सिंचन विहीर योजना 2023 संदर्भात माहिती जाणून घ्या. मित्रांनो रोजगार हमी योजना अंतर्गत शेतकऱ्यांना आता सिंचन विहीर मिळणे खूपच सोपे होणार आहे.
आजच्या या लेखामध्ये सिंचन विहिरीसाठी प्रस्ताव कसा डाउनलोड करायचा आणि तो कुठे सदर करायचा या संदर्भात आपण माहिती जाणून घेणार आहोत.
या लेखाच्या सर्वात शेवटी सिंचन विहीर योजनेचा संपूर्ण प्रस्ताव डाउनलोड करण्याची लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तो प्रस्ताव तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे.
सिंचन विहीर योजना २०२१ संदर्भातील खालील व्हिडीओ बघा.
सिंचन विहिरींच्या कामांना वेग मिळणार.
मित्रानो शेतकरी बांधवांना शेतीसाठी पाणी मिळाले तर ते अगदी खडकाळ जमिनीवरही उत्तम प्रकारचे पिक घेवू शकतात. अनेक शेतकरी बांधवाना त्यांच्या शेतात विहीर खोदण्यास पैसे नसतात आणि यामुळे त्यांच्या शेतातील उत्पादन आणि उत्पन्नावर परिणाम होतो. त्यामुळे अशा अनेक शेतकऱ्यांना ज्यांना शेतात सिंचन विहीर खोदायची आहे पण पैसे नाहीत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी अशी आहे कि सिंचन विहीर योजना अंतर्गत सिंचन विहिरीच्या कामांना आता वेग मिळणार आहे.
सिंचन विहिरीसाठी अर्ज प्रक्रिया.
रोजगार हमी योजनेतून वैयक्तिक लाभाच्या योजना अंतर्गत शेतकरी सिंचन विहिरीचा लाभ घेऊ शकतात. मित्रांनो सिंचन विहिरीसाठी शासनाकडून अनुदान मिळते.
रोजगार हमी योजने अंतर्गत शेतकरी सिंचन प्रस्ताव दाखल करू शकतात यामध्ये सिंचन विहीर खोदकाम आणि बांधकामासाठी अनुदान मिळते.
सिंचन व्हीरीसाठी ऑनलाइन अर्ज करता येतो का. सिंचन विहिरीसाठी संपूर्ण प्रस्ताव कोठे सदर करावा हि आणि इतर बरीच माहिती या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत.
सिंचन विहीर ऑनलाईन अर्ज प्रक्रिया.
रोजगार हमी योजना अंतर्गत सिंचन विहिरीसाठी ऑनलाईन अर्ज करता येवू शकतो का याची ज्यावेळी आम्ही माहिती घेतली त्यावेळी https://egs.mahaonline.gov.in/EgsWell/Registration/Registration हि लिंक आम्हाला मिळाली.
सदरील लिंक हि रोजगार हमी योजनेच्या अधिकृत वेबसाईटची लिंक असून यावर क्लिक करताच सिंचन विहिरीचा अर्ज ओपन होते. या ठिकाणी सर्व माहिती भरण्यासाठी अनेक रकाने दिलेले आहेत ज्यामध्ये लाभार्थ्याला माहिती भरून शेवटी सबमिट करायचे आहे.
परंतु जेंव्हा आम्ही प्रत्यक्ष माहिती भरण्यास सुरुवात केली तर या ठिकाणी जिल्हाच सिलेक्ट होत नाही. त्यामुळे सध्या तरी आम्हाला egs.mahaonline.gov.in या वेबसाईटवर सिंचन विहिरीसाठी ऑनलाईन अर्ज करता येवू शकला नाही.
सिंचन विहीर योजनेची रोजगार हमी योजना मंत्री यांनी दिली माहिती.
महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदीपन भुमरे यांनी त्यांच्या ट्वीटर हँडल वरून दिनांक 9 मार्च 2021 रोजी Maharashtra DGIPR या ट्वीटर हँडलवर सिंचन विहिरीसंदर्भात केलेले ट्वीट रीट्वीट केले आहे ते ट्वीट पुढील प्रमाणे आहे.
मनरेगा योजनेंतर्गत सिंचन सुविधेसाठी वैयक्तिक सिंचन विहिरींना प्रशासकीय मान्यता देण्याचा अधिकार आता पंचायत समितीच्या सह कार्यक्रम अधिकारी तथा गट विकास अधिकाऱ्यांना प्रदान. यामुळे शेतकऱ्यांना वैयक्तिक सिंचन विहिरींचा लाभ मिळणे सुलभ होणार- रोहयो मंत्री. या संदर्भात दिनांक 11 मार्च रोजी दैनिक पुढारी वृत्त पत्रात देखील एक बातमी प्रकाशित करण्यात आली आहे.
सिंचन विहिरीचा प्रस्ताव कोठे सादर करावा.
शेतकऱ्यांना सिंचन विहिरीचा लाभ देण्यासाठी त्यांची ग्रामसभेतून निवड केली जाते.
त्यांनतर ज्या शेतकऱ्याची सिंचन विहिरीसाठी निवड केली आहे त्या शेतकऱ्यांच्या सिंचन विहिरीचा प्रस्ताव तयार केला जातो. सिंचन विहिरीचा प्रस्ताव तयार केल्यानंतर तालुक्यातील गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांच्या कार्यालयात सादर केला जातो.
सिंचन विहीर योजनेचा हा प्रस्ताव उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनरेगा जिल्हा परिषद यांच्या मार्फत ऑनलाईन पद्धतीने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्याकडे सादर केला जातो.
सिंचन विहीर योजना २०२१ संपूर्ण प्रस्ताव मोफत उपलब्ध.
रोजगार हमी योजना अंतर्गत सिंचन विहिरीचा लाभ मिळविण्यासाठी तुम्हाला प्रस्ताव सादर करावा लागणार आहे. तो प्रस्ताव pdfमध्ये डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
त्यानंतर या सिंचन विहीर प्रस्तावाची प्रिंट काढून घ्या आणि तुमच्या ग्राम पंचायतला सादर करा.
मित्रांनो खाली दिलेला प्रस्ताव हा सार्वजनिक विहिरीसाठी आहे. सिंचन विहिरीचा लाभ घेण्यसाठी प्रस्ताव कसा असतो याची ठोबळ कल्पना यावी या उद्देशाने हा प्रस्ताव या ठिकाणी दिलेला आहे.
सिंचन विहिरीच्या वैयक्तिक लाभासाठी जो प्रस्ताव दाखल करावा लागणार आहे त्या प्रस्तावामध्ये आणि या ठिकाणी दिलेल्या प्रस्तावामध्ये थोडाफार बदल करावा लागणार आहे यांची नोंद घ्यावी.
प्रस्ताव डाउनलोड करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.
मित्रांनो शेती संबधी विविध शासकीय योजनांची माहिती संदर्भातील व्हिडीओज बघण्यासाठी डिजिटल डीजी या युट्युब चॅनलला सभेट द्या. चॅनलवर डायरेक्ट जाण्यासाठी येथे क्लिक करा.
त्याच प्रमाणे डिजिटल डीजी या वेबसाईटला वेळोवेळी भेट देत राहा जेणे करून विविध योजनेचे अर्ज किंवा प्रस्ताव तुम्हाला मोफत डाउनलोड करता येईल. आमच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन होण्यासाठी
विविध शासकीय योजनांच्या माहितीचे लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://digitaldg.in/2021/03/09/sharad-pawar-gra…ojana-in-marathi/
Niu m