महाडीबीटी पूर्व संमतीपत्र अनुदान मिळविण्यासाठी गरजेचे डाउनलोड करा

महाडीबीटी पूर्व संमतीपत्र अनुदान मिळविण्यासाठी गरजेचे डाउनलोड करा

महाडीबीटी पूर्व संमतीपत्र असे डाउनलोड करा

शेतकरी बंधुंनो महाडीबीटी पूर्व संमतीपत्र म्हणजेच mahadbt pre sanction letter डाउनलोड कसे करावे या संदर्भात माहिती जाणून घेवूयात. अनेक शेतकरी बांधवांनी महा dbt वेबसाईटवर लॉगीन करून विविध योजनांसाठी अर्ज भरलेले आहेत. ज्या शेतकरी बांधवांनी महा dbt शेतकरी योजनांचे अर्ज भरलेले आहेत त्यापैकी बऱ्याच शेतकरी बांधवाना अजून महाडीबीटी पूर्व संमतीपत्र मिळालेले नाहीत.

पूर्वसंमती पत्र कसे डाउनलोड करावे या संदर्भातील व्हिडीओ बघण्यासाठी खालील व्हिडीओ पहा किंवा येथे क्लिक करा.

महाडीबीटी पूर्व संमतीपत्र का आणि कशासाठी लागते हे समजावून घेवूयात.

विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी वेब पोर्टलवर जाऊन अर्ज करण्याचे आवाहन महाराष्ट्र शासनाच्या वतीने करण्यात आले होते. अनेक शेतकरी बांधवानी विविध योजनांसाठी महाडीबीटी वेब पोर्टलवर अर्ज केले होते. ज्या शेतकऱ्यांनी विविध योजनांसाठी अर्ज केले होते अशा शेतकऱ्यांच्या अर्जांची सोडत म्हणजेच लॉटरी काढण्यात आली होती.

महाडीबीटी पूर्व संमतीपत्र

महाडीबीटी संमतीपत्र डाउनलोड करण्यासाठी अगोदर कागदपत्रे अपलोड करणे महत्वाचे.

महाडीबीटी लॉटरीमध्ये ज्या शेतकऱ्यांची नावे आली होती त्या शेतकरी बांधवानी पोर्टलवर जाऊन अर्ज सादर करावेत असे आह्वान करण्यात आले होते. विविध शतकरी बांधवानी त्यांचे कागदपत्रे महाडीबीटी या शेतकरी वेब पोर्टलवर उपलोड केली होती, आणि त्या संदर्भात अर्ज यशस्वीपणे सादर केल्याचे संदेश देखील त्यांना आले होते.

सोयाबीन बियाणे अनुदानासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी खालील व्हिडीओ बघा

कशासाठी लागते महाडीबीटी पूर्व संमतीपत्र?

एकदा का शेतकरी बांधवानी त्यांचे कागदपत्रे महाडीबीटी पोर्टलवर अपलोड केली कि ते संबधित अधिकारी साहेबांच्या लॉगीनला जातात सर्व कागदपत्रे बरोबर असतील तर शेतकऱ्यांच्या महाडीबीटी लॉगीन आय डी ला साहित्य खरेदी करण्यासाठी महाडीबीटी पूर्व संमतीपत्र म्हणजेच mahadbt pre sanction letter पाठविले जाते. संमतीपत्र असल्याशिवाय शेतकरी साहित्य खरेदी करू शकत नाही किंवा केले तर ते ग्राह्य धरले जात नाही.

महाडीबीटी पोर्टलवर बियाणे अनुदान योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा या संदर्भातील खालील व्हिडीओ पहा

महाडीबीटी पूर्व संमतीपत्र डाउनलोड करण्याची पद्धत.

महाडीबीटी संमतीपत्र तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करण्यासाठी खालील पद्धतीचा अबलंब करा.

       १) तुमच्या कॉम्प्युटरच्या ब्राउजरच्या सर्च बारमध्ये टाईप करा mahadbt farmer login आणि सर्च करा.

       २) कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर दिसत असलेल्या https://mahadbtmahait.gov.in/Farmer/Login/Login या       लिंकवर क्लिक करा.

       ३) युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगीन करा.

       ४) स्क्रीनवर डाव्या बाजूला दिसत असलेल्या पर्यायांपैकी सर्वात शेवटी दिसत असलेल्या पूर्वसंमती पत्र या   पर्यायावर क्लिक करा.

       ५) पूर्वसंमती पत्र या पर्यायावर क्लिक केल्यानंतर ‘पूर्वसंमती पत्र पहा’ असे एक बटन दिसेल त्यावर क्लिक  करा. जसे हि तुम्ही या बटनावर क्लिक कराल त्यावेळी तुमच्या कॉम्प्युटरवर पूर्वसंमती पत्र ते डाउनलोड करून घ्या. महाडीबीटी पोर्टलवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

आम्हाला सोशल मिडीयावर फॉलो करा.

आमच्या Digital DG Youtube Channel ला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

विविध शासकीय योजनांची माहिती तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये सामील व्हा त्यासाठी येथे क्लिक करा.

आमचे इतरही लेख वाचा

बियाणे अनुदान ऑनलाईन अर्ज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *