राशन कार्ड इकेवायसी Ration card ekyc 2025 करण्याची संपूर्ण पद्धत या ठिकाणी जाणून घ्या.
तुम्ही जर अजूनही तुमच्या राशनकार्डची ईकेवायसी केली नसेल तर लगेच करून घ्या कारण ३१ मार्च २०२५ नंतर तुमची राशन कार्डची ekyc झाली नाही तर तुम्हाला १ एप्रिल २०२५ पासून राशन मिळणार नाही. तुमचे नाव राशनकार्डयादीमधून देखील वगळले जावू शकते त्यामुळे राशन कार्ड इकेवायसी करणे खूपच गरजचे झाले आहे.
हि राशन कार्ड इकेवायसी करण्यासाठी कोठेही जाण्याची गरज नाही अगदी मोबाईलवरून तुम्ही तुमची आणि तुमच्या घरातील सदस्यांची इकेवायसी करू शकता.
खालील योजनेचा पण लाभ घ्या.
सिंचन विहीर योजना 2024 संपूर्ण प्रस्ताव मोफत उपलब्ध sinchan vihir prastav
मोबाईलद्वारे करता येते Ration card ekyc 2025
राशन कार्डची इकेवायसी करण्याची सुविधा आता मोबाईलमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. बऱ्याचदा राशन कार्डची करण्यासाठी गावातील स्वस्तधान्य दुकानामध्ये जावे लागत होते.
अर्थात आता देखील त्या ठिकाणी हि इकेवायसी केली जावू शकते परंतु जर हीच ration card ekyc तुमच्या मोबाईलवरून होत असेल तर कोठे जाण्याची काय गरज आहे.
तुमच्या मोबाईलचा उपयोग करून अगदी काही मिनिटांमध्ये तुम्ही तुमच्या राशन कार्डची इकेवायसी करू शकता.
Ration card ekyc 2025 करण्यासाठी केंद्र शासनाने एक मोबाईल app विकसित केले आहे.
मोबाईलद्वारे इ केवायसी कशी केली जाते हे जाणून घेण्यासाठी खालील व्हिडीओ पहा.
ekyc करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात
गुगलप्ले स्टोअरवर Mera KYC App उपलब्ध आहे याद्वारे केवायसी करण्यासाठी अर्जदाराला फक्त त्यांचे आधार कार्ड सोबत असणे आवश्यक आहे.
आधार नंबर टाकून त्यावर आलेला otp सबमिट करताच राशन कार्डची इकेवायसी करता येणार आहे.
त्यामुळे आधार कार्ड व्यतिरिक्त ekyc करण्यास कागदपत्र कोणतेच लागत नाही.
काही मोबाईल जुन्या Android system हि सिस्टीम Adhar face RD ला सपोर्ट करण्याची शक्यता नसते अशी जर अडचण आली तर मोबाईल चेंज करावा दुसऱ्या मोबाईलवरून प्रयत्न करावा.
वेळ आणि पैसा वाचणार
पूर्वी Ration card ekyc 2025 करण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी किंवा स्वस्त धान्य दुकानामध्ये जावे लागत होते. आता हि राशन कार्ड इकेवायसी मोबाईलवर होत असल्याने कोठेही जाण्याची गरज राहिली नाही.
शिवाय घरातील सर्व सदस्यांचे पर्यायाने ज्यांना हि प्रोसेस माहित नाही त्यांची देखील इकेवायसी करणे आता सोपे झाले आहे.
अर्जदाराच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असला कि कोणत्याही व्यक्तीचे राशनकार्डची इकेवायसी करता येणार आहे.
हि ration card ekyc सुविधा मिळाली असल्याने नागरिकांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार आहे.
राशन कार्डची इकेवायसी कशी करावी लागते या संदर्भात या लेखामध्ये वरती व्हिडीओ दिलेला आहे तो व्हिडीओ बघा त्यामध्ये सांगितलेल्या पद्धतीने अगदी काही मिनिटात तुम्ही तुमच्या राशन कार्डची ekyc online पद्धतीने करू शकता.