौरऊर्जेद्वारे वीज देण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्यात एक लाख सौर कृषी पंप बसण्यात येणार आहेत. यापैकी 10 टक्के हिस्सा राज्य सरकार यांच्या वतीने भरला जाणार आहे.
ज्या ठिकाणी वीज उपलब्ध नाही अशा ठिकाणी शेतकऱ्यांना 3 HP, 5 HP आणि 7.5 HP क्षमतेच्या सौर कृषी पंपासाठी सौर ऊर्जा वीज जोडणी देण्यात येणार आहे.
हे पण वाचा बऱ्याच जिल्ह्यामध्ये सौर कृषी पंपाचा कोटा उपलब्ध पहा यादी
सौर पंपासाठी 15 कोटी निधीमुळे पंप उभारणीस मिळणार वेग
ज्या शेतकरी बांधवांकडे अगोदरच वीज कनेक्शन आहे त्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही त्यामुळे हि योजना अशा शेतकऱ्यांसाठी आहे ज्यांच्याकडे वीज उपलब्ध नाही.
ओपन कॅटेगरी अर्थात खुला प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी 90% व अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी 95 टक्के अनुदानावर ही सौर कृषी पंप योजना राबविण्यात येते.
महाराष्ट्र राज्यात सौर कृषी पंप योजना राबविताना एक लाख पारेशन विरहित सौर कृषी पंप मंजूर केले असून त्यांची अंमलबजावणी महाऊर्जा करत आहे.
या संदर्भात फेब्रुवारी महिन्यामध्ये एक बैठक घेण्यात आलेली होती त्यामध्ये चालू वर्षी 50 हजार नग सौर कृषी पंप बसविण्यात मान्यता देण्यात आलेली आहे.
त्यामुळे 14 सौर कृषी पंप पुरवठादारांना वर्क ऑर्डर देण्यात आलेल्या आहेत. कुसुम सौर कृषी पंप योजना अंतर्गत दुसऱ्या टप्प्या अंतर्गत 30,527 लाभार्थ्यांनी लाभार्थी हिस्सा जमा केलेला आहे. यामधील 10 हजार 65 सौर कृषी पंप पैकी 8918 सर्वसाधारण गटातील शेतकरी आहेत.
सौर पंपासाठी 15 कोटी 27 लाखाचा निधी मंजूर शेतकऱ्यांची चिंता होणार दूर
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांसाठी 699 तसेच आदिवासी विकास विभागाकडील लाभार्थ्यांसाठी 451 सौर कृषी पंप देण्यात येणार आहेत.
ज्या शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये बोअरवेल्स आहेत अशा ठिकाणी सौर कृषी पंप बसविण्याचे काम हाती घेण्यात आलेले आहे ज्याची लाभार्थी संख्या 8411 एवढी आहे.
सौर कृषी पंप योजनेसाठी महाराष्ट्र राज्य सरकारकडून 10%, लाभार्थी हिस्सा 10% व केंद्र सरकारकडून 30% हिस्सा देण्यात येणार आहे उरलेला 30 टक्के हिस्सा महावितरण कडील इस्क्रो खात्यात वाढीव वीज विक्रीवरील करातून परस्पर जमा होणाऱ्या रकमेतून सरकारच्या मान्यतेनंतर वर्ग करण्यात येणार आहे.
ओपन कॅटेगरी म्हणजेच सर्वसाधारण शेतकरी बांधवांसाठी महाराष्ट्र राज्य सरकारच्या अनुदानाच्या 10% हिस्सा उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे.
कृषी पंपासाठी करावा लागणार ऑनलाईन अर्ज
चालू आर्थिक वर्षात या सौर कृषी पंप योजनेकरिता अर्थसंकल्पात 109 कोटी 11 लाख इतका निधी मंजूर करण्यात आला होता. त्यानुसार 10% शासन हिस्सा देण्यासाठी अर्थसंकल्पीय निधीच्या 15 टक्केनुसार महाऊर्जाला 15 कोटी 27 लाख 54 हजार रुपये वर्ग करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
यामुळे आता लवकरच शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये सौर कृषी पंप उभारण्यास गती मिळणार आहे. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
सौर पंप मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करणे गरजेचे आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी महाउर्जा या वेबसाईटला भेट द्यावी.
तुम्हाला जर माहित नसेल कि कोणत्या पंपासाठी किती निधी भरावा लागणार आहे तर या संदर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.