शेतकऱ्यांच्या जमिनीची कागदपत्रे मिळणार व्हॉट्सॲपवर भूमी अभिलेख विभागाचा डिजिटल क्रांतीकरी उपक्रम.
जमिनीची कागदपत्रे जसे कि सातबारा, एकूण जमिनीचा दाखला आणि इतर कागदपत्रे मिळविण्यासाठी नागरिकांना ऑनलाईन सेंटरमध्ये जावे लागते. यामध्ये नागरिकांचा वेळ तसेच पैसे देखील वाया जातात.
आता मात्र १ ऑगस्ट २०२५ पासून शेतकऱ्यांना त्यांच्या व्हॉट्सॲप मोबाईलवर हि सर्व कागदपत्रे मिळणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांची होणारी धावपळ थांबणार असून वेळेची व पर्यायाने पैशांची देखील मोठी बचत होणार आहे.
शेतकऱ्यांसाठी सातबारा हे दस्ताऐवज खूप महत्वाचे असते वेळोवेळी हे कागदपत्र लागत असल्याने अनेकदा ऑनलाईन सेंटरवर रांगेत उभे राहून घ्यावे लागते. भूमी अभिलेख विभागाने आता सातबारा असो कि आठ अ किंवा जमिनीचे इतर कागदपत्रे, हि सर्व कागदपत्रे आता ऑनलाईन व्हॉट्सॲपवर उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
जमिनीची कागदपत्रे मिळणार व्हॉट्सॲपवर शेतकऱ्यांना होणार फायदा
भूमी अभिलेख विभागाच्या या डिजिटल क्रांतीमुळे शेतकऱ्यांना त्यांचे महत्वाचे दस्ताऐवज अगदी मोबाईलवर मिळणार असल्याने तालुक्याच्या ठिकाणी होणारी पायपीट थांबली जाणार आहे.
काही महाइ सेवा केंद्रावर सातबारा किंवा जमिनीचा दाखला घेण्यासाठी एका कागदपत्रासाठी ३० ते ४० रुपये शुल्क आकारले जातात. हेच कागदपत्र ऑनलाईन पद्धतीने केवळ १५ रुपयांमध्ये शेतकऱ्यांच्या व्हॉट्सॲपवर उपलब्ध करून दिले जाणार आहे.
महाभूमी अभिलेख विभाग हि सेवा ऑगस्ट २०२५ पासून सुरु करणार आहे.
सुविधा बद्दल थोडक्यात माहिती
या सुविधेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना महाभूमी अभिलेख या पोर्टलवर अगोदर नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी केल्यानंतर युजर आणि पासवर्ड टाकून लॉगीन करावे लागेल आणि त्यानंतर योजनेचा लाभ घेता येईल.
सुविधेचे नाव | व्हॉट्सॲपवर जमिनीचे कागदपत्रे पुरवठा करणे |
विभागाचे नाव | भूमी अभिलेख महाराष्ट्र शासन |
लाभार्थी | शेतकरी व जमीन असणारे नागरिक. |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
अधिकृत वेबसाईट | website link |
योजना प्रारंभ | एक ऑगस्टपासून सुरु होणार अंमलबजावणी |
डिजिटल सातबारा केवळ १५ रुपयांत ऑनलाईन करता येते सातबारा दुरुस्ती
महाभूमी अभिलेख या शासनाच्या वेबसाईटवर जावून अगदी १५ रुपयांमध्ये सातबारा किंवा जमिनीचा एकूण दाखला मिळतो. हा डिजिटल सातबारा सर्केव शासकीय कामांसाठी ग्वराह्ळय धरला जातो.
१५ रुपयांत सातबारा कसा डाउनलोड करावा हे जाणून घेण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.
सातबाऱ्यामध्ये काही चूक झाली असेल तर ऑनलाईन पद्धतीने सातबारा दुरुस्ती देखील करता येते. ऑनलाईन सातबारा दुरुस्ती कशी केली जाते या संदर्भातील सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
ऑनलाईन सातबारा दुरुस्ती जमीन कमी नावात चूक स्वतः दुरुस्त करा.