सिंचन विहीर योजना 2024 संपूर्ण प्रस्ताव मोफत उपलब्ध sinchan vihir prastav

सिंचन विहीर योजना 2024 संपूर्ण प्रस्ताव मोफत उपलब्ध sinchan vihir prastav

सिंचन विहीर योजना 2023 संदर्भात माहिती जाणून घ्या. मित्रांनो रोजगार हमी योजना अंतर्गत शेतकऱ्यांना आता सिंचन विहीर मिळणे खूपच सोपे होणार आहे.

आजच्या या लेखामध्ये सिंचन विहिरीसाठी प्रस्ताव कसा डाउनलोड करायचा आणि तो कुठे सदर करायचा या संदर्भात आपण माहिती जाणून घेणार आहोत.

या लेखाच्या सर्वात शेवटी सिंचन विहीर योजनेचा संपूर्ण प्रस्ताव डाउनलोड करण्याची लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तो प्रस्ताव तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे.

सिंचन विहीर योजना संदर्भातील खालील व्हिडीओ बघा.

सिंचन विहिरींच्या कामांना वेग मिळणार.

मित्रानो शेतकरी बांधवांना शेतीसाठी पाणी मिळाले तर ते अगदी खडकाळ जमिनीवरही उत्तम प्रकारचे पिक घेवू शकतात. अनेक शेतकरी बांधवाना त्यांच्या शेतात विहीर खोदण्यास पैसे नसतात आणि यामुळे त्यांच्या शेतातील उत्पादन आणि उत्पन्नावर परिणाम होतो.

त्यामुळे अशा अनेक शेतकऱ्यांना ज्यांना शेतात सिंचन विहीर खोदायची आहे पण पैसे नाहीत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी अशी आहे कि सिंचन विहीर योजना अंतर्गत सिंचन विहिरीच्या कामांना आता वेग मिळणार आहे. तुम्हाला जर हा प्रस्ताव हवा असेल तर या लेखाच्या सर्वात शेवटी क लिंक देण्यात आली आहे त्यावर क्लिक करून प्रस्ताव डाउनलोड करून घ्या.

सिंचन विहिरीसाठी अर्ज प्रक्रिया.

रोजगार हमी योजनेतून वैयक्तिक लाभाच्या योजना अंतर्गत शेतकरी सिंचन विहिरीचा लाभ घेऊ शकतात. मित्रांनो सिंचन विहिरीसाठी शासनाकडून अनुदान मिळते.

रोजगार हमी योजने अंतर्गत शेतकरी सिंचन प्रस्ताव दाखल करू शकतात यामध्ये सिंचन विहीर खोदकाम आणि बांधकामासाठी अनुदान मिळते.

सिंचन व्हीरीसाठी ऑनलाइन अर्ज करता येतो का. सिंचन विहिरीसाठी संपूर्ण प्रस्ताव कोठे सदर करावा हि आणि इतर बरीच माहिती या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत.

सिंचन विहीर ऑनलाईन अर्ज प्रक्रिया.

रोजगार हमी योजना अंतर्गत सिंचन विहिरीसाठी ऑनलाईन अर्ज करता येवू शकतो. परंतु तुमचा अर्ज मंजूर झाला तर तुम्हाला सिंचन विहिरीचा प्रस्ताव सोबत ठराव सर्व माहिती द्यावी लागते.

सिंचन विहीर ऑनलाईन अर्ज संदर्भात अधिक माहिती हवी असेल तर येथे क्लिक करा.

वरील लिंकवर क्लिक करून तुम्ही सिंचन विहीर योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करू शकता या संदर्भातील सविस्तर माहिती मिळवू शकता. परंतु ऑनलाईन अर्ज जरी केला तरी तुम्हाला सिंचन विहीर प्रस्ताव ग्रामपंचायतकडे दाखल करावाच लागतो.

सिंचन विहिरीचा प्रस्ताव कोठे सादर करावा.

शेतकऱ्यांना सिंचन विहिरीचा लाभ देण्यासाठी त्यांची ग्रामसभेतून निवड केली जाते.

त्यांनतर ज्या शेतकऱ्याची सिंचन विहिरीसाठी निवड केली आहे त्या शेतकऱ्यांच्या सिंचन विहिरीचा प्रस्ताव तयार केला जातो. सिंचन विहिरीचा प्रस्ताव तयार केल्यानंतर तालुक्यातील गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांच्या कार्यालयात सादर केला जातो.

सिंचन विहीर योजनेचा हा प्रस्ताव उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनरेगा जिल्हा परिषद यांच्या मार्फत ऑनलाईन पद्धतीने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्याकडे सादर केला जातो.

सिंचन विहीर योजना 2024 संपूर्ण प्रस्ताव मोफत उपलब्ध.

रोजगार हमी योजना अंतर्गत सिंचन विहिरीचा लाभ मिळविण्यासाठी तुम्हाला प्रस्ताव सादर करावा लागणार आहे. तो प्रस्ताव pdfमध्ये डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

त्यानंतर या सिंचन विहीर प्रस्तावाची प्रिंट काढून घ्या आणि तुमच्या ग्राम पंचायतला सादर करा.

मित्रांनो खाली दिलेला प्रस्ताव हा सार्वजनिक विहिरीसाठी आहे. सिंचन विहिरीचा लाभ घेण्यसाठी प्रस्ताव कसा असतो याची ठोबळ कल्पना यावी या उद्देशाने हा प्रस्ताव या ठिकाणी दिलेला आहे.

सिंचन विहिरीच्या वैयक्तिक लाभासाठी जो प्रस्ताव दाखल करावा लागणार आहे त्या प्रस्तावामध्ये आणि या ठिकाणी दिलेल्या प्रस्तावामध्ये थोडाफार बदल करावा लागणार आहे यांची नोंद घ्यावी.

प्रस्ताव डाउनलोड करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

सिंचन विहीर योजना २०२१

One thought on “सिंचन विहीर योजना 2024 संपूर्ण प्रस्ताव मोफत उपलब्ध sinchan vihir prastav

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *