Covid vaccine certificate download प्रमाणपत्र डाउनलोड करा

Covid vaccine certificate download प्रमाणपत्र डाउनलोड करा

आज आपण covid vaccine certificate download संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत.

तुमच्या घरामधील ज्येष्ठ नागरिकांपैकी कोणीतरी कोविड लस नक्कीच घेतलेली असेल. तुमच्या घरातील सदस्यांपैकी जर तुमच्या आईने, वडिलाने किंवा दोघानेही किंवा घरातील इतर सदस्याने कोविनची लस घेतलेली असेल तर ज्या दवाखान्यामध्ये लस घेतली असेल त्या ठिकाणाहून लस घेतल्याचे प्रमाणपत्र घेतल्याशिवाय घरी येवू नये अशी सूचना शासनाच्या वतीने देण्यात आलेली आहे.

कोविड लसीकरण प्रमाणपत्र मोबाईलमध्ये डाउनलोड कसे करावे या संदर्भातील व्हिडीओ बघा किंवा येथे क्लिक करा.

covid vaccine certificate संदर्भात काही अडचण असेल तर खालील नंबर्सवर फोन करा.

मित्रांनो कोविड लस घेतल्यानंतर लसीकरण प्रमाणपत्र अवश्य घ्या कारण भविष्यामध्ये या प्रमाणपत्राची गरज भासण्याची शक्यता आहे. कोविड लस प्रमाणपत्र मिळविण्यास तुम्हाला काही अडचण येत असेल किंवा यासंबंधीची तुमची काही तक्रार असल्यास 1075 या टोल फ्री क्रमांकावर नोंदवा अशी सूचनाही देण्यात आलेली आहे.

तुम्ही लस घेतली असेल आणि कोविड 1 9 लस प्रमाणपत्र डाउनलोड कसे करावे हे जर तुम्हाला महित नसेल तर या ठिकाणी आम्ही एक कोविड 19 लस प्रमाणपत्र डाउनलोड पीडीएफ तयार केली आहे ती पीडीएफ बघून एक एक प्रक्रिया अनुकरण करून तुमच्या घरातील सदस्यांचे covid vaccine certificate download करून घ्या.

covid-19 vaccine registration and covid-19 certificate link

कोविड लस घेण्यासाठी कोविन लसीकरण नोंदणी करणे गरजेचे असते. कोविड लसीकरण नोंदणी करण्यासाठी तुम्हाला https://www.cowin.gov.in/home या वेबसाईटला भेट देवून या ठिकाणी नोंदणी करावी लागेल.

आरोग्य सेतू या शासकीय वेबसाईटवर किंवा setu android application वर सुद्धा तुम्ही नोंदणी करू शकता. कोविन लसीकरण नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा. आरोग्य सेतू या शासकीय वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा. या ठिकाणी covid-19 certificate link दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करा त्यासाठी येथे क्लिक करा.

covid vaccine certificate download संदर्भात संपूर्ण माहिती.

जर दवाखान्यामध्ये तुम्हाला हार्ड कॉपीमध्ये काही कारणास्तव कोविन लस घेतल्याचे प्रमाणपत्र मिळत नसेल तर सॉफ्ट कॉपीमध्ये तुम्ही तेच प्रमाणपत्र तुमच्या मोबाईलवरून डाउनलोड करू शकता.

कोविन लस प्रमाणपत्र covid vaccine certificate डाउनलोड कसे करावे या संदर्भात आज आपण या लेखामध्ये सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

Covid vaccine certificate download online process.

  • तुमच्या मोबाईल मधील ब्राउजर ओपन करा
  • ब्राउजरच्या सर्चबार मध्ये cowin.gov.in हा कीवर्ड टाईप करा.
  • Register or sign in yourself या बटनावर क्लिक करा.
  • लसीकरणाच्या वेळेस जो नंबर दिला होता तो नंबर चौकटीत टाका आणि Get otp या बटनावर क्लिक करा.
  • तुमच्या मोबाईल नंबरवर आलेला otp दिलेल्या चौकटीमध्ये टाका आणि verify या बटनावर क्लिक करा.
  • तुमचा मोबाईलचा उपयोग करून जेवढ्याहि व्यक्तीने लसीकरण केले असेल त्यांची सर्वांची नावे या ठिकाणी दिसेल.
  • त्यापैकी ज्या व्यक्तीचे लसीकरणाचे प्रमाणपत्र डाउनलोड करायचे आहे त्या व्यक्तीच्या नावापुढे दिसत असलेल्या सर्टिफिकेट या बटनावर क्लिक करा.
  • जसेही तुम्ही सर्टिफिकेट या बटनावर क्लिक कराल त्यावेळी तुमच्या मोबाईलमध्ये कोविन लसीकरण केल्या संदर्भातील प्रमाणपत्र डाउनलोड झालेले असेल ते जपून ठेवा.

हि माहिती व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा.

अशा प्रकारे तुम्ही तुमच्या घरातील सदस्यांचे कोविन लसीकरणाचे प्रमाणपत्र अगदी सहजपणे तुमच्या मोबाईल मध्ये डाउनलोड करू शकता.

हि अत्यंत महत्वाची माहिती तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा जेणे करून ज्यांना हे कोविड लसीकरण प्रमाणपत्र डाउनलोड कसे करावे हे माहित नाही त्यांना या गोष्टीचा उपयोग होईल.

मित्रांनो आम्ही सर्वसामान्य नागरिकांना उपयोगी पडेल अशी माहिती आमच्या डिजिटल डीजी या युट्युब चॅनलवर देत आलेलो आहे.

यामध्ये विविध योजना असतील किंवा योजनेसाठी लागणारे मोफत अर्ज असतील किंवा इतर प्रस्ताव असतील ते आम्ही आमच्या युट्युब चॅनलद्वारे आणि वेबसाईटद्वारे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचवत आलेलो आहे.

आमच्या युट्युब चॅनलला भेट द्या

मित्रांनो तुम्हाला या संदर्भातील माहिती हवी असेल तर आमच्या डिजिटल डीजी या युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.

आमच्या युट्युब चॅनललवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.  व्हिडीओची माहिती सर्वात अगोदर तुमच्या पर्यंत होह्चावी असे जर तुम्हाला वाटत असेल तर आमचे युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.

सोबत बेल आयकोन म्हणजेच घंटीच्या बटनावर क्लिक करा. त्याचप्रमाणे आमच्या digitaldg.in या वेबसाईटला भेट द्या. आमच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा.

आमचे इतरहि लेख वाचा

जाणून घ्या शेळीपालन प्रशिक्षण साठी ऑनलाईन कसा करावा लागतो

https://digitaldg.in/2021/03/23/शेळी-पालन-प्रशिक्षण/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *