पीएम किसान योजनेचा 13 वा हफ्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. जाणून घेवूयात या संदर्भातील संपूर्ण माहिती.
शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कि पीएम किसान योजना 2023 अंतर्गत 2000 रुपयांचा हफ्ता लवकरच शेतकरी बांधवाच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे.
पीएम किसान योजना अंतर्गत महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातील पात्र शेतकरी बांधवाना 2 हजार रुपयांचे एकूण तीन हफ्ते दिले जातात. एकंदरीत शेतकरी बांधवाच्या बँक खात्यामध्ये एका वर्षामध्ये 4 महिन्याच्या अंतराने 6000 रुपये अनुदान जमा केले जाते.
योजनेचा हफ्ता जमा करण्याची तयारी शासनस्तरावरून पूर्ण करण्यात आलेली आहे. याच आठवड्यामध्ये हि रक्कम शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता असल्याची खात्रीशीर माहिती देण्यात आलेली आहे.
त्यामुळे तुम्ही जर pm kisan samman nidhi योजनेचे पात्र लाभार्थी असाल तर याच आठवड्यामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये हि रक्कम जमा होऊ शकते.
पीएम किसान योजनेचा 13 वा हफ्ता तुम्हाला मिळेल का असे करा चेक
अनेक शेतकरी बांधव पीएम किसान सन्मान निधी योजनेपासून वंचित राहत आहेत. याचे प्रमुख एक कारण म्हणजे केवायसी न करणे होय. तुम्हाला पीएम किसान योजनेचा 13 वा हफ्ता मिळेल कि नाही pm kisan 13th installment हे चेक करायचे असेल तर खालील पद्धतीचा अवलंब करा.
- pm kisan samman nidhi योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- फार्मर्स कॉर्नर या पर्यायावर क्लिक करा.
- बेनिफिशरी लिस्ट या पर्यायावर चेक करून तुमचे नाव तपासून घ्या.
- पीएम किसान योजनेचे स्टेट्स Yes असेल तर समजून जा कि तुम्हाला योजनेचा हफ्ता मिळविण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही पण जर स्टेट्स rejected असेल तर मात्र तुम्हाला या योजनेचा हफ्ता मिळणार नाही.
तुमचा अर्ज जर रिजेक्ट झाला असेल तर का झाला त्याचे कारण शोधण्यासाठी तुमची तुमच्या तालुक्यातील तहसील कार्यालयामधील PM Kisan sanman योजनेच्या कार्यालयास भेट द्या आणि त्या संदर्भातील माहिती जाणून घेवून पूर्तता करा.
ईकेवायसी करून घ्या.
बऱ्याच वेळेस बँकेतील नाव किंवा खाते नंबर यातील माहिती अचूक नसल्याने पीएम किसान सन्मान निधीचा हफ्ता शेतकरी बांधवाना मिळत नाही.
खालील व्हिडीओ पहा
पीएम किसान सन्मान निधीचा हफ्ता नियमित मिळविण्यासाठी सर्व माहिती अचूक सादर करणे गरजेचे आहे. शिवाय ईकेवायसी करणे गरजेचे आहे.
अधिकृत वेबसाईट लिंकसाठी येथे क्लिक करा.
वरती सांगितल्याप्रमाणे पीएम किसान योजनेचे स्टेट्स Yes दिसत नसेल तर लगेच ईकेवायसी करून घ्या जेणे करून तुम्हाला या पीएम किसान योजनेचा 13 वा हफ्ता मिळू शकेल.
पीएम किसान योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा केला जातो, कोणकोणती कागदपत्रे लागतात पहा सविस्तर माहिती येथे क्लिक करा.