Maharashtra government schemes 2020 | शेतकरी योजना माहिती 2020
By Dadarao Gavande
Maharashtra government schemes 2020 अर्थात शेतकरी योजना माहिती 2020
Maharashtra government schemes 2020 विषयी आज आपण माहिती करून घेणार आहोत. तुम्ही जर शेतकरी असाल आणि महाराष्ट्र योजना माहिती करून घेऊ इच्छित असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. शरद पवार ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत शेळीपालन, कुक्कुटपालन व गाय म्हैस यासाठी गोठा बांधण्यासाठी अनुदान मिळणार आहे. शरद पवार ग्राम समृद्धी योजनेसंदर्भातील बातम्या दिनांक १० डिसेम्बर २०२०च्या विविध वृत्त पत्रामध्ये प्रसिद्द झालेल्या आहेत. त्याचप्रमाणे महासंवाद या वेबसाईटवर देखील या संदर्भात बातमी प्रसिद्द करण्यात आली आहे. प्रसिद्द करण्यात आलेल्या सदरील महासंवाद वेबसाईट वरील बातमी वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
अधिक सविस्तर माहितीसाठी शरद पवार ग्राम समृद्धी योजने संदर्भातील खालील व्हिडीओ बघा
Maharashtra government schemes 2020 गाय व म्हैस याकरिता पक्का गोठा बांधणे
मित्रांनो तुम्हाला माहितच असेल कि शेतीला उत्तम जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसायाकडे बघितले जाते परंतु खेडेगावामध्ये आजही अनेक शेतकरी असे आहेत कि ज्यांच्याकडे गाई किंवा म्हशी असतात परंतु त्यांच्यासाठी पक्का गोठा नसतो आणि त्यामुळे त्यांच्या गाई किंवा म्हशी उन्हामध्ये, पावसामध्ये किंवा थंडीमध्ये असल्यामुळे त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. दुग्धव्यवसायावर परिणाम होऊन आर्थिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकऱ्यांकडे गाई किंवा म्हशी असेल आणि गाई किंवा म्हशीसाठी व्यवस्थित गोठा नसेल तर शरद पवार ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पक्का गोठा बांधण्यासाठी अनुदान मिळू शकते आणि गाई म्हशींसाठी जर पक्का गोठा मिळाला तर नक्कीच जनावरांचे उन वारा पाऊस आणि थंडीपासून संरक्षण होईल आणि दुग्धव्यवसाय आर्थिक नफ्यामध्ये येण्याची शक्यता जास्त वाढेल. बऱ्याच शेतकऱ्यांना अजूनही शेतकरी योजना विषयी माहिती 2020 नसते त्यामुळे ते या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत.
शेतकरी सरकारी योजना महाराष्ट्र राज्य अंतर्गत गाय व म्हैस याकरिता पक्का गोठा बांधण्यासाठी अनुदान
गाई किंवा म्हशींच्या एका गोठ्यासाठी 77,188 रुपये खर्च येऊ शकतो. 2 गुरे ते 6 गुरे या करिता एक गोठा व त्यानंतर अधिक गुरांसाठी 6 च्या पटीत म्हणजे 12 गुरांसाठी दुप्पट आणि 18 गुरांपेक्षा जास्त गुरांसाठी 3 पट अनुदान देय राहील. या अनुदानामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या गाई किंवा म्हशींसाठी गोठा बांधणे सोपे जाईल.

अनुदान योजना महाराष्ट्र 2020 शेळीपालन शेड बांधणे
गरीबाची गाय म्हणजेच शेळी अशी शेळीची ओळख आहे गाई म्हशींच्या तुलनेत शेळी स्वस्त असते त्यामुळे शेतकऱ्यांकडे गाई म्हशींच्या तुलनेत शेळ्या जास्त असण्याची शक्यता असते किंवा शेतकरी शेळीपालन व्यवसाय देखील करतात परंतु शेळ्यांसाठी शेड नसेल तर मात्र अडचण निर्माण होण्याची शक्यता असते त्यामुळे तुमच्याकडे शेळ्यांसाठी शेड नसेल तर काळजी करण्याचे काहीच कारण नाही कारण आता शरद पवार ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत शेळ्यांसाठी शेडबांधणीसाठी सुद्धा अनुदान मिळणार आहे. Maharashtra government schemes 2020 संदर्भात अनेक शेतकऱ्यांना आता त्यांच्या मोबाईलवर देखील माहिती मिळू शकते त्यासाठी आमच्या युट्युब चॅनलला भेट द्या येथे क्लिक करा. शेतकऱ्यांकडे शेळ्यांसाठी शेड नसेल तर ते देखील आता शेळ्यांसाठी पक्के शेड बंधू शकतात आणि शरद पवार ग्राम समृद्धी योजनेचा लाभ घेऊ शकतात.
शेतकरी अनुदान योजना 2020 शेळीपालन शेड बांधकामासाठी अनुदान
शेळीपालनाच्या एका शेडसाठी 49,284 रुपये खर्च येतो एका कुटुंबास जास्तीत जास्त 30 शेळ्यांकरिता 3 पट अनुदान मंजुर करण्यात येवू शकते. शरद पवार ग्राम समृद्धी योजने अंतर्गत शेळीपालन शेडसाठी अनुदान मिळणार असल्याने शेतकऱ्यांना यामुळे खूप मदत मिळणार आहे.
Maharashtra government schemes for farmers 2020 सरकारी योजना कुक्कुट पालन शेड बांधकाम करणे
मित्रांनो मांसाहार करणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. शेळी किंवा बोकड यांचे मास चिकन पेक्षा जास्त भावाने विकले जाते त्यामुळे नेहमीच सार्वजन शेळी किंवा बोकड यांचे मास खातीलच याविषयी सांगता येणार नाही परंतु शेळी किंवा बोकड यांच्या मासाच्या तुलनेत चिकन खूप स्वस्त असल्याने अनेक जन चिकन खातात त्यामुळे चिकनला खूप मागणी असते आणि यामुळेच खेडेगावात अनेकजण आपल्याला कुक्कुटपालन व्यवसाय करतांना दिसतात. सरकारी योजना government schemes for farmers in Maharashtra राबविण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्नशील असतात परंतु माहिती अभावी किंवा इतर कारणामुळे लाभार्थींना शासकीय अनुदान न मिळण्याची शक्यता असते. अजूनही अनेकांकडे कुक्कुटपालन व्यवसाय करण्यासाठी शेड नसते त्यामुळे कुक्कुटपालन करतांना मर्यादा निर्माण होतात परंतु आता शरद पवार शरद पवार ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत कुक्कुटपालन शेड बांधणीसाठी अनुदान मिळणार आहे त्यामुळे नक्कीच शरद पवार ग्राम समृद्धी योजना कुक्कुटपालन व्यावसायिकांना लाभदायक ठरेल यात शंका नाही. Maharashtra government schemes for farmers 2020 माहितीसाठी आमच्या चॅनलला भेट द्या त्यासाठी येथे क्लिक करा .
Maharashtra government schemes 2020 कुक्कुट पालन शेड बांधकामासाठी अनुदान
कुक्कुट पालन शेड बांधकामासाठी प्रत्येक शेडला 49, 760 रुपये खर्च अपेक्षित आहे. 100 पक्षी यशस्वीरित्या सांभाळणाऱ्या लाभार्थींनी पक्षांची संख्या 150 च्या वर नेल्यास मोठ्या शेडसाठी दुप्पट निधी उपलब्ध करून देण्यात येवू शकतो, त्यामुळे तुम्ही जर कुक्कुटपालन व्यवसायिक असाल तर नक्कीच तुम्हाला शरद पवार ग्राम समृद्धी योजनेचा लाभ मिळू शकतो. अनेक जणांना इंग्रजी भाषा समजण्यास अडचण येते त्यामुळे तुम्ही subsidy schemes for farmers in maharashtra in Marathi असे शोधत असाल तर आमच्या digitaldg.in या वेबसाईटला वेळोवेळी भेट देत राहा.
maharashtra government schemes 2020 भूसंजीवनी नाडेप कंपोस्टींग
शरद पवार ग्राम समृद्धी योजना अंतर्गत ज्याप्रमाणे प्रत्येक लाभार्थीला गाय व म्हैस याकरिता पक्का गोठा बांधणे साठी अनुदान, शेळीपालन शेड बांधणेसाठी अनुदान व कुक्कुटपालन शेड बांधणेसाठी अनुदान मिळणार आहे त्याच प्रमाणे भूसंजीवनी नाडेप कंपोस्टींग सुद्धा अनुदान मिळणार आहे. नाडेपच्या बांधकामासाठी 10 हजार 537 रुपये खर्च अपेक्षित आहे.
तर अशा प्रकारे शरद पवार ग्राम समृद्धी योजने वैयक्तिक लाभाच्या वरील योजनांसाठी अनुदान मिळणार आहे.
या लेखाचा सारांश
मित्रांनो या लेखामध्ये आपण जाणून घेतले कि शरद पवार ग्राम समृद्धी योजनेमध्ये कोणकोणत्या योजनेचा लाभ घेता येवू शकेल. त्याच प्रमाणे गाय व म्हैस याकरिता पक्का गोठा बांधणे साठी किती अनुदान मिळणार आहे. शेळीपालन शेड बांधणेसाठी किती अनुदान मिळेल. कुक्कुटपालन शेड बांधणेसाठी किती अनुदान मिळणार आहे त्याच प्रमाणे भूसंजीवनी नाडेप कंपोस्टींग सुद्धा किती अनुदान मिळणार आहे या विषयी आपण या लेखामध्ये माहिती जाणून घेतली आहे.
मित्रांनो विविध शासकीय योजनांची माहिती मिळविण्यासाठी आमच्या डिजिटल डीजी हया युट्युब चॅनलवरील व्हिडीओज बघण्यास विसरू नका डायरेक्ट आमच्या युट्युब चॅनलवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.
Subsidy schemes for farmers in maharashtra in Marathi
विविध शासकीय योजनांच्या माहितीचे लेख वाचण्यासाठी वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
नवीन लाईट कनेक्शन ऑनलाइन अर्ज
रोपवाटिका अनुदान योजना
डिजिटल सातबारा