Crop insurance claim पिक नुकसान भरपाई दावा
तुम्ही शेतकरी असाल आणि तुमच्या पिकांचे पावसामुळे नुकसान झाले असेल तर agriculture insurance company ला संपर्क साधून शेतकरी पिक विम्यासाठी दावा करू शकता. crop insurance शेतकऱ्यांच्या पिकांसाठी अत्यंत आवश्यक आहे जेणे करून नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाले तर crop insurance मिळेल व शेतकरी बांधवाना त्यांच्या पिकांचे नुकसान भरपाई मिळेल.
Crop insurance online पद्धतीने पण काढता येते. जेंव्हा शेतकरी पिकांची पेरणी करतो त्यावेळी pm crop insurance काढता येतो. शेतकरी स्वतः त्यांच्या पिकांचा online crop insurance काढू शकतात त्यासाठी प्रधानमंत्री फसल बिमा योजना म्हणजेच https://pmfby.gov.in/ या वेबसाईटवर जायचे आहे. त्यानंतर या ठिकाणी farmers corner असा एक पर्याय असेल त्या पर्यायावर क्लिक करून पिक विमा संदर्भात फॉर्म भरावा लागतो. शेतकर्यांनी स्वतः आपल्या पिकांचा पिक विमा कसा काढावा या संदर्भात या व्हिडीओमध्ये संपूर्ण माहिती दिली आहे. व्हिडीओ बघण्यासाठी येथे क्लिक करा. शेतकऱ्यांना जर स्वतः पिक विमा भरता येत नसेल तर ते csc सेंटर, आपले सरकार सेवा केंद्र किंवा बँकेत जाऊन देखील आपल्या पिकांचा विमा भरू शकतात.
crop insurance mobile app या मोबाईलचा असा उपयोग करा.
आता बघुयात कि पिक नुकसान झाले असेल तर त्यासाठी दावा कसा करावा लागतो..पिक विमा भरल्यानंतर तुम्हाला एक पावती मिळते त्यावर receipt number असतो तो पिक विमा दावा करण्यासाठी खूप महत्वाचा असतो. गुगल प्ले स्टोरवर जाऊन crop insurance हे अप्लिकेशन डाउनलोड करावे लागते यामध्ये तुमच्या नुकसान झालेल्या पिकांची माहिती भरावी लागते. नुकसान ग्रस्त पिकांचे फोटो आणि व्हिडीओदेखील या ठिकाणी तुम्हाला उपलोड करावे लागतात. Crop insurance application download कसे करावे त्यामध्ये आपल्या नुकसानग्रस्त पिकांची माहिती कशी भरावी, नुकसानग्रस्त पिकांचा फोटो अपलोड कसा करावा, व्हिडीओ अपलोड कसा करावा, त्यानंतर डॉकेट आयडी कसा मिळतो तो डॉकेट आयडी टाकून अर्जाची सद्यस्थिती कशी बघावी या संदर्भात संपूर्ण माहितीसाठी एक व्हिडीओ या ठिकाणी दिलेला आहे. तो व्हिडीओ बघण्यासाठी येथे क्लिक करा.
crop insurance application कसे वापरावे या संदर्भात crop insurance pdf file ग्राफिक्स सहित दिलेली आहे. ती फाईल तुमच्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरमध्ये डाउनलोड करून घ्या
crop insurance pdf file डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
crop-insurance-application-Information-1.pdf (9572 downloads )वेगवेगळ्या crop insurance companies शेतकऱ्यांच्या पिकांचा विमा काढून देतात जसे कि bajaj allianz crop insurance, agri crop insurance, reliance crop insurance, royal sundaram crop insurance, hdfc crop insurance, universal sompo crop insurance तर अशा विविध कंपन्या आहेत ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचा पिक विमा काढून देतात.
पावसामुळे चक्रीवादळामुळे किंवा कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे तुमच्या पिकांचे नुकसान झाले असेल तर यापैकी ज्या कंपनीकडे तुम्ही पिक विमा काढलेला असेल तर त्या कंपनीकडे शेतकरी पिक विमा नुकसानीचा दावा करू शकतात.
शेतकरी बांधवानी pradhan mantri crop insurance योजनेंतर्गत त्यांच्या पिकांचा पिक विमा काढलेला असेल तर crop insurance application वापरून पिक नुकसान भरपाईचा दावा करू शकतात. पिक विमा नुकसान भरपाईचा दावा कसा करावा लागतो त्यासाठी व्हिडीओ आणि crop insurance pdf file या लेखामध्ये दिलेली आहे ती तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि त्याच्या मदतीने crop insurance application वापरून पिक नुकसान भरपाईचा दावा करा.
मित्रांनो सध्या सोशल मिडीयाचा काळ सुरु आहे. कोणतीही माहिती तुम्ही तुमच्या मोबाईलवर अगदी चुटकी सरशी मिळवू शकता. थोडा विचार केला आणि महिती शोधली तर कोणत्याही प्रश्नाचे उत्तर हमखास सापडतेच. पिक विमा काढायचा म्हटल्यावर आजही अनेक शेतकऱ्यांना वाटते कि पिक विमा हा केवळ csc सेंटर, आपले सरकार सेवा केंद्र किंवा बँकेत जाऊनच काढावा लागतो. परंतु याच बरोबर तुम्ही स्वतः देखील तुमच्या पिकांचा पिक विमा काढू शकता. तुमच्याकडे स्मार्ट फोन असेल तर तुम्ही तुमच्या मोबाईलवर देखील पिक विमा भरू शकता. आता तुम्ही म्हणाल कि आम्हाला या संदर्भात माहिती नाही तर याही प्रश्नांचे उत्तर आहे मित्रानो. Crop insurance संदर्भातील अनके माहितीचे व्हिडीओज युट्युबवर उपलब्ध आहेत ते व्हिडीओ बघून सुद्धा तुम्ही माहिती मिळवू शाकीता.
हा लेख लिहिण्याचा एकच उद्देश होता कि बऱ्याच शेतकर्यांनी पिक विमा काढलेला असतो तरीही त्यांना त्यांच्या पिकांचे नुकसान झाल्यास पिक नुकसान भरपाईसाठी दावा कसा करावा हे माहित नसते आणि पिक विमा कंपनीस पिक नुकसान झाल्याची माहिती न देऊ शकल्यामुळे पिक विमा भरपाईपासून वंचित राहू शकतात. महाराष्ट्र शासनातर्फे शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविल्या जातात त्या योजनांची देखील बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती नसते. महाराष्ट्र व केंद्र शासनाच्या योजना संदर्भात Digital DG या युट्युब चॅनलवर माहिती दिली जाते. चॅनलला भेट देऊन देखील तुम्ही विविध शासकीय योजनांची माहिती घेऊ शकता, digital dg या चॅनलला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा. या हा लेख तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या WhatsAap ग्रुपवर हि माहिती शेअर करा. धन्यवाद.
Crop insurance claim