मिरची हळद कांडप मशीन योजना 2025 – ₹50,000 अनुदान

मिरची हळद कांडप मशीन योजना 2025 – ₹50,000 अनुदान

मिरची हळद कांडप मशीन योजना 2025 : या योजना अंतर्गत ५० हजार रुपये अनुदान मिळणार आहे त्यामुळे तुम्ही जर या योजनेसाठी पात्र असाल तर गलेच तुमचा ऑनलाईन अर्ज सादर करून द्या.

न्यूक्लिअस बजेट २०२५-२६ अंतर्गत हि योजना राबविली जात आहे. या योजनेसाठी अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख १५ जुलै २०२५ हि होती परंतु नागरिकांच्या भावना लक्षात घेवून आणि त्यांना या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा या हेतून अर्ज करण्याच्या तारखेस मुदतवाढ देण्यात आली आहे.

आता ३१ जुलै २०२५ पर्यंत तुम्ही मिरची हळद कांडप मशीन योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकता आणि या योजनेचा लाभ घेवून आपली प्रगती साधू शकता.

या लेखाच्या सर्वात शेवटी व्हिडीओ देखील दिलेला आहे तो नक्की पहा जेणे करून तुम्हाला ऑनलाईन अर्ज करतांना कोणतीही अडचण येणार नाही.

मिरची हळद कांडप मशीन योजना 2025 काय आहे योजनेचा उद्देश?

मिरची व हळद कांडप मशिन योजना 2025 ही अनुसूचित जमातीच्या (Scheduled Tribe) युवक-युवती व महिलांसाठी रोजगार निर्मितीसाठी आणलेली एक उपयुक्त सरकारी योजना आहे. ग्रामीण भागामध्ये अनेक शेतकरी आणि महिला स्वबळावर हळद मिरची प्रक्रिया व्यवसाय करत असतात.

अशी सुकवलेली हळद किंवा मिरची घाऊक बाजारात विकली, तर त्यांना दर कमी मिळतो. याच बाबीचा सखोल विचार करून महिलांना अनुदानावर मिरची व हळद कांडप मशीनसाठी ५० हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे जेणे करून महिला मिरची व हळद पदार्थावर प्रक्रिया करून विकेल आणि त्यांना चांगला भाव मिळेल.

या योजनेअंतर्गत सरकार ५० हजार रुपयांचं अनुदान देतं जेणेकरून लाभार्थी स्वतःचं कांडप मशिन (kandap machine) घेऊन हळद-मिरची पावडर स्वरूपात तयार करून विक्री करू शकतील. त्यामुळे घरबसल्या मसाला प्रक्रिया उद्योगात भरपूर नफा मिळवता येईल.

ही योजना महाराष्ट्र आदिवासी विकास विभागाच्या न्युक्लिअस बजेट अंतर्गत आहे. यामध्ये प्रामुख्याने पुणे, सातारा, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील प्रकल्प कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत.

मिरची हळद कांडप मशीन योजना 2025 अंतर्गत किती अनुदान मिळते?

मिरची हळद कांडप मशीन योजना 2025 ही महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या यंत्रणेद्वारे राबवली जाणारी एक उपयुक्त स्वरोजगार योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे ग्रामीण व आदिवासी भागातील महिला आणि युवकांना लघुउद्योग सुरू करण्यासाठी आर्थिक सहाय्य पुरवणे हा आहे.

या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला हे अनुदान थेट बँक खात्यावर जमा होते. या मिळालेल्या अनुदानातून अर्जदार मिरची कांडप यंत्र, हळद पीसण्याचे मशीन खरेदी करू शकतात.

उदाहरणार्थ, मिरची किंवा हळद कांडप मशीन खरेदी करताना जर मशीन ₹७०,००० चं असेल, तर शासन ₹५०,००० अनुदान देते आणि उर्वरित ₹२०,००० तुम्हाला स्वतः भरावे लागते.

पण जर मशीनची किंमत ₹५०,००० पेक्षा कमी असेल (उदाहरणार्थ ₹४८,५००), तर पूर्ण रक्कम शासनाकडून दिली जाते, आणि तुम्हाला एक पैसाही खर्च करावा लागत नाही.

कांडप मशीन योजना कोणासाठी उपयुक्त आहे?

मिरची हळद कांडप मशीन योजना 2025 ही योजना विशेषतः अनुसूचित जमातीतील (Scheduled Tribe – ST) लाभार्थ्यांसाठी राबवली जाते. ही योजना आदिवासी भागातील युवक, युवती, महिला, लघु शेतकरी आणि स्वयंरोजगारासाठी इच्छुक व्यक्तींसाठी फार उपयुक्त आहे.

त्यांना घरच्या घरी, अगदी छोट्या भांडवलात, एक कृषीपूरक व्यवसाय सुरू करता यावा यासाठी शासन मदतीचा हात पुढे करत आहे.

आदिवासी महिला उद्योजकांसाठी सुवर्णसंधी

अनेक महिलांकडे मिरची, हळद, जिरे, धणे, मेथी यासारख्या सुकवलेल्या वस्तू असतात, पण त्यांना प्रक्रिया करायला साधनसामग्री नसल्याने त्या घाऊक व्यापाऱ्यांना कमी दराने विकल्या जातात.

पण जर त्याच महिला कांडप यंत्र वापरून घरगुती मसाले तयार करू लागल्या, तर त्या पॅकिंग करून थेट बाजारात विक्री करू शकतात. यामुळे त्यांना अधिक नफा, आर्थिक स्वावलंबन, आणि उद्योजकतेची संधी मिळते.

मिरची हळद कांडप मशीन योजना 2025 साठी कोणत्या व्यक्ती अर्ज करू शकतात?

अर्जदार अनुसूचित जमातीचा असावा.

ही योजना फक्त ST (Scheduled Tribe) प्रवर्गातील व्यक्तींसाठी आरक्षित आहे. अर्ज करताना जात प्रमाणपत्र (Caste Certificate) आवश्यक आहे, जे शासन मान्य असावे आणि वैध दस्तऐवज म्हणून सादर करावे लागेल.

वय १८ वर्षांपेक्षा जास्त असावे.

अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय किमान १८ वर्षे पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे. याचा उद्देश असा की, लाभार्थी कायदेशीरपणे स्वतःच्या नावावर उद्योग सुरू करू शकतील. उदाहरणार्थ, १७ वर्षांच्या व्यक्तीस या योजनेचा लाभ मिळणार नाही.

स्थानिक रहिवासी असावा

अर्जदार महाराष्ट्र राज्यातील स्थानिक रहिवासी असावा. अर्ज करताना स्थानीय रहिवासी प्रमाणपत्र (Domicile Certificate) जोडणे बंधनकारक आहे. यामुळे इतर राज्यांतील ST प्रवर्गातील लाभार्थ्यांना या योजनेत समाविष्ट करता येणार नाही.

पूर्वी अशा योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

अर्जदाराने याआधी मिरची किंवा हळद कांडप मशिन खरेदीसाठी शासनाकडून कोणतेही अनुदान घेतलेले नसावे.
योजनेचा लाभ फक्त एकदाच दिला जातो, त्यामुळे डुप्लिकेट अर्ज किंवा पूर्वीच्या लाभार्थ्यांचे अर्ज फेटाळले जाऊ शकतात.

जर एखाद्याने मागील वर्षी ‘कांडप योजना’ अंतर्गत मशीन घेतली असेल, तर त्याला यंदा परत अनुदान मिळणार नाही.

मिरची हळद कांडप योजनेसाठी लागणारी कागदपत्रे

या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात या संदर्भात खाली आकर्षक टेबलसह माहिती दिलेली आहे. त्यापद्धतीने कागदपत्रे तुम्हाला लागू शकतात.

कागदपत्राचे नावकशासाठी आवश्यक
आधार कार्डअर्जदाराची ओळख सिद्ध करण्यासाठी
जातीचे प्रमाणपत्रअनुसूचित जमाती प्रवर्गातील असल्याचा पुरावा
निवासी प्रमाणपत्रस्थानिक असल्याचे दाखले
उत्पन्न प्रमाणपत्रकुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दर्शविणे शिवाय ऑनलाईन अर्ज सादर करतांना माहिती टाकण्यासाठी
बँक पासबुक झेरॉक्सऑनलाईन अर्जामध्ये बँक तपशील टाकण्यासाठी
शैक्षणिक कागदपत्रेअर्ज सादर करतेवेळी माहिती टाकतांना

अर्ज नोंदणी करण्याची पद्धत

मिरची हळद कांडप योजनेच लाभ घेण्यासाठी अर्जदारास ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. ऑनलाईन नोंदणी प्रोसेस कशी असते जाणून घेवूयात या संदर्भातील सविस्तर माहिती.

  • आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • अर्जदाराची नोंदणी या बटनावर क्लिक करून ऑनलाईन नोंदणी करून घ्या.
  • नोंदणी करतांना अर्जदाराचे नाव वडिलांचे नाव आडनाव मोबाईल नंबर इमेल आयडी फोटो आधार कार्ड इत्यादी संदर्भातील माहिती व्यवस्थित टाका.
  • शेवटी कॅपचा कोड टाकून सबमिट करा.
  • अर्ज सबमिट केल्यावर अर्जदाराच्या नोंदणीकृत मोबाईलवर युजर आयडी आणि पासवर्ड येईल याचा उपयोग करून लॉगीन करा.
  • login केल्यावर पासवर्ड सेट करून घ्या.

ऑनलाईन अर्ज सादर करण्याची पद्धत

आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर लॉगीन केल्यानंतर ऑनलाईन अर्ज सादर करावा लागतो. हास अर्ज सादर करण्यासाठी खालील प्रोसेसचा अवलंब करा.

  1. स्क्रीनच्या डाव्या बाजूला असलेल्या अर्ज व्यवस्थापन या बटनावर क्लिक करा.
  2. अर्ज करा या बटनावर क्लिक करा.
  3. योजनेचे नाव निवडा या बटनावर क्लिक करून अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना मिरची व हळद कांडप मशीन घेण्यासाठी अर्थसहाय्य करणे – 50000 हि योजना निवडा.
  4. अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करा.

आता अर्जदाराचा अर्ज सादर झाला आहे. परत अर्ज व्यवस्थापन या बटनावर क्लिक करून अर्ज यादी या बटनावर क्लिक करा. याठिकाणी ऑनलाईन अर्ज एडीट करून सविस्तरपणे त्यामध्ये माहिती भरा.

अर्थात हि प्रोसेस मोठी असल्याने हा अर्ज कसा सादर करावा लगतो हे जाणून घेण्यासाठी खालील व्हिडीओ पहा जेणे करून मिरची हळद कांडप योजनेचा ऑनलाईन अर्ज सादर करण्यास तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही.

खालील हळद मिरची कांडप योजनेचा ऑनलाईन अर्ज कसा सादर करावा लगतो या संदर्भातील व्हिडीओ पहा.

मिरची किंवा हळद कांडप मशीन खरेदीसाठी मार्गदर्शन

काही नामांकित कंपनीचे मिरची हळद कांडप मशिन बाजारात उपलब्ध आहेत. अर्जदाराने स्थानिक विक्रेत्याकडून किंवा अधिकृत डीलरकडून अंदाजपत्रक (quotation) घ्यायचे आहे. तेच कागदपत्र तुम्हाला अर्जासोबत अपलोड करावे लागते.

तुम्ही मशीन विक्रेत्यांशी आधी संपर्क साधून मशीनची किंमत, हमी (warranty), सर्व्हिस सुविधा याबाबत माहिती घेतल्यास फायदेशीर ठरेल.

जर मशीन अधिक गुणवत्तापूर्ण असेल तर शासन अनुदानाव्यतिरिक्त आधीचे थोडेफार पैसे खर्च करून देखील तुम्ही चांगले मशीन खरेदी करू शकता अर्थात हे त्यांच्यासाठी ज्यांच्याकडे अधिकचे पैसे आहेत.

मशीन खरेदी केल्यानंतर बिल चांगले सांभाळून ठेवा पुढे ते अनुदान मिळविण्यासाठी कमी पडू शकते.

दलालांपासून सावधान

मिरची किंवा हळद कांडप योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी मध्यस्त तुमच्याकडे पैशांची मागणी करत असेल तर अशा व्यक्तींपासून सावध राहा. शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी अधिकचे पैसे मोजावे लागत नाहीत.

हल्ली कोणतीही शासकीय योजनेचा लाभ मिळवून घ्यायचा असेल तर असे दलाल अर्जदारांकडून अधिकचे पैसे उकळत असल्याच्या अनेक घटना घडत आहेत.

मिरची हळद कांडप मशीन योजना 2025 योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अडचण आली तर थेट संबधित अधिकारी कार्यालय गाठून योजना संदर्भात सविस्तर माहिती जाणून घ्या.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

मिरची हळद कांडप मशीन योजना 2025 म्हणजे काय?

ही एक शासकीय योजना आहे जी अनुसूचित जमातीतील नागरिकांना स्वतःचा लघुउद्योग सुरू करता यावा यासाठी आर्थिक अनुदान देते. या योजनेअंतर्गत मिरची व हळद कांडप मशिन खरेदीसाठी ₹५०,००० पर्यंतचे अनुदान दिले जाते.

या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो?

केवळ अनुसूचित जमातीतील (Scheduled Tribe – ST) युवक, युवती व महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात. त्यासाठी वय १८ वर्षांपेक्षा जास्त असावे आणि निवास व उत्पन्नाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.

अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?

योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०२५ रात्री १२:०० वाजेपर्यंत आहे. याआधी मुदत १५ जुलै होती, परंतु ती आता वाढवण्यात आली आहे.

अर्ज कोठे आणि कसा करावा?

आदिवासी विकास विभागाच्या अधिकृत संकेत स्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहेत. www.nbtribal.in या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज सादर करू शकता.

किती अनुदान मिळते?

तुम्ही खरेदी केलेल्या मशिनच्या किमतीनुसार ₹५०,००० पर्यंत अनुदान दिले जाते. जर मशिनची किंमत ₹५०,००० पेक्षा जास्त असेल तर उर्वरित रक्कम अर्जदाराला स्वतः भरावी लागते.

योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागतात?

अर्ज करताना खालील कागदपत्रांची आवश्यक आहे:
आधार कार्ड.
जातीचा दाखला (अनुसूचित जमात).
उत्पन्नाचा दाखला.
रहिवासी प्रमाणपत्र.
बँक पासबुक.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *