shadi anudan maharashtra बांधकाम कामगारांच्या एका मुलीच्या लग्नासाठी शासनाकडून ५१ हजार रुपये अनुदान मिळते. हे आर्थिक सहाय्य मिळविण्यासाठी कोणती पद्धत असते हे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत जेणे करून तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकेल.
ज्या बांधकाम कामगारांची नोंदणी झाली आहे अशा बांधकाम कामगाराच्या एका मुलीच्या लग्नासाठी vivah anudan शासनाकडून ५१ हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येते.
यासाठी बांधकाम कामगार नोंदणी असणे गरजेचे असते. तुमची बांधकाम कामगार म्हणून नोंदणी झाली असेल तर तुम्ही या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.
१ मुलीच्या लग्नासाठी ५१ हजार रुपये एवढे आर्थिक सहाय्य हवे असेल तर त्यासाठी कोठे आणि कसा अर्ज करावा लागतो शिवाय कोणकोणते कागदपत्रे अपलोड करावे लागतात या संदर्भात सविस्तर माहिती आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे हा लेख संपूर्ण वाचा.
पुढील माहिती पण कामाची आहे बांधकाम कामगार नोंदणी 1 रुपयात ऑनलाईन पद्धतीने पहा प्रत्यक्ष उदाहरण bandhkam kamgar yojana.
shadi anudan maharashtra लग्नासाठी मिळणार आर्थिक सहाय्य
कोणत्याही बापाला आपल्या मुलीचे लग्न अगदी थाटामाटात करण्याची इच्छा असते. परंतु लग्न म्हटले कि खर्च आलाच. कितीही साध्या पद्धतीने लग्न करायचे म्हटले तरी वधू पित्यास खर्च करावाच लागतो.
तुम्ही जर बांधकाम कामगार असाल आणि तुमच्याकडे तुमच्या मुलीचे लग्न करण्यासाठी पैसे नसतील तर शासनाकडून तुम्हाला आर्थिक सहाय्य केले जाते.
यासाठी एक ऑनलाईन अर्ज करावा लागतो. या योजनेचा लाभ तेंव्हाच घेता येतो जेंव्हा तुमची बांधकाम कामगार म्हणून नोंदणी झालेली असेल.
चला तर आता जाणून घेवूयात मुलीच्या लग्नासाठी ५१ हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य lagna anudan मिळविण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा लगतो, त्यासाठी कोणकोणते कागदपत्रे आवश्यक असतात.
लग्न झाल्यावर ५१ हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य मिळविण्यासाठी अर्ज करावा लागतो.
आवश्यक असणारी कागदपत्रे.
बांधकाम कामगार मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करावा लागतो. अर्ज सादर करतांना काही कागदपत्रे अपलोड करावी लागतात ती कागदपत्रे तुमच्याकडे तयार असल्यावरच ऑनलाईन अर्ज सादर करण्यास सुरुवात करा.
योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेत.
मुलीच्या विवाहाचे प्रमाणपत्र अर्थात marriage certificate
मुलीचे राशन कार्ड.
आधार कार्ड.
मुलीचा जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र.
वरील सर्व कागदपत्रे स्कॅन करून ठेवा कारण ऑनलाईन shadi anudan maharashtra अर्ज करतेवेळी हि कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत.
ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत
आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे हे आर्थिक सहाय्य मिळविण्यासाठी ऑनलाईन अर्ज कासा करावा लागतो. ऑनलाईन अर्ज करणे अगदी सोपे आहे. तुम्ही जर बांधकाम कामगार नोंदणी केलेली असेल तर तुमच्याकडे बांधकाम कामगार रजिस्ट्रेशन नंबर असतो हा नंबर खूप महत्वाचा असतो.
बांधकाम कामगार मुलीच्या लग्नासाठी आर्थिक सहाय्य मिळविण्यासाठी जो अर्ज करावा लागतो त्या संदर्भातील एक व्हिडीओ खाली दिलेला आहे तो व्हिडीओ देखील तुम्ही बघू शकता.
ऑनलाईन अर्ज करण्याची खालील पद्धत आहे.
गुगलच्या सर्चबार मध्ये बांधकाम कामगार असा शब्द टाईप करा.
बांधकाम कामगार विभागाची वेबसाईट ओपन झाल्यावर दाव्यासाठी ऑनलाईन अर्ज करा या बटनावर क्लिक करा.
त्यानंतर New Claim हा पर्याय निवडा.
बांधकाम कामगार रजिस्ट्रेशन क्रमांक टाका आणि प्रोसिड टू फॉर्म या बटनावर क्लिक करा.
आता तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर एक ओटीपी येईल तो दिलेल्या चौकटीत टाका आणि Validate OTP या बटनावर क्लिक करा.
जसे हि तुम्ही Validate OTP या बटनावर क्लिक कराल त्यावेळी तुमच्या कॉम्प्युटर स्क्रीनवर एक फॉर्म ओपन होईल त्यामध्ये आवश्यक ती माहिती भरा किंवा दिलेल्या पर्यायामधून निवडा.
बांधकाम कामगार वेबसाईट लिंक
अधिक माहितीसाठी खालील व्हिडीओ पहा.
व्हिडीओ लिंक.
वरील माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की काळवा.
ज्या बांधकाम कामगारांची नोंदणी झाली आहे अशा बांधकाम कामगारांच्या एका मुलीच्या लग्नासाठी ५१ हजार रुपये एवढे आर्थिक सहाय्य दिले जाते.
होय बांधकाम कामगाराच्या मुलीच्या लग्नासाठी ५१ हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य मिळविण्यासाठी ऑनलाईन अर्ज करता येतो.
ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो या संदर्भात सविस्तर माहिती या लेखामध्ये दिलेली आहे.