महाराष्ट्र दिव्यांग योजना प्रशिक्षण ऑनलाईन अर्ज प्रक्रिया.

महाराष्ट्र दिव्यांग योजना प्रशिक्षण ऑनलाईन अर्ज प्रक्रिया.

तुम्ही जर दिव्यांग व्यक्ती असाल तर महाराष्ट्र दिव्यांग योजना संदर्भात अधिक माहिती  जाणून घ्या जेणे करून तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकेल.

या ठिकाणी मी दिव्यांग योजना या शब्दाचा यासाठी उच्चार करत आहे कि यामध्ये दिव्यांग व्यक्तींना प्रशिक्षण मिळणार आहे आणि प्रशिक्षण मिळाल्यानंतर दिव्यांग व्यक्तींना रोजगार सुद्धा मिळण्याची शक्यता असते त्यामुळे हि अपंग व्यक्तीसाठी एकप्रकारे दिव्यांग रोजगार योजनाच असू शकते.

दिव्यांग प्रशिक्षणासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी खालील व्हिडीओ बघा.

महाराष्ट्र दिव्यांग योजनामुळे दिव्यांगाना मिळणार रोजगार.

तुम्ही स्वत: अपंग असाल किंवा तुमचा मित्र, तुमचे नातेवाईक यापैकी कोणीही अपंग असेल तर महाराष्ट्र शासनाच्या वतीने अशा दिव्यांग व्यक्तींना रोजगाराभिमुख प्रशिक्षण दिले जाणार आहे.

त्यामुळे रोजगार मिळविण्यासाठी दिव्यांग व्यक्तींना महाराष्ट्र दिव्यांग योजना प्रशिक्षणामुळे खूप फायदा होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र दिव्यांग योजना लाभ घेण्यासाठी गुगल लिंक

मित्रांनो दिव्यांग व्यक्तीकरता कौशल्य विकास विभागाकडून प्रशिक्षण मिळविण्यासाठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे आणि तो अर्ज कसा करावा हे आपण आजच्या या लेखामध्ये अगदी तपशीलवारपाने माहिती जाणून घेणार आहोत.

मित्रांनो प्रशिक्षणासाठी नोंदणी करण्यासाठी शासनातर्फे एक गुगल लिंक देण्यात आली आहे आणि त्या लिंकवर क्लिक करूनच तुम्हाला महाराष्ट्र दिव्यांग योजना प्रशिक्षणासाठी लाईन अर्ज करायचे आहेत.

ऑनलाइन अर्ज म्हटला कि तुमच्या डोळ्यासमोर लगेच एखादा csc सेंटर, महा ई सेवा केंद्र किंवा एखादे ऑनलाईन सेंटर दिसते.

त्या ठिकाणी जावूनच अर्ज भरावा लागतो हे बऱ्याच जणांनी गृहीत धरले असते. हरकत नाही तुम्ही त्या ठिकाणी जाणून अर्ज भरू शकता काहीही अडचण नांही पण जर तुमच्याकडे काहीच सुविधा नसेल तर.

जर हाच अर्ज तुम्ही तुमच्या मोबाईलवरून भरू शकत असाल तर वेळ आणि पैसा वाया घालण्याची काहीच गरज नाही.

महाराष्ट्र दिव्यांग योजना प्रशिक्षण योजनेचा अर्ज भरण्याचा व्हिडीओ बघा.

आता तुम्ही म्हणाल कि आम्हाला हा अर्ज आमच्या मोबाइल वर कसा भरावा याची माहिती नाही.

कोणीही मुळात परिपूर्ण नसतो माहिती घेतल्याने आणि सरावाने माणूस परिपूर्ण होत असतो.

यासाठी माझा हा संपूर्ण लेख वाचा किंवा या संदर्भात मी एक व्हिडीओ बनविलेला आहे तो व्हिडीओ बघा त्यामध्ये दिव्यांग व्यक्तींना प्रशिक्षणासाठी ऑनलाईन अर्ज कसा भरावा या संदर्भात संपूर्ण माहिती दिलेली आहे.

स्टेप बाय स्टेप करत तुम्ही प्रोसेस फॉलो केली तर तुमचा आणि तुमच्या अनेक मित्रांचे अर्ज तुम्ही देखील भरू शकता. खासकरून हा व्हिडीओ मी मोबाईलवर बनविलेला आहे जेणे करून तुम्हाला मोबाइलवर हा अर्ज कसा भारतात याविषयी माहिती मिळण्यास मदत होईल.

महाराष्ट्र दिव्यांग  योजना ऑनलाईन अर्ज

चला तर आता जाणून घेवूयात कि दिव्यांग व्यक्तीकरता कौशल्य विकास विभागाकडून प्रशिक्षण मिळविण्यासाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा लागतो त्यासाठी प्रोसेस कशी असते.

महाराष्ट्र दिव्यांग योजना प्रशिक्षणासाठी शासनातर्फे एक गुगल लिंक देण्यात आली आहे त्या लिंकवर क्लिक करताच तुमच्या मोबईलवर दिव्यांग व्यक्तीकरिता कौशल्य विकास विभागाकडून प्रशिक्षण मिळणे करिता करावयाचा अर्ज असा फॉर्म ओपन होईल.

हा अर्ज कसा भरावा हे आता आपण जाणून घेवूयात

दिव्यांग व्यक्तीकरता कौशल्य विकास विभागाकडून प्रशिक्षण मिळविण्यासाठी ऑनलाइन अर्ज नमुना.

अर्ज भरण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा. http://forms.gle/2Sf7Rtd5ByVn2GVx6

  • तुमचा जिल्हा टाईप करा.
  • तालुका टाईप करा.
  • अर्जदाराचे नाव टाका.
  • लिंक या सदरामध्ये स्त्री पुरुष व इतर हे पर्याय दिसतील यापैकी एक पर्याय निवडा.
  • त्यानंतर अर्जदाराचा संपूर्ण पत्ता या ठिकाणी टाका.
  • मुक्काम पोस्ट टाईप करा.
  • गाव.
  • तालुका.
  • जिल्हा.
  • पिनकोड.
  • अर्जदाराचा संपर्क क्रमांक.
  • अर्जदाराचा इमेल आयडी.
  • अर्जदाराची जन्मतारीख
  • वय.
  • आधार कार्ड क्रमांक.
  • शैक्षणिक पात्रता निवडावी या ठिकाणी काही पर्याय उपलब्ध आहेत जसे कि अशिक्षित, कमीत कमी १ ते ४ थी पास, ५ वी, ८ वी, १० वी, १२ वी, पदवी, पदविका, आय टी, पदवीव्युत्तर

प्रमाणपत्र अपलोड करा.

  • दिव्यांगाचा प्रकार निवडा.
  • या ठिकाणी तुम्हाला पुढील प्रमाणे पर्याय दिसतील त्यापैकी एक पर्याय निवडा. जसे कि लोकोमेटर डीसाबीलिटी, कुष्ठरोगातून बरी झालेली व्यक्ती, मेंदूचा पक्षाघात, बौद्धिक वाढ खुंटणे, स्नायूंची विकृती, ॲसीड हल्ल्याचे बळी, अंधत्व कमी दृष्टी, बहिरा अंशत: बहिरा, उच्चार व भाषेविषयक अक्षमता, अध्ययन अक्षमता, मतिमंदत्व, अटीजम स्पेक्ट्रम डीसऑर्डर, मानसिक आजारपण, मल्टीपल स्केरोसिस, पर्किंसन्स रोग, हिमोफेलीया, थालेसेमिया, सिकल सेल डिसीज, बहुविकलांगता.
  • Next या बटनावर क्लिक करा.
  • ज्या प्रशिक्षणासाठी तुम्ही इच्छुक असाल तो पर्याय या ठिकाणी निवडा.
  • कौशल्य विकास विभागाकडून दिव्यांग व्यक्तीसाठी पुढील प्रशिक्षणासाठी अर्जदार अर्ज करू शकतात.
  • माळी.
  • सेंद्रिय उत्पादक.
  • दुग्धउत्पादक शेतकरी किंवा उद्योजक.
  • लघु कुक्कुटपालन उद्योजक.
  • शिवणकाम यंत्र चालक.
  • हस्त भरतकाम चालक.
  • गठ्ठे बांधकामगार.
  • डीलरशिप टेलीकॉलर सेल्स.
  • मोटर वाहन सेवा तंत्रज्ञ स्तर ३.
  • सहाय्यक ब्युटी थेरपीस्ट.
  • सहाय्यक केस स्टायलिस्ट.
  • पेडीक्यूरीस्ट आणि मॅनीक्यूरिस्ट.
  • सहाय्यक स्पा थेरपीस्ट.
  • मॅसन मार्बल, ग्रॅनाईट आणि स्टोन काम करणारे.
  • सहाय्यक वीजतंत्री
  • घरकाम तथा स्वयंपाकी.
  • मोबाईल फोन हार्डवेअर दुरुस्ती तंत्रज्ञ.
  • एलईडी लाईट रिपेअर टेक्निशियन.
  • लोणचे बनविणारे तंत्रज्ञ.
  • जाम, जेली आणि केचअप बनविणारे तंत्रज्ञ.
  • वनस्पती बिस्कीट उत्पादन तंत्र.
  • बँकिंग तंत्रज्ञ/ चालक.
  • कास्टिंग ऑपरेटर सिरेमिक्स.
  • कास्टिंग ऑपरेटर ( धातू हस्तशील्य ).
  • हस्तनिर्मित बांबू अगरबत्ती स्टिक मेकर.
  • बांबू बास्केट निर्माता.
  • बांबू उपयुक्तता हस्तकला असेंबलर.
  • आहार सहाय्यक.

योग्य तो कोर्स निवडा

  • कटर.
  • स्टीचिंग ऑपरेटर.
  • ॲनिमेटर.
  • मेकअप आर्टीस्ट.
  • केशभूषाकार.
  • स्टोर ऑप्स सहाय्यक.
  • प्रशिक्षणार्थी सहकारी.
  • किरकोळ विक्री सहकारी.
  • सौर पी व्ही इंस्टालर – इलेक्ट्रिकल.
  • सौर पी व्ही इंस्टालर – सिव्हील.
  • डोमेस्टिक आयटी हेल्पडेस्क अटेंडंट.
  • वेब डेव्हलपर.
  • कनिष्ट सॉफ्टवेअर.
  • ग्राहक संबधी व्यवस्थापन डोमेस्टिक व्हाईस.
  • ग्राहक संबधी व्यवस्थापन डोमेस्टिक नॉन व्हाईस.
  • डोमेस्टिक डाटा एन्ट्री ऑपरेटर.
  • डोमेस्टिक बायोमेट्रिक डेटा ऑपरेटर.
  • ग्राहक सेवा कार्यकारी.
  • इन स्टोर प्रमोटर.
  • खोली परिचर.

दिव्यांग प्रशिक्षणासाठी स्टेप बाय स्टेप करत बिनचूक अर्ज भरा.

योग्य तो कोर्स निवडल्यानंतर next या बटनावर क्लिक करा. जसे हि तुम्ही या बटनावर क्लिक कराल त्यावेळी या ठिकाणी तुम्हाला तुमच्या अपंगत्वाची टक्केवारी प्रमाणपत्रानुसार या ठिकाणी टाकायची आहे. दिव्यांगाचे प्रमाणपत्र कोणत्या प्रकारचे आहे ते या ठिकाणी निवडायचे आहे. जसे कि मॅन्युअल, SADM, UDID किंवा उपलब्ध नाही या पर्यायांपैकी एक पर्याय निवडायचा आहे.

दिव्यांगाचे प्रमाणपत्र क्रमांक आणि इतर माहिती व्यवस्थित टाका.

त्यानंतर दिव्यांगाचे प्रमाणपत्र क्रमांक टाकायचा आहे. ज्या दिवशी दिव्यांगाचे प्रमाणपत्र मिळाले आहे तो दिनांक टाकायचा आहे. दिव्यांगाचे स्वरूप या ठिकाणी दिलेल्या पर्यायांमधून अर्जदारास निवडायचे आहे.

जसे कि कायमस्वरूपी किंवा तात्पुरते यापैकी एक पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे. हि सर्व माहिती भरल्यानंतर Next या बटनावर क्लिक करा आणि शेवटी सबमिट हे बटन दावा.

सबमिट हे बटन दाबताच Your response has been recorded असा संदेश तुम्हाला दिसेल. याचाच अर्थ असा आहे कि कौशल्य विकास विभागाकडून प्रशिक्षण मिळविण्यासाठी ऑनलाइन अर्ज तुम्ही यशस्वीरित्या भरलेला आहे.

igital DG telegram group

अनेक मित्रांच्या विनंतीनुसार आम्ही टेलिग्राम ग्रुप बनविला आहे जेणे करून आमच्या मित्रांना शासकीय योजनांची माहिती मिळू शकेल त्यामुळे आमचा टेलिग्रामचा ग्रुप सुद्धा जॉईन करा. आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

जिल्हा परिषद योजना

2 thoughts on “महाराष्ट्र दिव्यांग योजना प्रशिक्षण ऑनलाईन अर्ज प्रक्रिया.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *