सोयाबीन बियाणे अनुदान योजनेसाठी ऑनलाईन अर्ज असा करा.

सोयाबीन बियाणे अनुदान योजनेसाठी ऑनलाईन अर्ज असा करा.

शेतकरी बंधुंनो सोयाबीन बियाणे अनुदान योजनेसाठी ऑनलाईन अर्ज असा करा.

मित्रांनो सोयाबीन बियाणे अनुदान योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा या संदर्भात या ठिकाणी संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत.

महाडीबीटी शेतकरी पोर्टलवर सध्या विविध योजनांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु झालेली आहे. यामध्ये शेतकरी विविध योजनांसाठी अर्ज भरू शकतात. विविध बियाण्यांसाठी देखील या महाडीबीटी शेतकरी पोर्टलवर अर्ज भरले जाऊ शकतात.

सोयाबीन बियाणे अनुदान योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा या संदर्भातील खालील व्हिडीओ पहा.

विविध बियाण्यांसाठी करा महाडीबीटी शेतकरी पोर्टलवर अर्ज

महाडीबीटी शेतकरी पोर्टलवर विविध बियाण्यांसाठी अर्ज करणे सुरु आहे. सोयाबीनच्या बियाण्यांसाठी महाडीबीटी शेतकरी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज कसा करावा या संदर्भात आपण माहिती जाणून घेणार आहोत. सोयाबीन बियाण्यांसाठी माहिती कसी भरावी, पेमेंट कसे करावे, प्रिंट कशी काढावी हि संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत.

महाडीबीटी पोर्टलवर विविध बियाण्यांसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा या संदर्भातील खालील व्हिडीओ पहा.

सोयाबीन बियाण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यानाकडे शेतकऱ्यांचा कल

महाडीबीटी शेतकरी पोर्टलवर सोयाबीन बियाण्यांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याकडे शेतकरी बांधवांचा जास्त कल दिसून येत आहे त्याचे एक कारण असेहि असू शकते कि, सध्या खाद्यतेलाचे भाव दिवसेंदिवस वाढत चालले आहे त्यामुळे तेलवर्गीय बियाण्यांचे भाव खूप वाढलेले आहेत. विशेषतः सोयाबीन बियाण्याचे भाव खूप वाढल्यामुळे अनुदांवर शासकीय बियाणे मिळेल का हा दृष्टीकोन ठेवून शेतकरी बांधव सध्या महाडीबीटी शेतकरी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करताना दिसत आहेत.

बियाणे अनुदानासाठी ऑनलाईन अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांची होत आहे तारांबळ

सध्या लॉकडाऊन सुरु असल्यामुळे गर्दी करणे टाळावे असे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आले आहे आणि त्याचा परिणाम असा झाला आहे कि शेतकरी बांधवांना ठराविक वेळेनंतर घराबाहेर जाणे शक्य होत नाही. शेतकरी बांधवांची हीच अडचण लक्षात सोडविण्यासाठी हा लेख लिहिण्यात आला आहे. या लेखामध्ये दिलेल्या पद्धतीचा अवलंब करून शेतकरी बांधव महाडीबीटी शेतकरी पोर्टलवर सोयाबीन बियाणे अनुदान योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा या विषयी सविस्तर माहिती जाणून घेवू शकता आणि त्यांचा अर्ज अगदी घरी बसून देखील करू शकता.

सोयाबीन बियाणे अनुदान

असा करा सोयाबीन बियाणे अनुदान योजनेसाठी ऑनलाईन अर्ज

सोयाबीन बियाण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील पद्धतीचा अवलंब करा.

 • ज्या कॉम्प्युटरवरून अर्ज करणार आहात त्या कॉम्प्युटरमध्ये इंटरनेटची सुविधा सक्रीय असल्याची खात्री करा.
 • कॉम्प्युटरचे ब्राउजर उघडा त्यामध्ये टाईप करा mahadbt farmer web portal त्यानंतर एंटर हे बटन दाबा
 • तुमच्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर आपले सरकार महाडीबीटी शेतकरी पोर्टल ओपन होईल. या ठिकाणी युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगीन करा. जर तुम्हाला माहित नसेल कि युजर आयडी आणि पासवर्ड मिळविण्यासाठी महाडीबीटी शेतकरी पोर्टलवर नोंदणी कशी करावी तर त्यासाठी येथे क्लिक करा
 • Mahadbt web portal लॉगीन केल्यानंतर अर्ज करा अशी निळ्या रंगाची लिंक दिसेल तयार क्लिक करा.
 • बियाणे, औषधे व खते या पर्यायासमोर दिसत असलेल्या ‘बाबी निवडा’ या बटनावर क्लिक करा.
 • त्यानंतर बियाणे, औषधे व खते या संबधी एक फॉर्म ओपन होईल त्यामध्ये सोयाबीन बियाणे निवडा व इतर योग्य ती माहिती भरा
 • हिरव्या रंगाच्या जतन करा या बटनावर क्लिक करून हा अर्ज जतन करा. तुम्हाला अजूनही एखाद्या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही आणखी अर्ज करू शकता

सोयाबीन बियाणे अनुदान योजनेचा अर्ज भरल्यानंतर पेमेंट करा

 • सर्व अर्ज भरल्यानंतर अर्ज पहा या बटनावर क्लिक करा त्यानंतर योजनेसाठी प्राधान्य क्रमांक निवडा व अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करा.
 • अर्ज सादर केल्यानंतर फी च्या स्वरुपात या ठिकाणी काही पेमेंट करावे लागेल ते करण्यासाठी मेक पेमेंट या बटनावर क्लिक करा.
 • पेमेंट केल्यानंतर पेमेंटची पावती प्रिंट करून घ्या किंवा pdf मध्ये जतन करून घ्या.
 • तुमच्या अर्जाची सद्स्थिती जाणून घेण्यासाठी ‘मी अर्ज केलेल्या बाबी’ या बटनावर क्लिक करा. या ठिकाणी तुम्ही तुमचा अर्ज बघू शकता, अर्जाची पावती बघू शकता. पेमेंट केल्याची पावती देखील बघू शकता.

शेतकरी अनुदान योजनेचे माहिती तुमच्या मोबाईलवर

महाडीबीटी शेतकरी योजना व इतर महाराष्ट्र कृषी विभाग योजना या संदर्भातील माहितीचे लेख डिजिटल डीजी या वेबसाईटवर व डिजिटलडीजी या युट्युब चॅनलवर आम्ही नेहमी शेअर करत असतो. मित्रांनो शेतकरी बांधवाना विविध शेतकरी अनुदान योजना व इतर कृषी अनुदान योजना या संदर्भात माहिती मिळावी हा आमचा उद्देश आहे. तुम्हाला हि महाराष्ट्र शेतकरी योजना संदर्भात माहिती हवी असेल तर आमच्याशी कनेक्ट व्हा.

सोशल मिडीयावर आम्हाला फॉलो करा.

अशा पद्दतीने तुम्ही सोयाबीन बियाणे अनुदान योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. मित्रांनो विविध योजनांच्या माहितीसाठी डिजिटलडीजी या युट्युब चॅनलला भेट द्या त्यासाठी येथे क्लिक करा. आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा. डिजिटल डीजी या आमच्या टेलिग्राम चॅनलला भेट द्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *