आता 1 गुंठ्याची खरेदी विक्री होणार पहा संपूर्ण माहिती.
नागपूर हिवाळी अधिवेशनात विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांनी तुकडेबंदी कायद्यातील tukade bandi kayda सुधारणा संदर्भात विधेयक सादर केले.
विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये दोन्ही ठिकाणी एकमताने हे विधायक मंजूर करण्यात आले आहे. यामुळे आता यापुढे १ गुंठ २ गुंठे ३ गुंठे ४ गुंठे अशी जमीन खरेदी करणे किंवा विक्री करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
तुकडेबंदी कायदा १९४७ रोजी अंमलात आला होत्या यानुसार प्रत्येक जिल्ह्यासाठी परमाभूत क्षेत्र ठरविण्यात आले होते. प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राचे हस्तांतरण करण्यास निर्बंध आणले होते.
आता मात्र सर्वसामान्य नागरिकांनी खरेदी केलेल्या एक दोन तीन किंवा चार पाच गुंठे क्षेत्राचे तुकडे नियमित करण्यास मान्यता दिली जात आहे.
खालील माहिती पण वाचा.
मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ते योजना शेतात जायला मिळणार रस्ता
विहीर शेतरस्ता आणि घरबांधकाम करण्यासाठी होणार फायदा
तुकडेबंदी विधेयकामध्ये केलेल्या या बदलामुळे एखाद्याच्या शेतात घर बंधने असेल किंवा शेतात जाण्यासाठी रस्ता खरेदी करणे असेल किंवा विहीर खोदकामासाठी १ गुंठा किंवा दोन गुंठे जमीन खरेदी करणे असेल हे कामे आता सोपी होणार आहेत.
जमीन खरेदी विक्री करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रमाणभूत क्षेत्र ठरविण्यात आले होते. जे ठरवून दिलेले क्षेत्र आहे त्यापेक्षा शेतकऱ्यांना जमीन विकत येत नव्हती किंवा खरेदी देखील करता येत नव्हती आता 1 गुंठ्याची खरेदी विक्री होणार असल्याने समस्या सुटली आहे.
Rasta magni arj 2024 शेत रस्ता कायदा व रस्त्याचे नियम अर्ज pdf मध्ये डाउनलोड करा
बाजारमूल्याच्या ५ टक्के शुल्क भरून करता येईल खरेदी विक्री
प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राच्या खरेदी विक्रीस बंदी घालण्यात आली होती. यामुळे सर्वसामान्य नागरिकासमोरील डोकेदुखी वाढली होती. बाजार मूल्याच्या 25% रक्कम शासनस जमा करण्याची अट असल्याने अनेकांनी हे व्यवहार करणे टाळले.
आता मात्र बाजार मूल्याच्या ५ टक्के रक्कम शासनास भरून तुम्ही १ गुंठ्याची खरेदी विक्री करू शकता.
या संदर्भात अगोदर अद्यादेश काढण्यात आला होता या अद्यादेशाचे अधिनियमात रुपांतर करण्यासाठी मंत्री विखे पाटील यांनी विधानसभा व विधानपरिषद या दोन्ही सभागृहात हे विधेयक मांडले आणि ते मंजूरही करण्यात आले आहे.
लक्षात असू द्या कि केवळ घर बांधकाम करण्यासाठी, विहिरी खोदकाम करण्यासाठी व शेत रस्त्यासाठी हे १, २, ३ ४ ५ गुंठ्याची खरेदी करता येणार आहे. यामुळे नक्कीच नागरिकांना दिलासा मिळणार आहे.