सध्या महाराष्ट्रामध्ये भाग बदलत महाराष्ट्रात अवकाळी पाऊस पडत असल्याने शेतकरी बांधवांच्या शेतातील पिकांचे खूप मोठे नुकसान झाले आहे.
बऱ्याच शेतकरी बांधवानी आपल्या शेतातील सोयाबीनची सोंगणी केलेली असून शेतामध्येच सोयाबीनचा पुंज अर्थात ढीग घातलेला आहे.
अवकाळी पावसामुळे या सोयाबीनच्या ढिगामध्ये पाणी गेल्याने सोयाबीन सडत असून शेतकरी बांधवांचे खूप मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे.
हीच परिस्थिती कापूस या पिकांची असून अतिपावसामुळे कपाशीच्या कैऱ्या सदत असून काळ्या पडलेल्या आहेत.
खालील माहिती पण वाचा
बांधकाम कामगारांना 1 लाख रुपये मिळेल पण कसे पहा सविस्तर माहिती
महाराष्ट्रात अवकाळी पाऊस क्रॉप इन्सुरंस ॲपचा करा उपयोग
प्रधानमंत्री फसल बिमा योजना अंतर्गत शेतातील पिकांचा पिक विमा काढलेला असेल तर झालेल्या पिक नुकसानीची सूचना कंपनीस देता येते.
हि सूचना देण्यासाठी तुम्ही क्रॉप इन्सुरंस ॲपचा देखील उपयोग करू शकता. पिक विमा काढल्यानंतर शेतकऱ्यांना एक पावती दिली जाते यावर पिक विमा कंपनीचे तपशील असतात.
शेतकऱ्याने ज्या पिक विमा कंपनीचा विमा काढलेला आहे त्या वेबसाईटवर जावून किंवा त्या ॲपचा उपयोग करून देखील पिक नुकसानभरपाईची सूचना पिक विमा कंपनीस देता येते.
७२ तासाच्या आत द्या सूचना
शेतातील पिकांचे नुक्संद झाले असेल तर ७२ तासाच्या आत पिक विमा कंपनीस सूचना देणे गरजेचे असते.
टोल फ्री नंबरवर फोन करून देखील तुम्ही हि सुंचा पिक विमा कंपनीस देवू शकता परंतु यामध्ये वेळ लागू शकतो. यापेक्षा क्रॉप इन्सुरंस ॲपचा उपयोग करून तुम्ही पिक नुकसानीची माहिती दिली तर ती लवकर सादर होते.
त्यामुळे तुमच्या शेतातील कापूस असेल, सोयाबीन असेल किंवा इतर कोणतेही पिक असेल आणि ते अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त झाले असेल तर लगेच पिक विमा कंपनीस सूचना करून द्या जेणे करून तुम्हाला नुकसान भरपाई मिळू शकेल.
पिक नुकसानीची सूचना दिली तरच मिळेल आर्थिक सहाय्य
शेतातील पिकांचा पिक विमा काढला म्हणजे झाले असे होत नाही. पिकांचे नुकसान झाले असेल तर शेतकरी बांधवाना स्वतः विमा कंपनीस झालेल्या नुकसानीची माहिती द्यावी लागते.
अनेक शेतकरी बांधवांना असा समज होऊ शकतो कि पिक विमा काढला म्हणजे नुकसान भरपाई आपोआप मिळेल.
असे होत नाही जो पर्यंत शेतकरी स्वतः ७२ तासाच्या आत नुकसानीची माहिती देत नाही तो पर्यंत हि नुकसान भरपाई मिळत नाही.
तुम्हाला जर माहित नसेल कि क्रॉप इन्सुरंस ॲपद्वारे पिक विमा कंपनीस झालेल्या नुकसानीची माहिती कशी सादर करावी तर त्यासाठी खालील व्हिडीओ पहा आणि त्याप्रमाणे तुमच्या शेतातील नुकसानग्रस्त पिकांची माहिती पिक विमा कंपनीस सादर करून द्या.