नाविन्यपूर्ण योजना बेरोजगारांसाठी उपयुक्त तरुणांनी लाभ घ्यावा.

नाविन्यपूर्ण योजना बेरोजगारांसाठी उपयुक्त तरुणांनी लाभ घ्यावा.

नाविन्यपूर्ण योजना बेरोजगारांसाठी फायद्याची

महाराष्ट्र शासनाच्या नाविन्यपूर्ण योजना बाबत तुम्हाला माहिती जाणून घेणे खूपच महत्वाचे ठरणार आहे कारण या योजनेतून तुम्हाला अनुदान मिळू शकणार आहे.

जिल्हा वार्षिक आदिवासी उपाययोजना सन २०२०-२१ करिता नाविन्यपूर्ण योजना राबविणेबाबतचा शासन निर्णय म्हणजेच GR २५ फेब्रुवारी २०२१ रोजी  महाराष्ट्र शासनाच्या  वेबसाईटवर पब्लिश करण्यात आला आहे GR बघण्यासाठी येथे क्लिक करा.

नाविन्यपूर्ण योजनेस १०० टक्के निधी वितरीत करण्यात आला असून नाविन्यपूर्ण योजना नियमित राबविण्यात यावी असा निर्णय घेण्यात आलेला आहे. हा GR  https://www.maharashtra.gov.in  या संकेत स्थळावर उपलब्ध असून या ठिकाणी तुम्ही हा GR बघू शकता.

शेळीपालन  योजने संदर्भातील खालील व्हिडीओ बघा

दुधाळ जनावरे व शेळी पालन संदर्भात माहितीचा व्हिडीओ बघा.

नाविन्यपूर्ण योजना अंतर्गत मिळणार गाई म्हशी आणि शेळ्या.

मित्रांनो नाविन्यपूर्ण योजना मध्ये ग्रामीण भागातील शेतकरी व पशु पालकांना रोजगाराचे साधन उपलब्ध व्हावे यासाठी गाई, दुधाळ म्हशींचे गट वाटप व शेळीपालनासाठी अनुदान देण्यात येते. तुम्ही जर शेतकरी असाल आणि तुम्हाला दुग्ध व्यवसाय किंवा शेळीपालन व्यवसाय सुरु करायचा असेल तर या नाविन्यपूर्ण योजनेचा जरूर लाभ घ्या.

शेळी पालन योजना बेरोजगारांसाठी उपयुक्त.

नाविन्यपूर्ण योजना अंतर्गत १० शेळ्या व १ बोकड असे गट वाटप करण्यात येणार आहेत.

सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना गट किंमतीच्या ५० टक्के अनुदान देण्यात येईल त्याचप्रमाणे अनुसूचित जाती व जमातींच्या लाभार्थींना प्रकल्प खर्चाच्या ७५  टक्के अनुदान देण्यात येणार आहे.

त्यामुळे लगेच तुमच्या तालुक्यातील गट विकास अधिकारी किंवा पंचायत समिती अधिकारी यांच्याशी संपर्क साधा, आणि या नाविन्यपूर्ण योजना संबधी लाभ घेण्याची प्रक्रिया समजावून घ्या.

नाविन्यपूर्ण योजना अंतर्गत शेळीपालन योजनेचा pdf अर्ज डाउनलोड करा.

मित्रांनो १० शेळ्या व १ बोकड या योजनेसाठी लाभार्थ्यांने अर्ज करायचा आहे. हा अर्ज तुम्हाला हवा असेल तर खालील लिंकवर क्लिक करा आणि तुमच्या मोबाईलमध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये डाउनलोड करून प्रिंट काढून घ्या.

१० शेळ्या व १ बोकड या योजनेसाठी जो अर्ज नमुना या ठिकाणी दिलेला आहे तो अर्जाचा नमुना आम्हाला समाज माध्यमांवरून मिळालेला आहे. तुमच्या जिल्ह्यानुसार त्या अर्जामध्ये थोडाफार बदल असण्याची शक्यता असू शकते याची नोंद घ्यावी.

१० शेळ्या व १ बोकड या योजनेसाठी लाभार्थ्यांने करावयाचा अर्जाचा नमुना डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

शेळी-पालन-योजनेचा-अर्ज.pdf (16156 downloads )

दुग्ध व्यवसाय व शेळीपालन व्यवसायाच्या मदतीने बेरोजगारीवर मात करा.

बेरोजगारी दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. त्यामुळे शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेळीपालन किंवा दुग्धव्यवसाय करणे हि काळाची गरज बनत चालली आहे.

नोकरी मिळत असेल तर नक्की करा पण नोकरीच पाहिजे हा तुमचा आग्रह असेल तर तो साफ चुकीचा आहे. कारण नोकरी पेक्षा कितीतरी जास्त नफा हा शेळीपालन आणि दुग्धव्यवसायामध्ये असल्याचे अनेक तरुणांनी दाखवून दिले आहे.

शेळीपालन व दुग्धव्यवसाय शेतीसाठी जोडधंदा म्हणून खूप महत्वाचे

शेळीपालन किंवा दुग्धव्यवसाय करायचा म्हटल्यास तरुणांपुढे सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतो तो म्हणजे निधी म्हणजेच पैशांचा.

कोणताही व्यवसाय करायचा म्हटल्यास त्या व्यवसायाला पैसा लागतो आणि नेमका तोच पैसा आपल्याकडे नसतो. अशावेळी विविध शासकीय योजनांचा लाभ तरुणांनी घेतला पाहिजे आणि आपला दुग्धव्यवसाय किंवा शेळीपालन व्यवसाय सुरु केला पाहिजे.

शासकीय योजनांचा लाभ घ्या.

शेळीपालन किंवा दुग्धव्यवसाय करण्यासाठी शासनाच्या विविध योजना सुरु असतात. तरुणांनी या योजनांविषयी माहिती घेऊन त्यांच्या पाठपुरावा करावा व या योजनांचा लाभ घ्यावा.

जेणे करून आपला व्यवसाय उभा राहू शकेल आणि आपल्याबरोबर इतरांनी रोजगार उपलब्ध होऊ शकेल.

विविध शासकीय योजनांची माहितीचे व्हिडीओ पहा आमच्या युट्युब चॅनलवर.

मित्रांनो केवळ शासकीय योजनांची माहिती नसल्यामुळे अनेकांना या योजनांचा लाघ घेता येत नाही. आम्ही आमच्या डिजिटल डीजी या युट्युब चॅनलवर विविध शासकीय योजनांविषयी माहितीचे व्हिडीओज प्रकाशित करत असतो.

त्यामुळे अनेक शेतकरी बांधवाना याचा लाभ घेता येवू शकतो. आमच्या digital dg या युट्युब चॅनलला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा आणि लगेच चॅनल सबस्क्राईब करून घंटीचे बटन दाबा जेणेकरून तुम्हाला विविध शासकीय योजनेंची माहिती अगदी मोफत मिळू शकेल.

नाविन्य पूर्ण योजना व इतर योजनेची माहिती मिळविण्यासाठी आमच्या ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

मित्रांनो अनेकांनी आम्हाला तुमच्या WhatsApp Group सहभागी करून घ्या अश्या विनंत्या केलेल्या आहेत. परंतु मित्रांनो WhatsApp Group ला सदस्य संख्या समाविस्ट करण्याची मर्यादा असते यामुळे आम्ही टेलिग्राम ग्रुप बनविलेला आहे.

खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही आमच्या Telegram Group सहभागी होऊ शकता आणि विविध शासकीय योजनांची माहिती मोफत मिळवू शकता.

आमच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी येथे क्लिक करा.

शासकीय योजनासाठी लागणारे pdf अर्ज मोफत उपलब्ध.

मित्रांनो विविध विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यसाठी ऑनलाईन अर्ज करावे लागतात ते अर्ज कसे करावे हे शेतकरी बांधवाना माहित नसते.

त्यामुळे शासकीय योजनेचा ऑनलाईन अर्ज कसा करावा हे आम्ही आमच्या युट्युब चॅनलवर दाखवीत असतो. परंतु कधी कधी हे अर्ज ऑफलाईन असतात अशावेळी  तो अर्ज देखील आम्ही आमच्या वेबसाईटवर शेतकरी बांधवाना मोफत उपलब्ध करून देत असतो.

नाविन्यपूर्ण योजना या लेखाचा सारांश

मित्रांनो नाविन्यपूर्ण योजना राबविण्याबाबतचा शासन निर्णय आलेला आहे. त्यानुसार शेतकरी बांधवाना दुधाळ जनावरे व शेळ्यासाठी अनुदान मिळणार आहे. नाविन्यपूर्ण योजनेसाठी लागणारा अर्जाचा नमुना या लेखाच्या वर दिलेला आहे त्या लिंकवर क्लिक करून तो नमुना डाउनलोड करून घ्या. अधिक माहितीसाठी तुमच्या तालुक्यातील संबधित अधिकारी यांच्याशी संपर्क साधा.

जिल्हा परिषद योजना.

https://digitaldg.in/2021/02/12/जिल्हा-परिषद-योजना

14 thoughts on “नाविन्यपूर्ण योजना बेरोजगारांसाठी उपयुक्त तरुणांनी लाभ घ्यावा.

  1. मला लोन पाहीजे मि शेळी पालन करु इछीतो सेतिला जोड़ धंदा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *