Kusum solar pump yojana new update ओपन कॅटेगरीसाठी सौर पंप लवकरच मिळणार असून त्या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. जाणून घेवूयात या संदर्भातील सविस्तर माहिती.
ओपन कॅटेगरीसाठी सौर पंप लवकरच वितरीत केले जाणार आहे कारण या सौर पंपासाठी लागणारा निधी संदर्भातील शासन निर्णय नुकताच काढण्यात आलेला आहे.
जे खुल्या प्रवर्गातील शेतकरी आहेत त्यांना आता लवकरच सौर कृषी पंप मिळणार आहे. प्रधान मंत्री किसान उर्जा व महाभियान म्हजेच कुसुम योजना अंतर्गत सर्वसाधारण घटकांच्या सौर कृषी पंपाच्या लाभार्थ्यांच्या हिश्यापोटी सन २०२२ – २३ मध्ये अनुदान वितरीत करण्यात आलेले आहे.
तुम्ही ऑनलाईन अर्ज केला नाही का पहा कसा करावा लागतो अर्ज saur urja kusum yojana सौर ऊर्जा कृषी पंपाचे अर्ज पुन्हा सुरु.
ओपन कॅटेगरीसाठी सौर पंप निधी उपलब्ध झाल्याने पंप वितरण गती वाढणार.
अनेक शेतकरी बांधवानी यांच्या शेतामध्ये सौर कृषी पंप बसविण्यासाठी अर्ज केलेले आहेत. परंतु निधी अभावी हे पंप शेतकरी बांधवाना वितरीत करता येत नव्हते.
आता ओपन कॅटेगरीसाठी सौर पंप खरेदी करण्यासाठी शासनाच्या वतीने जी आर काढण्यात आलेल आहे.
कुसुम योजनेच्या घटक ब अंतर्गत एकूण १ लाख पारेषण विरहीत सौर कृषी पंपांना मंजुरी देण्यात आलेली आहे. कुसुम सौर पंप योजना टप्पा – २ अंतर्गत अनेक शेतकऱ्यांनी सोलर पंपासाठी ऑनलाईन अर्ज केले आहेत.
अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ४६,९९७ एवढी आहे. सौर कृषी पंपासाठी लागणारा स्वहिस्सा देखील या लाभार्थ्यांनी भरलेला आहे.
सर्वसाधारण प्रवर्गातील जे शेतकरी आहेत या गटासाठी राज्य शासनाच्या अर्थसंकल्पीय अनुदानातून १० टक्के हिस्सा देण्यात येणार आहे.
पुढील माहिती पहा ओपन कास्टसाठी सौर कृषी पंपाचा कोटा उपलब्ध असा करा अर्ज
सौर कृषी पंपासाठी मिळाला १५ कोटी निधी.
solar pump yojana 2022 तसेच १० टक्के लाभार्थी हिस्सा ३० टक्के केंद्र शासनाचे अर्थसहाय्य व उर्वरित जी ३० टक्के रक्कम लागणार आहे ती महावितरण कडील एस्क्रो खात्यात वाढीव वीज विक्रीवरील करामधून परस्पर जमा होणाऱ्या रकमेतून दिली जाणार आहे.
शासन निर्णय पहा.
मंजूर झालेल्या १ लाख सौर कृषी पंपासाठी १० टक्के शासन हिस्सा निधी पंधरा कोटी सत्तावीस लाख चोपन्न हजार (१५.२७५४) महाउर्जाला वितरीत करण्यास शासनाचे मंजुरी दिली आहे.
या संदर्भातील शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी विजेची समस्या शेतकरी बांधवाना सतावत असते. अशावेळी सौर कृषी पंपाद्वारे शेती पिकास पाणी देणे सोयीचे होते.
यामुळे अनेक शेतकऱ्यांनी सौर कृषी पंपासाठी अर्ज केलेले आहेत आणि काहीजण कोटा कधी उपलब्ध होते यासाठी वाट पाहून आहेत.
तुम्हाला देखील सौर कृषी पंप हवा असेल तर ऑनलाईन अर्ज करून द्या.